Thursday, November 26, 2009

( सोबतीचे एक सभासद व कवी श्री. कृष्णकुमार प्रधान यांची एक रचना )
म्यान तलवार …
संपेल आयुष्य एकदाचें
तर सुटेल हे मन सांचे

आजवरी केली बंडखोरी
मांडिला दावा शरिराशी

शरीर पण हे इतुके हट्टी
मनाशी धरिली तयाने कट्टी

कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणु त्याचा अरी

कधि शरिरावर येई शहारा
कभि तेरे यादने मारा

मन घाली देहा लगाम
हे पाप, तुझे इथे काय काम ?

असे दोघांचे चाले रणकंदन
परि होणार नाही विभाजन

1 comment:

कृष्यणकुमार प्रधान said...

2 तारखेस होणार्या कविसंमेलनात ही कविता मी वाचावी अशी सूचना २५ नोवेंबर च्या सभेचे अध्यक्ष श्री.ठोसर ह्यांनी केली आहे पण मला वाटते की तिचे नाव द्वंद्व असे असावे व पहिल्या दोन ऒळी बदलून
"हा जीव जोवरी जगतोहे
तोवरी मन शरीरी गुंतुनी राहे"
अशा असाव्या.चूक्भूल द्यावी घ्यावी