दिलिप प्रभावळकरांची मुलुखगिरी
** लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीची स्थापना एका चर्चमधे होते. अर्थांत, हे चर्च आता कार्यान्वित नाही व महाराष्ट्र मंडळाने ते भाडेतत्वावर घेतले आहे.
** नैरोबीत, महाराष्ट्र मंडळाची स्वत:ची अशी दुमजली इमारत आहे . देशो-देशीच्या महाराष्ट्रमंडळांत हे एकमेव उदाहरण असावे.
** स्टिव्हन स्टिलबर्ग या जगप्रसिद्ध निर्मात्याने टॉम हॅंक या सु-प्रसिद्ध नटाला घेऊन, एक चित्रपट काढायचे ठरविले. एका पात्राकरिता, प्रभावळकरांना घ्यायचा विचार होत होता. मुंबईला एक बैठकही झाली. अट अशी की दिलिप प्रभावळकरांना एका सप्त-तारांकित हॉटेलांत १६ आठवडे मुक्काम ठोकावा लागेल. प्रभावळकरांना हा रोल कांही मिळाला नाही. प्रभावळकरांचे मुलाखतकार स्वप्नील जोशी म्हणाले, प्रभावळकरांसारख्या नटाला तो रोल न मिळणे ही वास्तविक स्टिव्हन स्टिलबर्गची हानी होती, प्रभावळकरांची नव्हे !
** प्रभावळकरांना, अभिनयाबद्दल, राज्यस्तरावर व राष्ट्रस्तरावरसुद्धा बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी २१ पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांतील बोक्या सातबंडे या पुस्तकाला लेखनाबद्दल बक्षिस मिळाले आहे.
** प्रभावळकरांनी ’बेकाबू’ या हिंदी चित्रपटांत ९ भूमिका केल्या होत्या हे फारशे कोणाला माहित नाही. पण हा चित्रपट चालला नाही.
** सिएटलमधील एका कार्यक्रमांत, प्रभावळकरांनी ’ कृष्णराव हेरंबकर ’ ही भूमिका करून दाखविली. कार्यक्रमाचे शेवटी, ऐंशी-नव्वदितले एक म्हातारबुवा भेटायला आले. त्यांनी प्रभावळकरांना साक्षात साष्टांग नमस्कार घातला. प्रभावळकरांना कसेसेच झाले. म्हातारबुवा म्हणाले, ’अहो, हा नमस्कार कोकणांत आयुष्य काढलेल्या माझ्या वडिलांना आहे .’
** महाराष्ट्रांतून इझ्रायेलला गेलेल्या, मूळ मराठी मायबोली असलेल्या ज्युंची संख्या बरीच आहे . अशाच एका कुटुंबात,
प्रभावळकर , तेथील कार्यक्रमानिमित्ताने राहिले होते. त्यांच्या तीन कार्यक्रमांना प्रत्येकी ४५० ज्यू प्रेक्षक उपस्थित होते. घरी , ते प्रभावळकरांशी मराठींत संभाषण करीत पण आप-आपसांत हिबृ भाषेंत बोलत. ( इझ्रायेलमध्ये , पूर्वी मृत समजली जाणारी हिबृ , ही राष्ट्रभाषा आहे व सर्व ज्यू नागरिक तिचा वापर करतात.)
** अभिनया व्यतिरिक्त , प्रभावळकरांना इतर कोणतेही व्यसन नाही.
[ दूरदर्शनच्या एका वाहिनीवर , स्वप्नील जोशी यांनी दिलिप प्रभावळकरांची एक मुलाखत घेतली, त्या आधारे ..]
Monday, November 09, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment