


नमस्कार सोबती मित्रानो.
मी सध्या अमेरिकेत आहे हे आपणास माहीत आहेच. ४ जुलै हा USA चा स्वातंत्र्यदिन. त्या दिवशी बर्याच शहरांमधून Fireworks Display असतो. शहरातील एखाद्या मध्यवर्ति ठिकाणी ही आतषबाजी रात्री केली जाते. हे दारूकाम अतिशय पाहण्यासारखे असते. मी राहतो आहे त्या सॅन रेमॉन गावातहि ते काल झाले. रात्री ९-३० वाजता साधारण अर्धातास ते झाले. एका छोट्याशा टेकडीवर आमच्या घराच्या जवळच एक पार्क आहे तेथे आम्ही पहायला गेलो होतो. सध्या येथे खरेतर उन्हाळा चालू आहे, शाळांना सुटी आहे. मात्र काल रात्री हवा खूप थंड होती व वाराही सुटला होता त्यामुळे स्वेटर, जॅकेट असा पोषाख केल्याशिवाय बाहेर पडवत नव्हते. आम्ही गेलो होतोच. पण जवळपास सर्व गाव पार्कमध्ये, रस्त्यांवर लोटले होते. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जत्रा लोटली होती. येथे दारुकाम सुरेख झाले पण मला फोटो काढतां आले नाहीत याची चुटपूट लागली होती. आज सकाळी www.weather.com या साइटवर मला अमेरिकेतल्या अनेक शहरांतील दारुकामाची एक छोटीशी व्हिडिओ दिसली. त्याची website link खाली दिली आहे. ती वापरून तुम्हाला ती व्हिडिओ पाहतां येईल. आपले श्री. डोंगरे यांना पाहतां आली व त्यानी लगेच मला कळवले म्हणून मीहि लगेच आपल्या ब्लॉगवर ती देतो आहे. आपण जरूर पहा व अभिप्राय द्यायला विसरू नका!
http://www.weather.com/multimedia/videoplayer.html?from=email&bcpid=823425597&bclid=877032950&bctid=28524678001
नमुन्यादाखल इंटरनेटवर मिळालेले दोन फोटो सुरवातीला दिले आहेत.
No comments:
Post a Comment