लाइमस्टोन हा असा खडक आहे की तो सौम्य आम्लांत सुद्धा किंचित विरघळतो व तो किंचित सच्छिद्रही असतो . वातावरणातला कर्बद्वीप्राणील वायू पाण्यांत मिसळला की सौम्य कार्बॉनिक आम्ल तयार होते . ते या खडकातून पाझरताना कॅल्शियम युक्त द्रव संयुग तयार होते . पाझरत पाझरत जेव्हा याचे थेंब गुहेच्या छताशी येतात , तेव्हा त्या थेंबातील बाश्प निघून जाते. ह्या सतत चालू असलेल्या प्रक्रियेतून सुरपारंब्यांच्या सदृश शिल्पे आकारतात . यांना स्टॅलॅक्टाइट्स् म्हणतात .
जर हे थेंब द्रव स्थितीत असताना छतावरून गुहेच्या तळाशी पडत राहिले व तेथे त्यांतील बाश्प निघून जाण्याची क्रिया संपली की तळाशी थोडी वेगळ्या आकाराची शिल्पे आकारतात . त्यांना स्टॅलॅग्माइट्स् म्हणतात .
गुहेत काळोख असल्यामुळे , प्रेक्षकांना ती दिसण्याकरिता विजेच्या रंगी-बेरंगी दिव्यांचा प्रकाश व सजावट असते . चीनमध्ये मी पाहिलेल्या गुहेत , एके ठिकाणी , स्टॅलॅक्टाइट्स् चा झिरझिरित पडदाच तयार झाला होता व एका बाजूचा प्रकाश त्यांतून दुसर्या बाजूने दिसत होता . पाण्याच्या झिरपण्यामुळे , या गुहांत आर्द्रता बरीच ज्यास्त असते .

No comments:
Post a Comment