एक दिवसाच्या सहलीकरिता वसईला भेट हा एक छान पर्याय आहे.
पार्ल्याहून लोहमार्गाने वसई गांवांत साधारणत: एक तासांत पोहोचता येते. तर रस्त्याने दीड तासांत.
वसईचा किल्ला [ हा वसई खाडीवर आहे ], समुद्रकिनारा, भुइगांवचा स्वामी समर्थ मठ, निर्मळ [ दक्षिण काशी ] येथील शंकर मंदीर, गिरीजच्या हिरा डोंगरीवरील दत्त मंदीर, नायगांव [ कोळीवाडा ] येथील वाल्मिकी मंदीर, खोचिवडे [ कोळीवाडा ] येथील मंदीर, ख्रिश्चन चर्चेस ही स्थाने पहाण्याजोगी आहेत. गांवांतून आंतल्या रस्त्याने फेरफटका मारताना वाटेतील छोटेखानी बंगले व सभोवतालच्या लहानमोठ्या बागा पहाणे हा एक सुखावह अनुभव आहे.
समुद्रकिनार्यावर सुरूच्या झाडांची लागवड आहे. या भागाला सुरूची बाग असेच म्हणतात. वाहन एक ठरावीक अंतरापर्यंत जाते. पुढे सुमारे एक कि. मि. चालावे लागते.

1 comment:
must visit now
Post a Comment