Friday, February 13, 2009

विजया लेले - एक कविता

श्रीमती विजया लेले (७५) सोबतीच्या एक ज्येष्ठ सभासद व कार्यकर्त्या. कविता लेखन हा त्यांचा छंद. प्रसंगोचित कविता हे त्यांचे वैशिष्ट्य. त्या कविता स्वत: गाऊन सादर करतात.

कोणतीही स्त्री लग्न होऊन सासरी कितीही वर्षे राहीली तरी तिच्या माहेरासंबंधीच्या भावना कायम असतात. श्रीमती लेले यानी त्यांच्या कोकणातील माहेरच्या आठवणी त्यांच्या खालील कवितेत जाग्या केल्या आहेत.

रेशमी बंध --------

दोन डोंगरांच्या कुशी, आई वडिलांच घर,
चहूबाजूला अंगण, वर कौलारु छप्पर
पाणी पाटाच दाराशी, केळी, नारळ, पोफळी
आंबा, फणस, कोकम त्यांची गर्दशी सावली,
चाले सदोदित ये-जा, जात्या-येत्या पाहुण्यांची,
घरी दारी लगबग, माझ्या माय माउलीची.
गोठा भरला गुरानी, रेलचेल दुभत्याची,
हातसडीचे तांदूळ, गोडी अवीट भाताची.
ऒलांडीला उंबरठा, खूप वर्षे त्याला झाली,
नाही समजले मज साठी कधी आली.

माझ्या घरी सुखी आहे, नाही कशाचीच वाण,
तरी बाई नकळत आठवते बालपण.
आता तिथे नाही काही घर असे सुने सुने,
गेल्या सुकुनिया बागा, अंगणात झाली राने.
पण अजून तिथला, मोह नाही कमी होत,
नाजुक रेशमी बंध, नाही तुटता तुटत.

कवयित्री: श्रीमती विजया लेले

1 comment:

कृष्यणकुमार प्रधान said...

Dear Parlekars
Please see my poems composed in June 2009 below
I hope you will like them,
Thanks,
Krishnakumar Pradhan

Tuesday, June 30, 2009
कन्या माझी लाडकी
कविता आहे माझी कन्या
हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा
एक दिवस तरी द्या माहेरा[[
मला प्रिय आहे बालपणची छबी
परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची, त्यांत करवंदे
तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।
सासरी तिला तुम्ही कशीही नटवा
व्रुताचा ड्रेस नाहीतर चालीची सडी नेसवा
झोपाळ्यावर झुलवा किंवा मखरात बसवा
माहेरची सय येता तिने गाळू नयेत आसवा
माहेरी मात्र कसाही वागण्याचा चेक द्या कोरा
माझ्या आठवणीत रहावा तिचा मुळचाच चेहरा
म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा ,
एक दिवस तरी द्या माहेरा .
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 3:37 PM 0 टिप्पणी(ण्या)
लेबले: सौ.पार्लकर कायस्थ
Saturday, June 27, 2009
शय्येवरील चारोली
कुंद ही s हवा
सुखावितो गा sरवा
परीची गोड़ गोड़ स्वप्ने खरीच होतील का ?
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 2:50 PM 0 टिप्पणी(ण्या)
Thursday, June 25, 2009
हुरलून नाही गेलो (रामबाणवर)
पाठ थोपटून घेतानाही थरथर जाणवते
थोपटणा-या ची अंगठी खङा जणू रुपवाते
कविता भन्नट आहे,आवडली आपल्याला
असे म्हणणा-या चा एक डोला मिटलेल्ला
त्याची द्रष्टी संकुचित तर नाही ना
ही काळजी लागून राहते मना
श्रोत्यावर मनापासून प्रेम असते ना
म्हणूनच काळजी,जशी मुलांची आयांना
उपदेश कुठलाही करत नाही त्याला
पण एक सांगतो त्याचा विचार भला
दोन्ही डोळ्यांनी पहाल तर नीट दिसेल
समोरच्या वस्तूचे मोजमाप काय असेल
कवि पृथ्वीकडे पहातो एक आई म्हणून
तसेच कल्पना चावला सारखा दुरून दुरून
मराठीत ग्रह सारे आहेत पुल्लिंगी
पण पृथ्वी एकटीच स्त्रीलिंगी
म्हणून तिची तुलना केली स्त्रीशी
केली तर कुठे शिंकली माशी
पण हेही खरेच आहे
की स्त्री ही माता आहे
म्हणूनच ती पूज्य आहे
हे विसरले तर मात्र सारेच पूज्य आहे
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 4:31 PM 0 टिप्पणी(ण्या)
Monday, June 22, 2009
किशोरीम्चे गाणे (चाल चला चला ग सयांनो )
या ग या,या ग या,या ग या,
सख्यांनो,माझ्या ग ,संगती खेळाया[ध्रु ]
ष्रावणसरींच्या शिडकाव्याखाली
केसांची बट ही झुकली कपाळी
घरात म्हणू दे आईला भूपाळी
आपण मोकाट हिन्डू रानोमाळी[१]

झाडांना बान्धूया दोरांचे झोपाळे
मुलिम्नो घेऊ या आपण हिंदोळे
डोंगर हिरव्या शाली लपेटती
दुधाळ फेसाळ धारा झेपावाती[2]

खड़क ओले हे हळूच ओलांडी
बेडूक पाहून जाईल झोकांडी
त्यांना गिळण्याला येइल नागीण
भिऊ नको आला पंचमीचा सण[३]

या ग या,या ग या,या ग या,या ग या
सख्यांनो ,माझ्या ग, संगती खेळाया
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 3:29 PM 0 टिप्पणी(ण्या)
लेबले: सौ.पार्लेकर कायस्थ
Saturday, June 20, 2009
रामबाण
हिन्दुकुशाच्या घलीतुनी जाई सिंधु
जसे छातीच्या बुरुजातुनी घर्मबिंदु
चला,अडवू तरी तिचे पानी
घडा पापांचा भरलाय गीडवानी
पाणी अड़वुनी होणार नाही पाप
जगह मारया उद्युक्त असे पाक
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 3:51 AM 1 टिप्पणी(ण्या)
लेबले: परीक्षणार्थ
Friday, June 19, 2009
नाती
नववाधूचे आसू पुसती
माहेरची मायेची नाती
नवी जोडण्या हवीच प्रीती
पतिदेवासह परिवारावरती।

जसे पिल्लू कोकिळेचे
जन्म घेउनी काकाच्या घरटी
निसर्गाप्रेरित नसेल माया
तरी कावळीस म्हणेल आया

एक बारे तरी पक्ष्यांमधली
नसते पद्धत जौइंट फामिली
असती तर मग याशोदामाइचे
कृष्ण गाईला जसा गोडवे
कोकिळ्कंठातून उमटले की
असते स्वर जय काकी काकी

मानवाचे तर सारे न्यारे
सासू सूनेतुनी विस्तव जाई
पुत्र पित्यास पण म्हणतो का रे
पत्नीला मम छळते आई?
द्वारा पोस्ट केलेले baba येथे 3:58 PM 0 टिप्पणी(ण्या)
Monday, June 15, 2009
श्रद्घा
पाउस रिप रिप पडतो आहे
जागोजागी चिखल झाला आहे
चिखलात रुतले जरी पाउल
तरी मनाचा,ढळू देऊ नाका तोल
जीवन हे असेच डबकेआहे
त्यांत रुतालेल्यांना ते जाणवत नाही
पाण्यात रहाणार्या माशांनाही
बाहेरच्या जीवनाची कल्पना नाही
मासे जसे पाण्यांतुनच वायु खेचतात
तसे आपणही चिखलात प्राणवायु घेतो
कोणाच्या जीवनाच्या गाडीचे तर
एक चाक गेले तरी ती फिरते आ-यावर
ओढणारे बैल तर केव्हांच गल्ले असतात
दुसर्या गाडीचा शोध घेत असतात

पंतुम्ही मुळीच घाबरू नाका
चिखालाताल्या गाडीला असतो फुगा
गाडीच्या जूला उचलून धरतो
त्यालाच आपण श्रद्घा म्हणतो।


trail