रात्री मानसीबद्दल विचार करत असताना डॉ. भावे, मानसोपचार तज्ञ, यांच्या मनात आले की हृदय दिलेल्या मुलीच्या आइवडलांना भेटावे. हॉस्पिटलमधून मिळालेल्या पत्त्यावर त्यांची गाठ पडली. डॉक्टरांनी सांगितलेल्या दरोड्याच्या घटनेला त्यानी दुजोरा दिला. मानसीची हकीगत ऐकून त्यानाहि वाटले की मानसीच्या मुखातून आपलीच मुलगी बोलते आहे.कारण सर्व हकीगत ती सुसंगत व बिनचूक सांगत होती. विचारांती डॉ. भावे यानी दरोड्याचा तपास करणार्या पोलिस अधिकार्यांची गाठ घेतली. घटनेला कोणी साक्षीदार नसल्यामुळे गुन्हेगार सापडला नव्हता. मात्र इतर तपास व पुरावा पोलिसांनी केला होता. डॉ. भावेंकडून मानसीची हकीगत ऐकून त्याना आश्चर्य वाटले. पाहूयातरी मानसी काय वर्णन करते ते असा विचार करून त्यानी डॉ. भावेना मानसीला घेऊन येण्यास सांगितले. मानसीचे आई-वडील प्रथम तयार होईनात. पण जर मानसीच्या वर्णनामुळे गुन्हेगार पकडला गेला तर बहुधा मानसीचा त्रास बंद होईल या आशेने ते तयार झाले. मानसीने पोलिसांना दरोड्याची सर्व हकीगत सुसंगत सांगितली. पोलिसांनी विचारले की तू चोराचे वर्णन करू शकशील काय? त्यावर तिने जणू तो तिला दिसतोच आहे असे त्याचे सर्व वर्णन केले. पोलिस चित्रकाराने वर्णन ऐकता-ऐकताच भराभर त्याचे चित्र बनवले. ते पाहिल्याबरोबर मानसी ओरडली ’हाच तो! पकडा याला. यानेच मला गोळ्या मारल्या’
चित्र हातात पडल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली व इतर तपासातूनहि ज्याच्यावर संशय होताच त्या गुन्हेगाराला त्यानी त्याच्या गावातून पकडून आणले. सर्व साक्षीपुराव्याची जुळवाजुळव झाल्यावर त्याच्यावर कोर्टात खटला उभा राहिला. तेथे काय झाले ते पुढच्या भागात पहा.
Thursday, June 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
कथा छान आहे.
Post a Comment