’सोबती’च्या प्रथेप्रमाणे दि. ३० जुलैला, बुधवारी, ज्या सभासदांचे जन्मदिन जुलै महिन्यात येतात त्यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित सभासदाना स्टेजवर बसवण्यात आले व एकेकाचे नाव घेऊन त्याना कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे हस्ते छोटासा पुष्प्गुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर त्याना आपले मनोगत सांगण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. बहुतेक सभासद यावेळी स्वत:बद्दल काही माहिती सांगतात, कथा, कविता, गाणी, ऐकवतात, छोटासा करमणुकीचा कार्यक्रमहि करतात. या वेळीहि असेच कार्यक्रम झाले त्यातील काहींचा हा छोटासा वृत्तांत. श्रीमती नंदा देसाई यानी सुरवातीलाच काही सुरेख गाणी ऐकवली. ’आठवण-विस्मरण’ हा त्यांचा विषय होता. त्यातील ’विसरशील खास मला’ हे गाणे छानच झाले. श्री. मधुकर देसाई यानी पेटीवर व त्यांच्या नातवाने तबल्यावर साथ केली. असा हा कौटुंबिक कार्यक्रम झाला. श्री. व. ना. गोडबोले, वय ८८ वर्षे, यानी व्हायोलिनवर ’यमुनाजळि खेळू’ हे जुने गाणे व एक छोटी धून वाजवली. श्री. गोडबोले हे एअरफोर्स व सिव्हिल एव्हिएशन मध्ये नोकरी करून केव्हाच निवृत्त झाले. त्याना चालण्याची आवड आहे व अनेक विक्रम केले आहेत. या आवडीमुळेच पंढरीच्या वारीत भाग घेतला आहे. सर्व गीता तोंडपाठ आहे व रोज त्यातील अनेक श्लोकांची जातायेता उजळणी होते. या वयातहि रोज नित्यनेमाने थोडावेळ तरी व्हायोलिन वाजवण्याचा रिजाझ होतो! त्यांच्या वाजवण्यातून तो अर्थातच जाणवत होता. प्रा. चिं.त्र्यं. येवलेकर यानी एका आठवणीतील कवितेचा परिचय करून दिला व ती वाचली. श्रीमती पटवर्धन यानी एक रूपकात्मक बोधकथा सांगितली. समुद्र्काठच्या एका गावावर येऊ घातलेल्या एका वादळाच्या संकटाची गावकर्यांना जाणीव करून देण्यासाठी टेकडीवरील आपल्या कापणीला आलेल्या शेताला स्वत:च आग लावणार्या स्वार्थत्यागी म्हातार्याची ही कथा बरेच सांगून गेली. श्री. कर्हाडकर हे बरीच वर्षे नेमाने वारीला जातात. त्यानी वारीबद्दल खूप माहिती सांगितली. वारीची ठरलेली मुक्कामाची गावे, वारीतील वातावरण, त्याना आलेले बरेवाईट अनुभव त्यानी वर्णन केले. इतरहि उपस्थितांचे मनोगत सांगून झाल्यावर अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपला. यानिमित्ताने वाढदिवस झालेल्यानी सोबतीला देणग्या दिल्या. सोबतीच्या उत्पन्नात अशा देणग्यांचा महत्वाचा भाग असतो. वाढत्या वयामुळे काही सभासद अशा कार्यक्रमाना येऊ शकत नाहीत. त्यातील काहींची पत्रे मात्र आवर्जून येतात व ती वाचली जातात. श्री. गोडबोले यांच्या घरी झालेल्या त्यांच्या व्हायोलिन वादनाची एक छोटी झलक खालील दोन चित्रफितीत पहावयास मिळेल.
Wednesday, August 13, 2008
Subscribe to:
Posts (Atom)