Friday, March 06, 2009

वय झाले. जरा जपून

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. गोविंद जोग यांची खालील कविता लहान असली तरी तिचा आशय मोठा आहे. नागरिक वयाने जरी ज्येष्ठ झाले तरी वाढत्या वयात शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य यांच्यासाठी काही गोष्टींची जपणूक आवश्यक ठरते. कसे ते श्री. जोगांच्या शब्दात वाचा.

ज्येष्ठत्वात जरुरीची जपणूक

खाताना तुम्ही हात आंवरा, चर्वणात पण उणिव नको ।
वाहनवापर कमीच ठेवा, चालण्यात परी कसर नको ॥
उगा ललाटी नकोत आंठ्या, सुहास्यवदना खीळ नको ।
जपुन वापरा शब्दशस्त्र तुम्ही, चिंतनात कधी खंड नको ॥
टीका करता संयम ठेवा, हाती सदा नवनिर्मिती घडो ।
उगा न गुंता विचारमंथनी, सत्कृतीचा ना विसर पडो ॥

कवी: गोविंद जोग

2 comments:

शेखर जोशी said...

सोबतीच्या सर्व सदस्यांना नमस्कार
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला ब्लॉग वाचला. चांगला आहे. जोग यांची समर्पक व योग्य आहे.
शेखर जोशी

mannab said...

Excellant creation, Govindrao Jog! Keep it up!! You may add only one, friendship to this. Thanks a lot.
Mangesh Nabar