Thursday, October 16, 2008

कोजागिरी कार्यक्रम






श्री. माधव बागुल श्री. मिलिंद रायकर यांचा परिचय करून देताना.

सोबतीच्या साप्ताहिक कार्यक्रमांशिवाय, सोबती दरवर्षी काही खास कार्यक्रम करते. कोजागिरी पौर्णिमा हा त्यातील एक. कोजागिरीच्या जवळच्या बुधवारी नेहेमींच्या साप्ताहिक कार्यक्रमाऐवजी गाण्याबजावण्याचा कार्यक्रम योजिला जातो. प्रथेप्रमाणे या वर्षीहि १५ ऑक्टोबरला असा कार्यक्रम झाला. या वर्षी तरुण व्हायोलिन वादक श्री. मिलिंद रायकर यांनी दीड तासपर्यंत व्हायोलिन वादन सादर केले. कार्यक्रमाला उत्तम उपस्थिति लाभली हे वरील फोटोवरून दिसून येईलच. श्री. रायकर यांनी राग भीमपलास व वसंत तसेच नाट्यगीते व भावगीते वाजवली. श्री. शंतनु किंजवडेकर यांनी त्याना अप्रतिम तबलासाथ केली.
भीमपलास संपल्यावर संस्थेचे सभासद श्री. माधव बागुल यांनी श्री. रायकर यांचा परिचय करून दिला. त्यातील काही भाग असा -
१. वडील श्री. अच्युतराव रायकर हे पहिले गुरु. नंतर पं. वसंत काडणेकर, श्री. बी.एस.मठ यांचेकडे शिक्षण.
२. राष्ट्रीय शिष्यवृत्ति मिळवून पं. डी. के. दातार यांचेपाशी पुढील शिक्षण.
३. आकाशवाणीवर A ग्रेड कलाकार म्हणून मान्यता’
४. हिंदुस्थानी संगीताबरोबरीने पाश्चात्य संगीताचाहि अभ्यास आहे.
५. पं. दातारांच्या परंपरेच्या प्रचार व प्रसारासाठी रायकर व्हायोलिन ऍकॅडमी सुरू केली. सर्व वयांचा शिष्यपरिवार मिळाला.
६. गेली ८/१० वर्षे प्रख्यात गायिका श्रीमती किशोरी आमोणकर यांना भारतात व परदेश दौर्‍यांत साथ करतात.
७. स्वत:चेहि अनेक परदेश दौरे झाले आहेत व चालू आहेत. सी. डी. व कॅसेट प्रकाशित झाल्या आहेत.
८. गुरुवर्य दातारांप्रमाणे गोडवा व रागाची शुद्धता कायम ठेवून गायकी अंगाने वादन करतात. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, भावगीत व भक्तिसंगीतहि उत्तम वाजवतात.
९. सर्व भारतभर अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम तसेच खासगी बैठका होतात.

श्री. किंजवडेकरांच्या तबला साथीबरोबर, श्री. रायकरांचे शिष्य श्री. विशाल राव यांनी स्वरमंडलवर व श्री. विनय पोदार यानी तानपुर्‍यावर साथ केली.

अप्रतिम व्हायोलिन वादनानंतर सर्व उपस्थितांना मसाल्याच्या दुधाचा आस्वाद मिळाला व कानांत स्वर ठेवून सभासद घरोघरीं गेले.

2 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

refer to my comment dated octobr04,2008 re blog started byme.Although the lod blog isclosed, another blog an be seen at the following address,http://bhashabharati.blogspot.com for poems etc.So far there seems to be no progress re contunuation of sobati blog,however mr. kale andmr.dongre are on the job--Krishnakumar Pradhan

Anil Tambe said...

सोबतीच्या तरुणांनो,
मी अनिल तांबे. पुण्याच्या प्रसिद्ध Tom & Bay (म्हणजेच तांबे) या जाहिरात कंपनीचा पूर्वीचा (निवृत्त) मालक/संचालक. नुकतंच मी सत्तरीत पदार्पण केलं आणि माझा सुमारे वर्षापूर्वी एका आधुनिक निसर्गोपचाराशी परिचय झाला आणि त्याच्या वापराने माझ्या काही सुरु होऊ पाहणा-या व्याधींवर मात करता आली. त्यामुळे आता मी माझ्यासारख्यांचं उर्वरीत आयुष्य आरोग्यपूर्ण जावं यासाठी पोटतिडकीनं काम करतो आहे. त्यासाठी मी त्या निसर्गोपचार पद्धतीचा अभ्यास करून त्याचा गावोगावी यशस्वीपणे प्रचार आणि प्रसार करतो आहे. अनेकांना माझ्यामुळे या उपचाराचा फायदा मिळतो आहे म्हणून माझा जगण्याचा आनंद दुणावला आहे.
अबाल-वृद्ध सर्वांनाच या उपचारापासून लाभ मिळत असला तरी माझा जास्त ओढा सहाजीकच माझ्या वयाच्या आणि माझ्यापेक्षा 'not so young' अशा जेष्ठांच्या स्वास्थ्याकडे असतो.
माझी 'सोबती' ला कळकळीची विनंती आहे की दिवाळीनंतरच्या एखाद्या संद्याकाळी मला संधी दिलीत तर मी माझ्या काही सहका-यांच्या बरोबर पार्ल्याला येऊन या उपचारपद्धतीची प्रात्यक्षिकासह माहिती देऊ शकेन.
माझा फोन: ०२०- २५४५२८७०, मोबाईल: ९२२६४१०३७३, ईमेल: aniltambe@gmail.com आणि पत्ता: ९०१, शिल्पा सोसायटी, 'ए' बिल्डींग, MIT College पटांगणाशेजारी, पुणे ३८. तुमच्या उत्तराची वात पाहतो आहे ...अनिल तांबे