अमेरिकेत तुमचीं पत्रे टाकण्यासाठी पेट्या लावून ठेवावयाच्या असतात. स्वतंत्र घर असेल तर रस्त्याच्या कडेला तुमची पेटी हवी. या पेट्या ठराविक आकाराच्या असतात. मात्र घरमालक स्वत:च्या हौसेने सजावट करुं शकतो. आमच्या घराच्या आजूबाजूला सर्व स्वतंत्र घरे आहेत. अनेक प्रकारच्या पोस्टाच्या पेट्या पहावयाला मिळतात. फिरायला गेलो असताना सहज म्हणून मी निरनिराळ्या डिझाईनच्या पेट्यांचे फोटो घेतले. त्यांत एक फोटो एका चर्चच्या पेटीचाहि आहे. सहज ओळखेल. काही पेट्या अगदीं साध्या तर काही सुरेख बांधून काढलेल्या. पेटीच्या खांबावर बहुधा घर नंबर पण लिहलेला असतो. दोन शेजारी मिळून एका खांबावर दोन पेट्या गुण्यागोविंदाने नांदताहेत असाही एक प्रकार दिसेल. आणि या बंदिस्त.
There is one unique feature of these boxes which you didn't mention here. These letter boxes are not locked like the boxes here in India. They are open so that postman or postwoman can drop your letters, magazines etc. And no one touches them in your absence even. Mangesh Nabar
पेट्याना कुलपे नसतात हे बरोबर आहे. आपल्याला आलेली पत्रे पोस्टमन पेटीत टाकतो. आपल्याला पाठवायची पत्रे पेटीत ठेवून दिली तर तीं तो घेऊन जातो. पोस्ट खात्याच्या वेगळ्या आपल्यासारख्या पेट्या नसतात!
’सोबती’ ही विले-पार्ले, मुंबई येथील ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे. बहुतेक सभासदांचा संगणक, ब्लॉग वगैरे गोष्टींशी फारसा परिचय नाही. त्यांचे वतीने श्री. प्र. के. फडणीस यांनी हा ब्लॉग सुरू केला.’सोबती’ने हा ब्लॉग चालवण्याचे काम दि.०१/०१/२००९ पासून स्वत: स्वीकारले आहे. कार्यकारी मंडळाचे वतीने श्री. विश्वास डोंगरे हे काम पाहत आहेत. त्याना आवश्यक ती मदत श्री. फडणीस करतात. श्री. चंद्रकांत पतके यांचाही आता ब्लॉगलेखकांत समावेश झाला आहे. सोबती सभासदांचे लेख, कविता येथे वाचावयास मिळतील. सोबतीच्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती वेळोवेळीं दिली जाईल. आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर नोंदवा. त्या ’सोबती’ सभासदांना वेळोवेळी कळवल्या जातील
सोबतीचे पदाधिकारी
अध्य्क्ष : श्री. मुकुंद पेठे
उपाध्यक्ष : श्री. सुरेश निमकर
कार्य़ाध्य्क्ष : श्री. विश्वास डोंगरे कोषाध्यक्ष : श्रीमती वैजयंती साठे
कार्यवाह : श्री. विजय पंतवैद्य कार्यवाह : श्रीमती शीला निमकर
सोबतीचें समाजकार्य व निधि
’सोबती’ प्रत्यक्ष समाजकार्य करत नाही. मात्र सोबतीने सभासदांकडून व इतरांकडून देणग्या मिळवून खालील निधि सुरू केले. वेळोवेळी संस्थेच्या वार्षिक उत्पन्नातून त्यांत भरहि घातली. निधींच्या गुंतवणुकींवर मिळणार्या व्याजाचा उपयोग निधींच्या उद्दिष्टांप्रमाणे समाजकार्यासाठी केला जातो.
२.समाजकल्याण व विकास निधि : समाजकार्य करणार्या लहानमोठ्या संस्थाना आर्थिक सहाय्य.
३. ज्येष्ठ नागरिक सेवा-सुविधा निधि : गरजू ज्येष्ठ नागरिकांस वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत.
’सोबती’च्या वार्षिक अहवालांमध्ये याबद्दल विस्तृत माहिती दिली जाते.
वाचकांस या उपक्रमांना आर्थिक सहाय्य करावयाचे असल्यास pkphadnis@yahoo.com वर संपर्क साधावा. देणग्यांवर प्राप्तिकर सवलत मिळते.
वाचणारांचे स्वागत
किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. खाली जगाच्या नकाशात वाचणारांचे स्थानहि पहावयास मिळेल. सोबती जगभर वाचला जातो आहे आणि त्यांत अनेक तरुण पण असतात याचा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना आनंद आहे. आपल्या प्रतिक्रियाही देण्यास विसरू नका.
4 comments:
हा चित्रमय लेख मला आवडला.अश्या गोष्टीं मुळे तेथील संस्कृती पण कळते व नकळत तुलना ही होते.
नमस्कार प्रभाकरपंत,
’सोबती’ च्या सर्व पदाधिकार्यांना आणि सभासदांना आमच्यातर्फे नवसंवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
There is one unique feature of these boxes which you didn't mention here. These letter boxes are not locked like the boxes here in India. They are open so that postman or postwoman can drop your letters, magazines etc. And no one touches them in your absence even.
Mangesh Nabar
पेट्याना कुलपे नसतात हे बरोबर आहे. आपल्याला आलेली पत्रे पोस्टमन पेटीत टाकतो. आपल्याला पाठवायची पत्रे पेटीत ठेवून दिली तर तीं तो घेऊन जातो. पोस्ट खात्याच्या वेगळ्या आपल्यासारख्या पेट्या नसतात!
Post a Comment