
कीर्तन विषय


श्री.विश्वास डोंगरे

श्री. सी. भा. दातार

’सोबती’ चा प्रेक्षकगण
श्री. विश्वास डोंगरे यानी आद्य क्रांतिकारक हुतात्मा वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विषयावर ’सोबती’च्या साप्ताहिक कार्यक्रमांत सुश्राव्य कीर्तन सादर केले. श्री. डोंगरे हे काहीं व्यावसायिक कीर्तनकार नव्हेत पण कीर्तनकला व शास्त्र त्यानी पूर्णपणे आत्मसात केले असल्याचा कीर्तन ऐकताना प्रत्यय येत होता. कीर्तन हा आद्य एकपात्री प्रयोग म्हणतां येईल. संगीत, तत्वज्ञान, अभिनय अशा अनेक अंगांचा अभ्यास कीर्तनासाठी आवश्यक असतो. श्री. डोंगरे यांचे पारंपारिक वेषांतील हे कीर्तन सर्वार्थाने रंजक व उद्बोधक झाले.
श्री. डोंगरे यांना ’सोबती’चेच सभासद असलेल्या श्री. चंद्रकांत शिरोडकर व श्री सी. भा. दातार यांनी तबला व पेटीवर उत्कृष्ठ साथ करून कीर्तनरंग बहराला आणिला. त्या कार्यक्रमाची ही बोलकीं छायाचित्रे श्री फडणीस यांनी टिपली आहेत.
No comments:
Post a Comment