Monday, August 17, 2009

गोल्डन गेट ब्रिज - सान-फ्रान्सिस्को



पुलावर जाण्याचा उत्तरदिशेचा मार्ग






मी सध्या अमेरिकेत सान फ्रान्सिस्कोच्या जवळच्या एका शहरात आहे. शनिवार दि. १५ ऑगस्टला आम्ही येथील गोल्डनगेट या प्रख्यात पुलाच्या सान्निध्यात फिरलो. पॅसिफिक महासागरांतून सानफ्रान्सिस्को बंदरांत शिरण्यासाठी एक-दीड मैल रुंद अशी मोठी वाट आहे. आंत अतिशय विस्तीर्ण असा उपसमुद्र आहे. त्याच्या पश्चिम बाजूस सानफ्रान्सिस्को व पूर्व बाजूस ओकलॅंड अशीं मोठीं बंदरे आहेत. ओकलॅंड बंदरावर कंटेनर चढवण्या-उतरवण्याच्या न्हावा-शेवा बंदरासारख्या उत्तम सोयी आहेत. सानफ्रान्सिस्को या जुन्या बंदराची परिस्थिति थोडीफार मुंबईबंदरासारखी झाली आहे. तेथे फारशीं जहाजे येत नाहीत! San Francisco Bay च्या मुख्य प्रवेश-वाटेवर गोल्डन-गेट हा विख्यात पूल आहे. याला Suspension Bridge असे म्हणतात. दीर्घकाळपर्यंत या प्रकारचा हा जगातला जास्तीतजास्त मोठा (4200 Ft.) Span होता. पुलावर दोन्ही दिशांना ४-४ लेन आहेत. गाड्यांचा प्रवाह अखंड चालू असतो. हा पूल सरकारी मालकीचा नाही. स्वतंत्र कंपनी स्थापन करून कर्ज उभारून हा बांधला गेला. ही मालक कंपनी शहरांत येणार्‍या वाहनांकडून टोल वसुली करते व नफा कमावते पण पूल अतिशय उत्तम स्थितीत राखलेला आहे. दोन्ही बाजूंना पादचारी मार्गहि आहेत. प्रेक्षकांचीहि कमतरता नसते पण सर्व बाजूंनी पाहतां येण्याच्या उत्तम सोयी केलेल्या आहेत. फोटो काढण्यास मुक्तद्वार आहे.
पुलाच्या दक्षिणेला शहर भिडलेले आहे. उत्तरेला वस्ती जरा दूर आहे व डोंगरभाग आहे. तेथे दीर्घकाळपर्यंत एक किल्ला व लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. मात्र पूल झाल्यावर येथे शत्रूची जहाजे कधी आलीच नाहीत. आता तोफा नाहीत व फौजहि नाही. नं. १०१ हा मोठा रस्ता शहराच्या दक्षिणेकडून येऊन या पुलावरून उत्तरेला दूरवर जातो.
पुलाचे फोटो व फिल्म आपण पहावी. काही माहिती-फलकांचे फोटोहि मुद्दाम दिले आहेत. सर्व सानफ्रान्सिस्को बंदराचाहि एक देखावा आहे. (तो मोठा दिसण्यासाठी त्यावर क्लिक करावे.)

3 comments:

अपर्णा said...

photos chan aahet...Pulachya dusarya bajula ajun thoda pudhe ek Muir woods mhanun forest aahe..tithe june shekadto warshapurviche Red woods jungle aahe..aawadel tumhala...

Satish Gawde said...

छान फोटो आहेत... माहीती चांगली आहे

गोल्डन गेटला पडीक असुनही ही माहिती आम्हाला कधीच मिळाली नाही. (किंवा पाहण्यासारखे बरेच काही असल्याने ही माहिती मिळवण्याच्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. Just Kidding...)

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद.
त्याच दिवशी आम्ही नंतर म्युरवुडलाही गेलो होतो! त्याबद्दल पुढील लेखात वाचावयास मिळेल