Monday, February 08, 2010

नऊ उत्तम रेल्वे प्रवास

[६] पॅलेस ऑन व्हिल्स
गाडीत पाय टाकताच , या नांवाप्रमाणेच आंतील व्यवस्थेचा साक्षात्कार होतो . दिल्लीहून निघणारी ही ट्रेन राजेशाही राजस्थानांतून , आलिशानतेचा अनुभव देत – जसा होऊन गेलेल्या राजे-महाराजांनी अनुभवला - नेऊन आणते . परदेशी प्रवाशांच्या अनुभवांत भर म्हणून कोळशाच्या एंजिनने गाडी दिल्लीबाहेर काढली जाते . (आज जगांत कोळशावर चालणारी रेल फार कमी ठिकाणी आहे .) जयपूरला स्वागताला हत्ती महाराज असतात . लंच उदयपूरच्या लेक पॅलेसमध्ये होते . जैसलमेरला उंट सफारी ! आणि सायंकाळ आग्रा येथे ताज महालात . पॅलेस ऑन व्हिल्स् हा केलाच पाहिजे असा एक रेल प्रवास आहे .

[७] इस्टर्न and ओरिएंटल एक्सप्रेस
अत्याधुनिक सिंगापुर आणि बॅंगकॉक मधील हा प्रवास , उच्च प्रतीचा व आरामदायक तर आहेच . शिवाय तो विषुववृत्ता जवळील हिरव्या गार व दाट जंगलातून होतो . शहरी भागांतील खाद्यपदार्थांची विविधता व इतरत्र होणारे गतकाळाचे दर्शन यामुळे हा प्रवास स्मरणीय होतो .



[८] रॉयल स्कॉट्स्मन
तुम्हाला जर हा प्रवास करायचा असेल तर खिसा फारच गरम असायला हवा . पृथ्वीवरील हा महागडा प्रवास आहे . यातील observation car मध्ये फक्त ३६ प्रवासी – होय , फक्त ३६ – बसतात . प्रत्येकाला आरामदायक आसन व जेवण आणि इतर सोयींकरिता खास तयार केलेल्या केबिन्स असतात . रात्री जेव्हा झोपेची गरज असते , तेव्हा ट्रेन निघते . अनेकांना ज्ञात नसणारे धबधबे , पर्वत आणि दर्यांमधून होणारा हा प्रवास सामान्यांकरिता नाहीच !



[९] ट्रांस सैबेरियन रेल्वे
रशियाच्या ६००० मैल विस्तारांतून होणारा च पृथ्वीचा जवळ जवळ १/३ व्यास व्यापणारा हा प्रवास सर्व रेल प्रवासांचा आजोबाच म्हणायला हवा . व्लॅडिओस्टॉक ते सैबेरियांतून मॉस्कोमार्गे सेंट पिटर्सबर्ग पर्यंत होणारा १९ दिवसांचा हा प्रवास , इतर कोणत्याही प्रवासांत ’मिळणार’ नाही इतके ’देऊन’ जातो . एके काळी पॉलिटब्युरो मेंबर्सनी ज्यांतून प्रवास केला ते डबे , खास खानसाम्यासहित , दोन बेड रुम्स , न्हाणी घर व डायनिंग रुममध्ये रुपांतरित केले आहेत . सात टाइम-झोन्स (time zones) मधून होणारा हा प्रवास तुम्हाला अत्युत्कृष्ट अनुभव देऊन जातो की ज्याची आठवण आयुष्यभर रहावी .



No comments: