
डॉ. म्यूरचा लाकडी पुतळा

>


रेडवुड झाडाचा छेद


झाडांच्या मध्ये थोडेसे आकाश
म्यूरवुड
गोल्डन गेट ब्रिज पाशी बराच वेळ घालवून नंतर आम्ही पुलावरून उत्तर दिशेला जाणार्या रस्ता नं.१०१ ने ३०-४० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या म्यूर वुड या ठिकाणाला भेट दिली. हे एक National Monument आहे. डोंगरांच्या विळख्यात असलेले हे एक अतिशय निसर्गरम्य स्थळ आहे. हा एक शेकडो-कदाचित हजारो- वर्षां पासून अस्तित्वात असलेला जंगल विभाग आहे. येथे रेडवुड जातीचे अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. यांतून फिरण्यासाठी आवश्यक तेवढीच तोड करून बाकीचे जंगल जसेच्या तसे राखलेले आहे. Red Wood -Sequoia या जातीचेच बहुतेक वृक्ष येथे आहेत. हे झाड सरळसोट खूप उंच वाढते व शेकडो-हजारो वर्षे जगते! उंची २५० ते ४०० फूटहि होते. खूप जुन्या झाडांचा घेरहि मोठा होतो. नवलाची गोष्ट म्हणजे उंचीच्या मानाने या झाडाचीं मुळें फार खोलवर जात नाहीत तर जमिनीलगतच दूरदूर पसरतात. तरीहि हीं झाडे वार्या-वादळाला यशस्वीपणे तोंड देऊन दीर्घकाळ जगतात.
हे वैशिष्ट्यपूर्ण जंगल नीटपणे जतन व्हावे म्हणून एका निसर्गप्रेमी व्यक्तीने (विल्यम केंट) विकत घेऊन या झाडांची होऊं घातलेली कत्तल थांबवली व मग हे जंगल केंद्र सरकारच्या ताब्यात दिले जाऊन त्याचे राखीव National Monument झाले. याबद्दलची माहिती देणारा फलक येथे लावलेला आहे. (फोटो पहा). डॉ. म्यूर हा एक विख्यात निसर्गप्रेमी होऊन गेला. त्याचे उचित स्मारक म्हणून त्याचे नाव या राखीव जंगलाला दिले आहे. येथील वृक्षराजी घनदाट आहे व संध्याकाळची वेळ झाल्यामुळे फोटो काढणे अवघड होते. फोटो काढण्यास मात्र मुक्तद्वार होते. जमले तसे फोटो काढले. येथे एक छोटे Coffee Shop होते. तेथे लाकडात कोरलेला डॉ, म्यूरचा पुतळा होता. इतरहि काही पुतळे होते. Red Wood मध्ये कोरीव काम सुरेख होते व लाकडाचे रंगहि मोहक दिसतात. अनेक लहनमोठ्या कोरीव वस्तू विक्रीसाठी होत्या मात्र त्यांच्या किंमती खूपच वाटल्या. जंगलाचे व इतर काही फोटो पहावयास दिले आहेत. पण म्युरवुडचे सौंदर्य वर्णन करणे वा फोटोत पकडणे सोपे थोडेच आहे? ज्याला जमेल त्याने अवश्य पहावे. सूचना : कोणत्याही फोटोवर क्लिक केले तर फोटो मोठा होईल.
No comments:
Post a Comment