Monday, February 02, 2009

निरोप आणि स्वागत - मावळते आणि नववर्ष.

सोबतीचे साप्ताहिक कार्यक्रम दर बुधवारी असतात. संयोगवश २००८ चा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर बुधवारीच होता.
शिवाय शेवटचा बुधवार असल्याने डिसेंबर महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस होते तेही सामुहिकपणे साजरे झाले. सन २००८ ला निरोप आणि २००९ या नववर्षाचे स्वागत हाही कार्यक्रम या वेळी साजरा झाला।

सामुहिक वाढदिवसातील काही सहभागी सभासदानी आपले मनोगत भाषणाद्वारे व कवितांद्वारे व्यक्त केले. सोबतीच्या ज्येष्ठ सभासद श्रीमती विजया लेले यानी स्वरचित २००८ ला निरोप व २००९ चे स्वागत करणारे गीत सादर केले. शिवाय दुस-या ज्येष्ठ सभासद श्रीमती विद्या पेठे व श्रीमती नंदा देसाई यानीही आपल्या सुस्वर आवाजात विविध गीते सादर केली व कार्यक्रमात रंगत आणली।

एकमेकाना शुभेच्छा देऊन व अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन या आनंददायी कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments: