Sunday, June 27, 2010

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. कृष्णकुमार प्रधान कवीही आहेत.
भाषाभारती या ब्लॉगमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात.

प्रितीसागर

सागराच्या लाटा धरतीला स्पर्शती प्रेमभावे ।
फेस सफ़ेत उफाळे सागराच्या प्रीतीचे जणू उमाळे ।
धरती त्याला परी प्रतिसाद न देई ।
लाज का वाटते तिला नभाची, प्रतिमा जयाची दिसे सागरजली ॥
लाजेची परी तिचीच लाली उठून दिसते क्षितिजावरती ।
जेव्हा सूर्य आपुले तोंड लपवी नगाआड वा पाण्याखाली ॥

---- कृष्णकुमार

Saturday, June 26, 2010

ज्येष्ठ नागरिक भवन -






(हा रांगोळीने काढलेल्या चित्राचा फोटो आहे.)



ज्येष्ठ नागरिक भवन - उद्घाटन सोहळा

गेल्या तीस पस्तीस वर्षात ज्येष्ठ नागरिक संघटित होऊ लागले आणि महाराष्ट्रात लहान मोठ्या शहरात/गावात अनेक ज्येष्ठ नागरिक संघांची स्थापना झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघांचा ‘फ़ेस्कॉम’ (FESCOM) या नावाने महासंघ स्थापन झाला. तसेच अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघांचा ‘आयस्कॉन’ (AISCON) हा महासंघ स्थापन झाला. या महासंघांतर्फे ज्येष्ठ नागरिक संघाना मार्गदर्शन मिळतेच. शिवाय त्यांच्या अनेक समस्या व मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या महाराष्ट्रातील १८०० ज्ये.ना. संघ फ़ेस्कॉमशी संल्लग्न आहेत. विशेष म्हणजे ८६ संघ फ़क्त महिलांचे आहेत तर ४३ संघांच्या अध्यक्ष महिला आहेत.

साहजिकच वरील महासंघांमध्ये समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. आयस्कॉन/फ़ेस्कॉम मध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ.शं.पां. किंजवडेकर व त्यांचे सहकारी यानी नवी मुंबई येथे मध्यवर्ती कार्यालयाची स्वतंत्र इमारत असावी या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. सुदैवाने नवी मुंबई, नेरूळ येथे सिड्कोने सवलतीच्या दराने एक प्लॉट उपलब्ध करून दिला. वरील पदाधिकार्‍यानी अथक परिश्रमाने इमारत फंड जमा करण्यास सुरुवात केली. अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, वैयक्तिक देणगीदार यांच्या सहयोगाने देणग्या मिळून २००६ साली इमारतीचे बांधकाम सुरु झाले. परंतु महागाईमुळे जमविलेले फंड अपुरे पडू लागले व त्यामुळे इमारत बांधणीला आवश्यक गती येत नव्हती. सुदैवाने महाराष्ट्र शासनातील एक ज्येष्ठ मंत्री मा. गणेश नाईक यानी भरघोस मदतीचा हात दिल्याने इमारतीचे बहुतेक काम पुरे झाले. दिनांक ७ जून रोजी मा. गणेश नाईक यांच्या हस्ते ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ या वास्तूचे दिमाखात उद्घाटन झाले आणि संबंधितांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरुप आले.

या उद्घाटन समारंभाला सोबतीच्या वतीने श्री. मुकुंद पेठे, अध्यक्ष, श्री. विश्वास डोंगरे, कार्याध्यक्ष व श्री. म.ना. काळे, सभासद हे उपस्थित होते.

या ज्येष्ठ नागरिक भवनाला तळमजला अधिक वर दोन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर सभागृह आहे.
या इमारतीत डेकेअर सेंटर, वाचनालय, संगणक विभाग, वैद्यकीय तपासणी व उपचार. फ़िजियो थेरापी अशा सुविधा प्रस्तावित आहेत.

ज्येष्ठ नागरिक भवनाच्या उद्घाटनाबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचा समन्वय अधिक सुलभ होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल.

Thursday, June 24, 2010

न्याय अंतरीचा.



’सोबती’च्य़ा दि. २३ जून च्या साप्ताहिक सभेत सभासद श्री. जयंत खरे यानी एक मासिकात प्रसिद्ध झालेली कथा सांगितली ती थोड्या संक्षेपाने येथे देत आहे.
’संगोपन’ या अनाथाश्रमामध्ये एक नवजात बालक दाखल झाले. त्याच्या हाताला ’ओम’ अशी नावाची चिट्ठी लावलेली होती. इतर थांगपत्ता अर्थातच काही मिळाला नव्हता. रजिस्टरमध्ये रीतसर नोंद करून संस्थेने मुलाला दाखल करून घेतले. संस्थेच्या पद्धतीप्रमाणे मूल दत्तक देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. एका जोडप्याने हे मूल दत्तक घेण्याची इच्छा दाखवल्यावर संस्थेने सर्व चौकशी रीतसर करून व सर्व कायदेशीर तरतुदींचे पूर्ण पालन करून योग्य वेळी ओमला त्या जोडप्याला दत्तक दिले. आता या मुलाचे पालनपोषण चांगले होईल याचे संस्थेला समाधान वाटले.
दत्तक दिल्यानंतर एका आठवड्यातच एक मेहता नावाचे दुसरेच जोडपे संस्थेत येऊन ’आमचे ओम नावाचे मूल तुमचेकडे दाखल झाले होते ते आम्हाला परत हवे आहे’ अशी त्यानी मागणी केली. जोडपे नवविवाहित दिसत होते. संस्थेने म्हटले कीं अशा नावाचे मूल संस्थेत ठेवले गेले होते खरें, पण आता ते रीतसर दत्तक दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला कसे देणार? श्री. मेहेतांनी मूल मिळावे म्हणून संस्थेला मोठी देणगीहि देऊं केली पण संस्थेचा नाइलाज होता. शेवटीं प्रकरण कोर्टात गेले.
श्री. मेहेतांतर्फे मुद्दे मांडले गेले कीं मुलाच्या हाताला नावाची चिट्ठी लावलेली होती ती आम्हाला माहीत होती कारण आम्हीच ती लावलेली होती. आमचे DNA रिपोर्टहि मुलाच्या DNA शी मिळत असलेले दिसतील. तेव्हां मूल आमचे आहे आणि आम्हाला मिळावे.
संस्थेच्या वकिलानी प्रतिवाद केला कीं नावाच्या चिट्ठीबाबत माहिती संस्थेच्या कोणा नोकराकडून वा इतर मार्गाने मिळाली असूं शकते. मूल संस्थेत दाखल झाल्यापासून मेहेता पतिपत्नीने वा त्यांचे वतीने इतर कोणीहि दीर्घकाळपर्यंत मुलाची चौकशी केलेली नाही. त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. नियमित कालावधी उलटल्यावर, व कायद्याच्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करूनच संस्थेने मूल दत्तक देण्याची कार्यवाही केली आहे. कायद्याप्रमाणे संस्थेला तो अधिकार आहे. याउलट, कायद्याप्रमाणे संस्थेने दिलेला दत्तक रद्द करण्याचा या कोर्टाला अधिकारच नाही.
सौ. मेहेता यांनी कोर्टाला आपली हकिगत सांगण्याची परवानगी मागितली. ती दिल्यावर त्या म्हणाल्या. ’मी व श्री. मेहेता लहानपणापासून परिचित होतो व नंतर प्रेमात पडलो मात्र मेहेतांच्या कुटुंबाची परवानगी नसल्याने लग्न झाले नाही. आमच्या हातून नको ती चूक झाली. माझ्या लक्षात आल्यावर मी मेहेताना फोन करून बोलावून घेतले. दुर्दैवाने वाटेतच त्याना भीषण अपघात होऊन ते कोमात गेले. मी अगतिक झाले व मला आईशी बोलावे लागले. उशीर झाल्यामुळे मूल जन्माला येऊ देण्याला पर्याय उरला नव्हता. आईने दडपण आणल्यामुळे मी मूल जन्मल्याबरोबर अनाथाश्रमात ठेवले मात्र त्याच्या हाताला मीच त्याच्या नावाची चिट्ठी लावली होती. त्यानंतर मेहेतांचे आईवडीलहि अपघाताने इस्पितळांतच पडले. मी तिघांचीहि सेवा केली. मेहेता कोमातून निघून बरे झाल्यावर त्याना सर्व हकिगत सांगितली. त्यांनी मूल परत मागण्याचे ठरवले मात्र त्यापूर्वी आमचे लग्न होणे आवश्यक वाटले. आता त्यांच्या आईवडिलांचा विरोध उरला नव्हता. विवाह उरकून आम्ही लगेचच अनाथाश्रमाकडे धावलो तेव्हा आम्ही बराच काळ दखल घेतली नाही हे खरे असले तरी माझ्यावर कोसळलेली संकटपरंपरा हे त्याचे कारण आहे. माझा नाइलाज झाला, त्याची मला शिक्षा देऊं नये.’
श्री. मेहेतानी म्हटले कीं ही सर्व हकिगत खरी आहे आणि कायद्यात विसमेझर फॅक्टर अशी एक सवलत आहे ज्याद्वारे ज्या गोष्टी Act of God यासदरात मोडतील अशा कारणामुळे घडलेली कायद्यातील त्रुटी क्षम्य मानतां येते. त्याचा फायदा आम्हास द्यावा व मुलाला आम्ही वार्‍यावर सोडले होते असा निष्कर्ष काढू नये. आम्ही अगतिक होतो.
कोर्टाने निकाल दिला कीं मूल श्री. व सौ. मेहेता यांचेच आहे असे मान्य केले तरीहि, संस्थेच्या वकिलानी दाखवून दिल्याप्रमाणे कायद्याच्या सर्व तरतुदी पाळून दिलेला दत्तक रद्द करण्याचा या कोर्टाला अधिकार नाही. मूल अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेताना सौ. मेहेतांवर त्यापुढील संकटपरंपरा उद्भवलेली नव्हती तेव्हा विसमेझर फॅक्टरची सवलत गैरलागू आहे. मूल अनाथाश्रमात ठेवले तेव्हांच मुलावरचा हक्क सौ. मेहेता यानी सोडून दिला असे समजले पाहिजे. आम्ही दत्तक रद्द करू शकत नाही.
कायद्याचा मुद्दा येथे संपला. मात्र कथेत म्हटले आहे कीं ओमचीं दत्तक मातापिता कोर्टात उपस्थित होतीं व त्या मातेला कायद्याचा निकाल न्याय्य वाटला नाही व तिने मुलाला त्याच्या खर्‍या आईच्या, सौ. मेहेताच्या, स्वाधीन केले. म्हणून कथेचे नाव ’न्याय अंतरीचा’ आहे.
(कथेचा शेवट म्हणून हे ठीक आहे पण कायद्याप्रमाणे, स्वखुशीने दत्तक घेतलेले मूल असे देऊन टाकता येईल काय असा मला प्रश्न पडला आहे!)

Thursday, June 17, 2010

चार्ली चॅपलीन - हसविणारा विचारवंत


चार्ली चॅपलीन जगाला हसवून गेला. पण त्याने जीवनावर
हृदयस्पर्शी भाष्यही केले. तो म्हणतो :

या जगात कायम असे काहीही नसते, अगदी आपल्या
अडचणी व संकटे.

सर्वात वाया गेलेला दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही
हसला नाहीत.

मला पावसात चालायला आवडते कारण तेव्हा माझे अश्रू
कुणीही पाहू शकत नाही.

Tuesday, June 15, 2010

फुलांचा गालिचा






हे अप्रतिम फोटो माझेकडे एका परिचित व्यक्तीकडून आले. आपलेकडे रांगोळ्यांचे गालिचे, फुलांचेहि गालिचे बनवले जातात. या फोटोंतील गालिचाचा आकार मात्र फारच मोठा आहे आणि तरीहि तो पूर्णपणे प्रमाणबद्ध आहे हें विषेश. यातील रंगसंगतिही मनोहर आहे.

Thursday, June 03, 2010

अनोखी मैत्री

There is power in loving - what more beautiful
proof of this ? - Michael.


This ranger is assigned to prevent the poaching around
the wildlife refuge area of Lanseria, South Africa. The way
these animals interact with him is absolutely stunning ! The
lions seem to know he is there to protect them. His charm
works with hyenas and lions too. Hyenas are usually vicious.
Check out the pictures taken in the river - amazing because
lions hate waters.