Tuesday, December 01, 2009

नांवांत काय आहे ... काय नाही ...

बॉंबे मध्ये बॉंब नाही असें आता म्हणायला वाव नाही,
पण उपसागर (bay) मात्र नक्कीच नाही.
चर्चगेटला चर्चही नाही व दारही नाही. ते एक रेल्वे स्थानक आहे.
अंधेरीला अंधार नाही.
लालबाग लाल नाही व तेथे बगिचाही नाही.
किंग्ज सर्कलला राजा राहिल्याचें स्मरत नाही.
आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला महाराणी व्हिक्टोरिया.
प्रिन्सेस स्ट्रीटला कोणतीही राजकन्या राहात नाही.
डुक्कर बाजारांत डुक्करांचा व्यापार होत नाही.
लोअर परळ हे परळपेक्षा खालच्या पातळीवर नाही.
नौदल सैनिकांचें अस्तित्व मरीन लाइंसला नाही.
महालक्ष्मीचे देऊळ हाजी अलीला आहे, महालक्ष्मीला नव्हे.
तीन-बत्ती हा तीन रस्त्यांचा नाका आहे व त्या नाक्यावर
तीन दिवे असलेला ’लॅंप-पोस्ट’ सुद्धा आहे.
ट्रॅम टर्मिनस किंग्ज सर्कलला होता, दादर टी.टी.ला नव्हे.
ब्रिच कॅंडीला मिठायांची दुकाने नाहित, इस्पितळ मात्र आहे.
सफेद पुलला घाणेरडे पाणी असते.
कोळसा स्ट्रीटला आजकाल कोळसे मिळत नाहीत.
लोहार चाळीत लोहारांचे अस्तित्व जाणवत नाही.
कुंभारवाड्यांत कुंभारांना जागा घेणे परवडत नाही.
लोखंडवाला कॉंप्लेक्स मध्ये लोखंडाचे मार्केट नाही.
नळबाजारांत नळ विकले जात नाहीत.
काळा चौकीला काळी (पोलिस) चौकी नाही.
हॅंगिंग गार्डन्स या टांगत्या बागा नाहीत.
मिरची गल्लीत मिरच्या विकायला नसतात.
अंजीर वाडीत अंजीरांची बाग शोधू नका.
तसेच सीताफळ वाडीत सीताफळांची.
फणसवाडीत कधी काळीं फणसांची झाडें असतील सुद्धा !
पण एवढे मात्र नक्की, बेसावध राहिलात तर ……
चोर बाजारात तुमचे खिसा-पाकिट साफ !

1 comment:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

मुंबईला जो ब्रिटिशांचा किल्ला होता तो बंदराला सन्मुख होता. त्यामुळे बंदरभाग हा Forebay आणि चौपाटीचा समुद्र हा Backbay अशीं मूळ नावे होतीं. चर्चगेट हे या किल्ल्याचे एक गेट होते ते चर्चच्या दिशेने बाहेर पडण्याचे गेट म्हणून चर्चगेट. दादर TT ला मूळ्चे ट्रॅम टर्मिनस होते. नंतर ती किंग्जसर्कलपर्यंत वाढली. मरीन लाइन्सला पूर्वी सैनिकांच्या बराकी होत्या. महालक्ष्मीच्या देवळात जाण्यासाठी उतरावयाचे स्टेशन म्हणून नांव महालक्षी. हाजीअलीचा काय संबंध? सिताफळवाडी येथे पूर्वी सिताफळाच्या बागा होत्या.
या बहुतेक नावांना इतिहास आहे. आतां काप गेले व भोके राहिली असे झाले असले तरी नावे आकाशातून पडलेली नाहीत.