‘अहो पण झाले तरी काय?’ असे पुन्हा माझ्या वडिलानी विचारल्यावर मामानी सर्व प्रकार सांगितला.
’आम्ही निक्षून विचारल्यावर वासंती म्हणाली की मुलगा डावरा आहे. डावरी माणसे बावळट असतात, कमी बुद्धीची असतात, हेकट व तापट असतात, थोडक्यांत तीं सगळ्या बाबतीत ’डावीच’ असतात तेव्हा मला नको. आम्ही म्हटले तो डावरा आहे हे तुला काय माहीत? तेव्हा ती म्हणाली की त्याने चहाचा कप डाव्या हाताने उचलला तेव्हाच मी ओळखले. आम्हाला काही पटेना तेव्हा खरं काय ते पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तेव्हा हा जेवत होता, चांगला उजव्या हाताने! मी आनंदलो. वासंतीचा उगाच गैरसमज झाला असे मनाशी म्हटले. त्याला उगाचच दोन पत्ते विचारले. मात्र त्याने ते माझ्या डायरीत डाव्या हातानेच लिहिले! म्हणजे वासंतीचे निरीक्षण चुकीचे नव्हते! मी परत गेलो.
मग दोन दिवस मी व तिच्या वडिलांनी तिला समजावले. वडिलांनी पुष्कळ उदाहरणे देऊन डावरी माणसे उलट खूप हुशार, मनमिळाऊ व मेहेनती असतात असे म्हटले. अब्राहॅम लिंकन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ डावरींच आहेत. डावर्यांच अक्षर खूप चांगलं असतं, याचंहि आहे. क्रिकेटमध्ये तर डाव्या हाताने खेळणार्यांना खूप महत्व असते. ते मॅचेस जिंकून देतात. विनू मांकड सारखे एका हाताने बॅटिग व दुसर्या हाताने बोलिंग करणार्याचे केवढे कौतुक होते, वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. हा मुलगा अर्धा डावरा आहे. तो जेवतॊ उजव्या हाताने पण लिहितो डाव्या हाताने तेव्हा त्याच्याकडे दोघांचे गुण आहेत असं बरंच काही सांगितल्यावर तिची समजूत पटली व आता तिने मान्य केले आहे.’
माझा जीव भांड्यात पडला! अखेर आमचे लग्न झाले. अंतर्पाटाआडून ती माझ्या पायांकडे निरखून पाहात होती, बहुधा मी पायानेहि डावरा आहे की काय हे पहात असावी! आमच्या लग्नाला ४५ वर्षे झाली. ही कथा आठवून आम्ही अजूनहि हसतॊ.एकमेकाना डावरी माणसे दाखवतो. बिल क्लिंटन भारतात आला तेव्हा तोहि डावरा आहे हे मी बायकोला दाखवले व डावरेपणाची फुशारकी मारलीच.
मला माझ्या डावरेपणाचा रास्त अभिमान आहे! मात्र हल्लीच एका रिक्षावाल्याला, सकाळीच, डाव्या हाताने भाडे देऊ लागलो तर तो म्हणाला ’साहब, सुबहके बोहनीके टाइम हम बाये हाथसे पैसा नही लेंगे!’ झगडा झाला, ’दोनों हाथ मेरेहि हैं और मुझे प्यारे है, पैसा चाहे तो लेऒ नहीतॊ जाओ’ वगैरे म्हटल्यावर मुकाट्याने त्याने ’मनसेवाला दिखता है’ पुटपुटत पैसे घेतले.
माझ्या नातवंडाना मी नेहेमी अनेक गोष्टी सांगतो त्यात ही त्यांची आवडती गोष्ट आहे. ही आमच्याच लग्नाची गोष्ट आहे हे मात्र त्याना माहीत नाही. पण मला वाटते माझ्या एका हुशार नातीला तशी शंका नक्की आहे! माझा डावरेपणा तिला ठाऊकच आहे कारण तिला फटका देताना माझा डावा हातच पुढे येतो!
’सोबती’मध्ये कथा ऐकल्यावर मी श्री. फडणीस यांचेकडे कथा लिहून मागण्यासाठी फोन केला. फोन श्रीमती फडणीसांनी घेतला. कथा लिहून द्यायला सांगते म्हणाल्या. मी विचारले ’कथा ’सोबती’च्या ब्लॉगवर लिहायला तुमची हरकत नाहीना?’ त्या हसल्या आणि म्हणाल्या ’खुशाल लिहा पण चहाचा कप उचलताना पाहून हे डावरे आहेत हे मी ओळखले एवढाच कथाभाग खरा आहे बाकी सर्व यांचीच रचना आहे.’
मी म्हटले वा फारच छान.
Monday, June 02, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
P K Phadnis
आजोबा,
जीवनातल्या काही घटनांना मजेदार पणे मनातुन न्याहाळल्यास आपणास हसु येते.
आपण जुन्या आठवणीनां उजाळा देउन सोबतीत छान मजेदार कहाणी सांगीतली.वाचली हं !
धन्यवाद!
प्रा.सचिन पाटील.
अहो ही माझी कहाणी नाही. श्री. मधुकर फडणीस यांची आहे. मी फक्त ब्लॉगलेखक आहे. तुम्हाला आवडली ना? छान झाले
Post a Comment