संदीप उन्निकृष्णन – २६/११/२००८ चा हुतात्मा
“संदीपने नॅशनल सिक्युरिटि गार्ड ( N.S.G.) मध्ये जाण्याचे आम्हाला आजही दु:ख नाही,” संदीपचे आई – वडील धनलक्ष्मी व के. उन्निकृष्णन म्हणतात. २६/११ च्या प्रथम स्मृति दिनानिमित्त ते मुंबईत होते.
“संदीपला अंतीम कामगिरीवर पाठविणार्या N.S.G. कडून आम्हाला अधिक सह्रुदयतेची अपेक्षा होती. N.S.G. च्या मानेसर येथील स्मारकांत, संदीपच्या नांवांत चूक होती. नांवांतील कांही अक्षरे गळून खाली पडली होती. आम्ही दोघांनी ती गोळा केली. आता ती व्यवस्थित लावली आहेत असे कळते.”
संदीपच्या आई-वडिलांनी जणू कोणत्याही प्रसंगास सामोरे जाण्यास तयार असावे अशाच उद्देशाने तो त्यांच्याशी मृत्यु बद्दल उदासीनतेने बोले. म्हणे,”बंदुकीच्या प्रत्येक गोळीवर ती कोणाचा बळी घेणार त्याचें नांव लिहिलेले असते. पण मी जेव्हा मृत्युला सामोरा जाईन तेव्हा, आई , हजारो लोक तुझ्याबरोबर असतील.”
एकदा आई-वडिलांच्या सोबत तो जेव्हा खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमींत भेट देण्यास गेला तेव्हा, जेथे अकादमीत शिकून गेलेल्या व हौतात्म्य पत्करलेल्यांची नांवे जेथे कोरलेली असतात त्या ठिकाणी म्हणाला होता,”उद्या कदाचित माझेही नांव येथे असेल.” उन्निकृष्णन म्हणतात,”ते ऐकून आमच्या जिवाचा थरकांप झाला. पण आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नाही की हे उद्याचे सत्य असेल.”
संदीपला ज्या ठिकाणी वीर-मरण आले तेथे ते २६/११ च्या शुक्रवारी कांही वेळ स्तब्ध उभे राहिले.
Monday, November 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment