झोप व हार्ट अटॅक – रंजन दासचा मृत्यु कशामुळे ?
रंजन दास हा SAP या बहु-देशीय अग्रगण्य कंपनीचा भारतीय उपखंडातील सर्वांत तरूण – वय ४२ वर्षे- C.E.O. होता. अलिकडेच, त्याचा अकाली मृत्यु झाला. एका दिवशी, व्यायामशाळेतून तो परतला व massive हार्ट अटॅकने तो गेला. ती एक, विविध खेळांत भाग घेणारी, शरीर संपदा जपण्याकरिता प्रयत्नशील – मॅरॅथॉनमध्ये सुद्धा भाग घेणारी, अशी व्यक्ती होती. अशा प्रकारचे आयुष्य जगणार्या दासला ह्रुदयविकाराने मृत्यु का यावा ?कामाच्या ताणामुळे असे झाले असावे का ? त्याची उंची गाठलेल्या प्रत्येकाला हा ताण असतोच. ते कारण पटण्याजोगे नाही.
जी माहिती नंतर बाहेर आली त्यांत असे दिसले की दास फक्त ४ ते ५ तास झोप घेत असे. एका T.V. चॅनलला, कांही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतींत तो म्हणाला होता की त्याला जास्त झोपणे आवडले असते.फक्त ४ ते ५ तासांची झोप घेऊन, इतक्या वरच्या हुद्द्यावर करणार्या त्याला या गोष्टीचा मुळीच गर्व नव्हता.
ह्रुदय-विकार तज्ञांच्या मते, पुरेशा झोपेचा अभाव व ह्रुदय-विकार यांचा घनिष्ट संमंध आहे. यावर वेळोवेळी जे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, त्यावरून असे दिसते की –
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्यांत, ६ तासांपेक्षा जास्त झोपणार्यांच्या मानाने, अतीरक्तदाबाची शक्यता ३५० ते ५०० टक्क्यांनी वाढते. ( २००९ चा शोधनिबंध )
*** २५ ते ४९ वयांतील कमी झोप घेणार्यांत ,अतीरक्तदाबाची शक्यता दुप्पट होते. (२००६ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्यांत अतीरक्तदाबाची शक्यता तिप्पटीने वाढते. (१९९९ चा शोधनिबंध )
*** झोपेअभावी, रक्तांत अती-संवेदनाशील अशा प्रथिनांचे (hs-cRP) प्रमाण वाढते. असे होणे हे हार्ट अटॅक येण्याची शक्यता दर्शविते
हे प्रमाण एकदा वाढले की नंतर जरी पुरेशी झोप घेतली, तरी हे प्रमाण वाढलेलेच रहाते.
*** केवळ एका रात्रिच्या निद्रानाशामुळे सुद्धा, शरिरांत, कांही विषारी द्रव्यांचे प्रमाण ( उदा. IL-6, TNF-alpha,cRP ) वाढते. त्यामुळे कर्करोग, सांधेदुखी व ह्रुदय-विकार असल्या विकारांची शक्यता बळावते. (२००४ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्यांमध्ये ह्रुदय-विकाराची शक्यता ३१ टक्क्यांनी वाढते.
६ “ “ “ “ “ “ “ १८ “ “ (२००६ चा शोधनिबंध )
झोप २ अवस्थांत असते. पहिल्यांदा non-REM झोप येते. या झोपेत, पापण्यांची उघड-झांप होत नाही. या झोपेंत, पिट्युटरी ग्रंथीतून growth hormones स्रवतात. यामुळे शारिरीक थकवा व झीज भरून निघते. non-Rem नंतर जी झोप येते ती REM (rapid eye movement ) प्रकारची असते. यांत पापण्यांची जलद उघड-झाप होते. या झोपेने मानसिक स्वास्थ्य लाभते. संपूर्ण झोपेंत non-REM व REM या अवस्थांची ४ ते ५ आवर्तने होतात.
कमी झोप वगळता, रंजन दासने, योग्य आहार, प्रमाणांत व्यायाम, शरिराचे योग्य तितके वजन या सर्वांची काळजी घेतली. पण त्याने पुरेशी झोप – कमित कमी ७ तास – घेतली नाही व त्यानेच त्याचा बळी घेतला असावा.
(इ-मेलच्या आधारे )
Wednesday, November 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
khupach mahitipurn..
- sadanand
Post a Comment