Friday, November 13, 2009

कांहीतरी नवीन ...

बागेतील कचर्‍याच्या कॉंपोस्टवर ’शू ’ करा आणि वातावणाचे रक्षण करायला मदत करा ...
उघड्यावर ’शू ’ करणे ही चांगली संवय समजली जात नाही. पण इंग्लंडमधील एक N.G.O. ही कल्पना उचलून धरत आहे. कारण, यामुळे टॉयलेटमधे फ्लश वापरल्यामुळे जे पाणी वाया जाते, ते वाचते.
तेथील ’The National Trust ', जो वातावरणाचा तोल जपण्याकरिता कार्यान्वीत आहे , त्याने त्या देशांतील पुरुषांना कचर्‍याच्या कॉंपोस्टवर शू करण्याबद्दल सुचविले आहे. त्यामुळे बागांना सेंद्रीय खत मिळेल व टॉयलेटमधील फ्लशिंग टळेल . कचर्‍याच्या कॉंपोस्टवर मुत्र पडल्याने , कचर्‍याच्या कॉंपोस्टमधे पूर्ण रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.
( Times of India च्या बातमी वरून )
...................................................................................................................................................................................
ओपन हार्ट शस्त्रक्रियेत विशेष प्रकारच्या गोंदाचा ( adhesive ) अस्थी सांधण्याकरिता वापर फायदेशीर ...
"हृदयाच्या उघड्या ( open heart ) शस्त्रक्रियेत , छातीच्या पिंजर्‍याच्या अस्थी कापाव्या लागतात. हृदयाची ठाकठिक केल्यानंतर , त्या परत सांधल्या जातात. आत्तापर्यंत , त्या करिता तारेचा वापर केला जातो आहे . हाडांचा सांधा बरा होईपर्यंत कित्येक आठवडे जातात . तीव्र वेदनाशामकांचा बराच काळ उपयोग करावा लागतो . अस्थी सांधण्याच्या नवीन पद्धतीत , तारे ऐवजी क्रिप्टोनाइट या विशिष्ट गोंदाचा वापर केला तर , छातीच्या पिंजर्‍याची कापलेली हाडे , कांही आठवड्यांऐवजी कांही तासांतच सांधली जातात.
या प्रकारें केलेल्या २० शस्त्रक्रियांचा अभ्यास केला असता असे आढळले की * रुग्ण पुर्ववत होऊन , नेहमीचे जीवन जगण्याकरिता लागणारा काळ कांही महिन्यांऐवजी कांही तासांवर आला. * वेदना व रुग्णाला होणारा त्रास , जुन्या पद्धतीपेक्षा कमी झाला. * वेदनाशामकांचा वापर कमी करावा लागला" , Foothills Medical Centre , Calgary , Alberta , Canada येथील हृदय शल्ल्य चिकित्सक Paul Fedak , ज्यांनी ही नवीन पद्धत शोधली, म्हणतात.
( Times of India च्या बातमी वरून )

No comments: