Monday, November 30, 2009

संदीप उन्निकृष्णन – २६/११/२००८ चा हुतात्मा
“संदीपने नॅशनल सिक्युरिटि गार्ड ( N.S.G.) मध्ये जाण्याचे आम्हाला आजही दु:ख नाही,” संदीपचे आई – वडील धनलक्ष्मी व के. उन्निकृष्णन म्हणतात. २६/११ च्या प्रथम स्मृति दिनानिमित्त ते मुंबईत होते.
“संदीपला अंतीम कामगिरीवर पाठविणार्‍या N.S.G. कडून आम्हाला अधिक सह्रुदयतेची अपेक्षा होती. N.S.G. च्या मानेसर येथील स्मारकांत, संदीपच्या नांवांत चूक होती. नांवांतील कांही अक्षरे गळून खाली पडली होती. आम्ही दोघांनी ती गोळा केली. आता ती व्यवस्थित लावली आहेत असे कळते.”
संदीपच्या आई-वडिलांनी जणू कोणत्याही प्रसंगास सामोरे जाण्यास तयार असावे अशाच उद्देशाने तो त्यांच्याशी मृत्यु बद्दल उदासीनतेने बोले. म्हणे,”बंदुकीच्या प्रत्येक गोळीवर ती कोणाचा बळी घेणार त्याचें नांव लिहिलेले असते. पण मी जेव्हा मृत्युला सामोरा जाईन तेव्हा, आई , हजारो लोक तुझ्याबरोबर असतील.”
एकदा आई-वडिलांच्या सोबत तो जेव्हा खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमींत भेट देण्यास गेला तेव्हा, जेथे अकादमीत शिकून गेलेल्या व हौतात्म्य पत्करलेल्यांची नांवे जेथे कोरलेली असतात त्या ठिकाणी म्हणाला होता,”उद्या कदाचित माझेही नांव येथे असेल.” उन्निकृष्णन म्हणतात,”ते ऐकून आमच्या जिवाचा थरकांप झाला. पण आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नाही की हे उद्याचे सत्य असेल.”
संदीपला ज्या ठिकाणी वीर-मरण आले तेथे ते २६/११ च्या शुक्रवारी कांही वेळ स्तब्ध उभे राहिले.

Thursday, November 26, 2009

( सोबतीचे एक सभासद व कवी श्री. कृष्णकुमार प्रधान यांची एक रचना )
म्यान तलवार …
संपेल आयुष्य एकदाचें
तर सुटेल हे मन सांचे

आजवरी केली बंडखोरी
मांडिला दावा शरिराशी

शरीर पण हे इतुके हट्टी
मनाशी धरिली तयाने कट्टी

कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणु त्याचा अरी

कधि शरिरावर येई शहारा
कभि तेरे यादने मारा

मन घाली देहा लगाम
हे पाप, तुझे इथे काय काम ?

असे दोघांचे चाले रणकंदन
परि होणार नाही विभाजन

Wednesday, November 25, 2009

पुरेशी झोप आणि हार्ट अटॅक ... काय संबंध ?

झोप व हार्ट अटॅक – रंजन दासचा मृत्यु कशामुळे ?
रंजन दास हा SAP या बहु-देशीय अग्रगण्य कंपनीचा भारतीय उपखंडातील सर्वांत तरूण – वय ४२ वर्षे- C.E.O. होता. अलिकडेच, त्याचा अकाली मृत्यु झाला. एका दिवशी, व्यायामशाळेतून तो परतला व massive हार्ट अटॅकने तो गेला. ती एक, विविध खेळांत भाग घेणारी, शरीर संपदा जपण्याकरिता प्रयत्नशील – मॅरॅथॉनमध्ये सुद्धा भाग घेणारी, अशी व्यक्ती होती. अशा प्रकारचे आयुष्य जगणार्‍या दासला ह्रुदयविकाराने मृत्यु का यावा ?कामाच्या ताणामुळे असे झाले असावे का ? त्याची उंची गाठलेल्या प्रत्येकाला हा ताण असतोच. ते कारण पटण्याजोगे नाही.
जी माहिती नंतर बाहेर आली त्यांत असे दिसले की दास फक्त ४ ते ५ तास झोप घेत असे. एका T.V. चॅनलला, कांही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतींत तो म्हणाला होता की त्याला जास्त झोपणे आवडले असते.फक्त ४ ते ५ तासांची झोप घेऊन, इतक्या वरच्या हुद्द्यावर करणार्‍या त्याला या गोष्टीचा मुळीच गर्व नव्हता.
ह्रुदय-विकार तज्ञांच्या मते, पुरेशा झोपेचा अभाव व ह्रुदय-विकार यांचा घनिष्ट संमंध आहे. यावर वेळोवेळी जे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, त्यावरून असे दिसते की –
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांत, ६ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍यांच्या मानाने, अतीरक्तदाबाची शक्यता ३५० ते ५०० टक्क्यांनी वाढते. ( २००९ चा शोधनिबंध )
*** २५ ते ४९ वयांतील कमी झोप घेणार्‍यांत ,अतीरक्तदाबाची शक्यता दुप्पट होते. (२००६ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांत अतीरक्तदाबाची शक्यता तिप्पटीने वाढते. (१९९९ चा शोधनिबंध )
*** झोपेअभावी, रक्तांत अती-संवेदनाशील अशा प्रथिनांचे (hs-cRP) प्रमाण वाढते. असे होणे हे हार्ट अटॅक येण्याची शक्यता दर्शविते
हे प्रमाण एकदा वाढले की नंतर जरी पुरेशी झोप घेतली, तरी हे प्रमाण वाढलेलेच रहाते.
*** केवळ एका रात्रिच्या निद्रानाशामुळे सुद्धा, शरिरांत, कांही विषारी द्रव्यांचे प्रमाण ( उदा. IL-6, TNF-alpha,cRP ) वाढते. त्यामुळे कर्करोग, सांधेदुखी व ह्रुदय-विकार असल्या विकारांची शक्यता बळावते. (२००४ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांमध्ये ह्रुदय-विकाराची शक्यता ३१ टक्क्यांनी वाढते.
६ “ “ “ “ “ “ “ १८ “ “ (२००६ चा शोधनिबंध )
झोप २ अवस्थांत असते. पहिल्यांदा non-REM झोप येते. या झोपेत, पापण्यांची उघड-झांप होत नाही. या झोपेंत, पिट्युटरी ग्रंथीतून growth hormones स्रवतात. यामुळे शारिरीक थकवा व झीज भरून निघते. non-Rem नंतर जी झोप येते ती REM (rapid eye movement ) प्रकारची असते. यांत पापण्यांची जलद उघड-झाप होते. या झोपेने मानसिक स्वास्थ्य लाभते. संपूर्ण झोपेंत non-REM व REM या अवस्थांची ४ ते ५ आवर्तने होतात.
कमी झोप वगळता, रंजन दासने, योग्य आहार, प्रमाणांत व्यायाम, शरिराचे योग्य तितके वजन या सर्वांची काळजी घेतली. पण त्याने पुरेशी झोप – कमित कमी ७ तास – घेतली नाही व त्यानेच त्याचा बळी घेतला असावा.
(इ-मेलच्या आधारे )

Monday, November 23, 2009

मॅग्लेव्ह ट्रेन

कांही देशांत, विद्युत-चुंबकांचा वापर करून अतिशय जलद धांवणार्‍या म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेनचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. जर्मनी, जपान व अमेरिका हे ते देश. मॅग्लेव्ह हे मॅग्नेटिक (चुंबकीय) लेव्हिटेशन (तरंगणे) चे संक्षिप्त रुप. ’गाइडवे’ मधे असलेल्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार्‍या जाळ्या, धाव-मार्गावर असलेले चुंबक व ट्रेनच्या ’अंडर-कॅरेज’ला असणारे चुंबक यांत पाहिजे तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे व त्यांत बदल करणे, सजातीय चुंबकांचे एकमेकांना दूर सारणे व विजातीय चुंबकांतील आकर्षण याचा उपयोग करून ट्रेन धावपट्टीवर १ ते १० सेंटीमिटर उंचीवर तरंगत ठेवता येते व घर्षणरहित अशा या प्रणालीत, अभुतपूर्व म्हणजे ५०० किलोमिटर प्रती तास, या गतीने पळविता येते. सुटल्यापासून पहिल्या २ मिनिटांतच ती ३०० किलोमिटरची गती गांठते.
जर्मनीत जवळ जवळ ३ दशकांपूर्वी या तंत्रज्ञानाचा उदय झाला.अतिशय किचकट व खर्चिक तंत्रज्ञान लागणारी व व्यापारी तत्वावर असलेली ३० किलोमिटर लांबीची मॅग्लेव्ह जगांत आज फक्त चीनमधील शांघायमधेच आहे व ती लॉंगियांग रोड स्टेशन ते पुडॉंग एअरपोर्ट पर्यंतचा पल्ला १० मिनिटांपेक्षाही कमी वेळांत गांठते. तिचा हॅंगझाउ पर्यंत १६० किलोमिटरचा विस्तार २०१० पर्यंत पूर्ण होईल.
पंख नाहित, तरंगत ठेवल्यामुळे घर्षणाचा अभाव व त्यामुळे ध्वनीप्रदुषण जवळ जवळ नाहीच, एंजीन नाही, पोल्युशन नाही, एग्झॉस्ट गॅस नाही. अशी ही ट्रेन … एक चमत्कारच !




टीकाकार म्हणतात की अतिशय खर्चिक अशा मॅग्लेव्हमधे गुंतवणुक करण्याचे कारणच काय? त्यांना त्यांतील thrill व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीचा विसर पडतो. केवळ ’अ’ पासून ’ब’ पर्यंत जाता येणे एवढेच नव्हे तर ही भूतकाळांतून दैदिप्यमान भविष्याकडे मारलेली एक भरारीच आहे.
ज्या जर्मनींत या तंत्रज्ञानाचा उदय झाला तेथेसुद्धा, आपल्याकडे मॅग्लेव्ह असावी असे, त्याला लागणार्‍या अवाढव्य खर्चामुळे, वाटत नाही.
मी शांघाय पाहिले आहे. मला एक प्रश्न भेडसावतो. आपल्या मुंबईचे शांघाय केव्हा होणार? आणि त्याचे उत्तरही मला माहित आहे. शांघाय व मुंबई या शहरांचा सर्वच दृष्टीकोनांतून विचार करता, उत्तर निश्चित आहे व ते हे, “केव्हाच नाही।”
(सौजन्य गूगल )

Thursday, November 19, 2009

भू-गर्भातील ऊर्जा –

या ऊर्जेचा उगम भू-गर्भातील किरणोत्सर्गी खनिजांच्या विघटणांत आहे. पृथ्वीच्या पोटांत, भू-पृष्ठापासून खूपच खोल असलेल्या तप्त मॅग्मामधे ही ऊर्जा उष्णतेच्या रुपांत आहे. तंत्रज्ञान वापरून, एका ऊर्जेचे दुसर्या उर्जेत म्हणजे उष्णतेचे विजेत रुपांतर करता येते.
भू-गर्भीय ऊर्जेकरिता ज्या अती खोल विहिरी खणतात, त्यांतून, कार्बन-डाय-ऑक्साइड, हैड्रोजन सल्फाइड, मिथेन व अमोनिया असे “ ग्रीन-हाउस ” वायू निघतात. परंतू यांचे प्रमाण, दगडी कोळसा, c.n.g वगैरेच्या ज्वलनांतून जी विद्युत निर्मिती करतात, त्या मानाने कमीच असते. म्हणूनच global warming च्या संदर्भात, या ऊर्जा स्रोताला महत्वाचे स्थान आहे.
आज, भू-गर्भीय ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याची प्रमूख केंद्रे अमेरिकेंतील The Geyzers या भागांत आहेत. तसेच एल साल्वादोर, केनिया, फिलिपाइन्स, आइसलंड व कोस्टा रिका येथेही कांही प्रमाणांत वीज निर्मिती होते.
भू-पृष्ठावर ठिकठिकाणी tectonic plates आहेत. पुष्कळदा याच भागांत भू-कंप होत असतात. तेथे अति ऊष्ण तपमानाचे भाग, भूपृष्ठापासून फार खोल नसतात. आजची बरीचशी भू-गर्भ ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याची केंद्रे, याच भागांत आहेत.
या तंत्रज्ञानाचा नमुना दाखविणारी छोटी निर्मिती केंद्रें (pilot plants ), जर्मनी व फ्रांस येथे आहेत. स्वित्झर्लंड येथील केंद्र, तेथे भू-कंप झाल्यामुळे बंद करावे लागले.
जागतिक मागणीच्या फक्त ०.३ % इतकीच विजेची निर्मिती या ऊर्जास्रोतापासून होते आहे. यांतील उष्णता जरी अनिर्बंध उपलब्ध असली
तरी भू-पृष्ठाखाली कित्येक मैल ड्रिलींग करणे व उष्णतेचे विजेत रुपांतर करायचें संयंत्र यांतील तंत्रज्ञानांत लक्षणीय सुधारणा करून ते
स्वस्त करता आले तरच, अखंड व मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचा एक मार्ग भविष्यांत उपलब्ध असेल म्हणून याचे महत्व.


क्राफ्ला (आइसलंड ) येथील जिओथर्मल पॉवर प्लॅंट

Google आधारित...




Monday, November 16, 2009

एक विराणी ...

सोबतीचे एक सभासद व कवी कृष्णकुमार प्रधान यांची रचना ...

काल रात्रिला सपान पडलं, सपनात आलिस तू राणी,
कविता करीत असता त्याची -
सहजच बनली ही विराणी ।
कारण आता असति राहिल्या -
तुझ्या ग केवळ आठवणी ।
चार वर्षे झाली त्याला, जेव्हा गेलीस तू सर्वांना सोडुनी .

Friday, November 13, 2009

कांहीतरी नवीन ...

बागेतील कचर्‍याच्या कॉंपोस्टवर ’शू ’ करा आणि वातावणाचे रक्षण करायला मदत करा ...
उघड्यावर ’शू ’ करणे ही चांगली संवय समजली जात नाही. पण इंग्लंडमधील एक N.G.O. ही कल्पना उचलून धरत आहे. कारण, यामुळे टॉयलेटमधे फ्लश वापरल्यामुळे जे पाणी वाया जाते, ते वाचते.
तेथील ’The National Trust ', जो वातावरणाचा तोल जपण्याकरिता कार्यान्वीत आहे , त्याने त्या देशांतील पुरुषांना कचर्‍याच्या कॉंपोस्टवर शू करण्याबद्दल सुचविले आहे. त्यामुळे बागांना सेंद्रीय खत मिळेल व टॉयलेटमधील फ्लशिंग टळेल . कचर्‍याच्या कॉंपोस्टवर मुत्र पडल्याने , कचर्‍याच्या कॉंपोस्टमधे पूर्ण रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.
( Times of India च्या बातमी वरून )
...................................................................................................................................................................................
ओपन हार्ट शस्त्रक्रियेत विशेष प्रकारच्या गोंदाचा ( adhesive ) अस्थी सांधण्याकरिता वापर फायदेशीर ...
"हृदयाच्या उघड्या ( open heart ) शस्त्रक्रियेत , छातीच्या पिंजर्‍याच्या अस्थी कापाव्या लागतात. हृदयाची ठाकठिक केल्यानंतर , त्या परत सांधल्या जातात. आत्तापर्यंत , त्या करिता तारेचा वापर केला जातो आहे . हाडांचा सांधा बरा होईपर्यंत कित्येक आठवडे जातात . तीव्र वेदनाशामकांचा बराच काळ उपयोग करावा लागतो . अस्थी सांधण्याच्या नवीन पद्धतीत , तारे ऐवजी क्रिप्टोनाइट या विशिष्ट गोंदाचा वापर केला तर , छातीच्या पिंजर्‍याची कापलेली हाडे , कांही आठवड्यांऐवजी कांही तासांतच सांधली जातात.
या प्रकारें केलेल्या २० शस्त्रक्रियांचा अभ्यास केला असता असे आढळले की * रुग्ण पुर्ववत होऊन , नेहमीचे जीवन जगण्याकरिता लागणारा काळ कांही महिन्यांऐवजी कांही तासांवर आला. * वेदना व रुग्णाला होणारा त्रास , जुन्या पद्धतीपेक्षा कमी झाला. * वेदनाशामकांचा वापर कमी करावा लागला" , Foothills Medical Centre , Calgary , Alberta , Canada येथील हृदय शल्ल्य चिकित्सक Paul Fedak , ज्यांनी ही नवीन पद्धत शोधली, म्हणतात.
( Times of India च्या बातमी वरून )

Thursday, November 12, 2009

या पोस्टमद्ध्ये आणखी कांही वसईची दृष्ये पहा ...

वसईत शिरताना, सुरुवातीला पापडी हे गांव लागते. तेथील तलावाकाठी असलेले हे रामाचे देउळ .
पुढे गेल्यानंतर दिसते पापडीचे ’अवर लेडी ऑफ ग्रेस कथिड्रल ’.
हे चर्चच्याच बाजूला असलेले रमेदी गांवांतले दत्त मंदीर..
हे रमेदी गांवांतले ’अवर लेडी ऑफ रमेदी चर्च ’.



गजबजलेले रस्ते सोडून वसईच्या अंतर्भागांत शिरलात की तेथे वसईची खरीं सौंदर्य-स्थळे, म्हणजे भाजी-पाल्याच्या, नारळी-पोफळी-केळीच्या बागा व छोटी छोटी बंगलेवजा घरकुलें दृष्टिपंथात येतात.

एक राणी - अकरा प्रेसिडेंट

एक युनाइटेड किंगडमची राणी आणि अकरा अमेरिकन प्रेसिडेंट !
हॅरी ट्रुमन ते बरॅक ओबामा!
हा रेकॉर्ड कधी मोडला जाईल काय?













(हे फोटो एका परिचित व्यक्तीकडून माझ्याकडे इ-मेल ने आले. )

Monday, November 09, 2009

दिलिप प्रभावळकर ... एक मुलुखगिरी

दिलिप प्रभावळकरांची मुलुखगिरी

** लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीची स्थापना एका चर्चमधे होते. अर्थांत, हे चर्च आता कार्यान्वित नाही व महाराष्ट्र मंडळाने ते भाडेतत्वावर घेतले आहे.
** नैरोबीत, महाराष्ट्र मंडळाची स्वत:ची अशी दुमजली इमारत आहे . देशो-देशीच्या महाराष्ट्रमंडळांत हे एकमेव उदाहरण असावे.
** स्टिव्हन स्टिलबर्ग या जगप्रसिद्ध निर्मात्याने टॉम हॅंक या सु-प्रसिद्ध नटाला घेऊन, एक चित्रपट काढायचे ठरविले. एका पात्राकरिता, प्रभावळकरांना घ्यायचा विचार होत होता. मुंबईला एक बैठकही झाली. अट अशी की दिलिप प्रभावळकरांना एका सप्त-तारांकित हॉटेलांत १६ आठवडे मुक्काम ठोकावा लागेल. प्रभावळकरांना हा रोल कांही मिळाला नाही. प्रभावळकरांचे मुलाखतकार स्वप्नील जोशी म्हणाले, प्रभावळकरांसारख्या नटाला तो रोल न मिळणे ही वास्तविक स्टिव्हन स्टिलबर्गची हानी होती, प्रभावळकरांची नव्हे !
** प्रभावळकरांना, अभिनयाबद्दल, राज्यस्तरावर व राष्ट्रस्तरावरसुद्धा बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी २१ पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांतील बोक्या सातबंडे या पुस्तकाला लेखनाबद्दल बक्षिस मिळाले आहे.
** प्रभावळकरांनी ’बेकाबू’ या हिंदी चित्रपटांत ९ भूमिका केल्या होत्या हे फारशे कोणाला माहित नाही. पण हा चित्रपट चालला नाही.
** सिएटलमधील एका कार्यक्रमांत, प्रभावळकरांनी ’ कृष्णराव हेरंबकर ’ ही भूमिका करून दाखविली. कार्यक्रमाचे शेवटी, ऐंशी-नव्वदितले एक म्हातारबुवा भेटायला आले. त्यांनी प्रभावळकरांना साक्षात साष्टांग नमस्कार घातला. प्रभावळकरांना कसेसेच झाले. म्हातारबुवा म्हणाले, ’अहो, हा नमस्कार कोकणांत आयुष्य काढलेल्या माझ्या वडिलांना आहे .’
** महाराष्ट्रांतून इझ्रायेलला गेलेल्या, मूळ मराठी मायबोली असलेल्या ज्युंची संख्या बरीच आहे . अशाच एका कुटुंबात,
प्रभावळकर , तेथील कार्यक्रमानिमित्ताने राहिले होते. त्यांच्या तीन कार्यक्रमांना प्रत्येकी ४५० ज्यू प्रेक्षक उपस्थित होते. घरी , ते प्रभावळकरांशी मराठींत संभाषण करीत पण आप-आपसांत हिबृ भाषेंत बोलत. ( इझ्रायेलमध्ये , पूर्वी मृत समजली जाणारी हिबृ , ही राष्ट्रभाषा आहे व सर्व ज्यू नागरिक तिचा वापर करतात.)
** अभिनया व्यतिरिक्त , प्रभावळकरांना इतर कोणतेही व्यसन नाही.

[ दूरदर्शनच्या एका वाहिनीवर , स्वप्नील जोशी यांनी दिलिप प्रभावळकरांची एक मुलाखत घेतली, त्या आधारे ..]

Thursday, November 05, 2009

विचारवंतांचे विचार करण्याजोगे विचार

अज्ञान हे नेहमीच अस्तित्वांत असते व भीतीची निर्मिती अज्ञानापोटी असते.
जागतीक कीर्तीचे अग्रगण्य धनवान व मायक्रोसॉफ्ट या प्रख्यात कंपनीचे जनक बिल गेट्स…

अज्ञान्यांची बुद्धिमत्ता, शिक्षितांच्या अक्षमतेपेक्षा जास्त उपयोगी पडते.
अज्ञात प्रज्ञावंत …

ईश्वराची प्राप्ती करून घेण्याच्या मार्गांत धर्म हा अडसर ठरतो.
de Bono …

आपल्याला किती कमी समजते हे कळण्याकरिता खूप कांही समजणे (खूप ज्ञान असणे ) फार आवश्यक आहे .
एक अज्ञात प्रज्ञावंत …

जेव्हा भारतीय गजराज (जागतीक रंगमंचावर ) नृत्य करू लागेल तेव्हा इतर सर्व (जागतीक ) मंचाबाहेर पडतील .
मॅनेजमेंट गुरु सी. के. प्रहलाद यांची १९९०च्या दशकांत भविष्यवाणी …

देव स्वयंभू आहे का ? की आपणच (मानवाने ) त्याला अस्तित्वांत आणले ?
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते तमिळ लेखक डी. जयकांथन …

तुम्ही (रहावयास ) निवडलेल्या देशांत तुमची भरभराट होवो. पण तुमच्या नाळेची बांधिलकी ज्या तुमच्या मातृभूमीशी आहे, तिला विसरू नका .
अबुल पाकीर जैनुद्दिन ( A.P.J. ) अब्दुल कलाम …

Sunday, November 01, 2009

टवाळा आवडे विनोद ...

सरदारांच्या नांवावर विनोद खपविणे, खरे तर योग्य नव्हे. ही जमात, इतरांइतकीच किंबहुना इतरांहून कांकणभर जास्तच हुशार आणि श्रम करणारी असते. पण काय करणार , वाचकांना (आणि लेखकांनाही ) ही एक संवयच लागली आहे . तर त्याच पठडींतील कांही विनोद….
*** एका सुपरमार्केटमद्ध्ये …
सरदार – तुमच्याकडे रंगित टी. व्ही. आहे का ?
विक्रेता – नक्कीच .
सरदार – मग मला एक हिरव्या रंगाचा द्या बरं !

*** सरदारचे लक्ष्य सुपरमार्केटमद्ध्ये थर्मॉस फ़्लास्ककडे जाते.
सरदार – हे काय आहे ?
विक्रेता – तो थर्मॉस फ्लास्क आहे.
सरदार – त्याचा उपयोग काय करतात ?
विक्रेता – त्यांत गार वस्तू गार व गरम वस्तू गरम रहाते.
सरदारने एक थर्मॉस विकत घेतला. दुसर्‍या दिवशी, सरदारजी थर्मॉस घेऊन कामावर गेले.
सरदार बॉसने विचारले – हे काय आहे ?
सरदार – हा थर्मॉस आहे.
सरदार बॉस – वा ! पण त्यांत आहे काय ?
सरदार – दोन कप गरम कॉफी आणि एक ग्लास थंडगार कोक .

*** पंजाबात, सरदारने एक आंसरिंग मशीन ( answering machine) लावले. पण दोनच दिवसांनी ते काढुनही टाकले. कारण ? मित्रांकडून तक्रारी यायला लागल्या – “ साला फोन उठाके बोलता है की मै घरपे नही हूं ।“

*** सरदारजी सुपरमार्केटमद्ध्ये गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी घाइघाइने घरी गेले, पगडी काढली, हेअर स्टाइल बदलली आणि सुपरमार्केटमद्ध्ये परत गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी मनांत म्हणाले – डॅम ! त्याने मला परत ओळखले. घरी जाऊन त्यांनी आपला चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकला, केंस कापले, केंसांचा रंग बदलला, नेहमीपेक्षा वेगळे कपडे परिधान केले, डोळ्यांना मोट्ठा गॉगल लावला आणि कांही दिवसांनी परत सुपरमार्केटमद्ध्ये गेले.
सरदारजी – मला हा छोटा टी. व्ही. विकत घ्यायचा आहे.
विक्रेता – क्षमा करा,आम्ही सरदारना कांहीच विकत नाही.
सरदारजी आता मात्र चक्रावलेच.
सरदारजी – मी सरदार आहे हे तुम्ही कसे जाणता ?
विक्रेता – कारण हे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे , टी. व्ही. नाही !

*** एका सिनेमाला १८ सरदारजी गेले. का ?
कारण १८ च्या खाली त्या सिनेमाला प्रवेश नव्हता .