गुढग्याचे विकार (osteoarthritis) आणि हाडांचा ठिसूळपणा (osteoporosis)
डॉ. संजय लोंढे - M.S.(Orth.), D.Orth., F.C.P.S.(Orth.), D.N.B.(Orth.)
F.R.C.S(UK), F.R.C.S(Ireland), M.Ch.(Orth.) Liverpool.
डॉ. संजय लोंढे, मुंबईतील एक प्रथितयश ऑर्थोपेडिक सर्जन यांच्याकडे या वैद्यक शाखेचे सखोल ज्ञान व परदेशातील व मुंबईतील रुग्णालयांमध्ये घेतलेला प्रदीर्घ अनुभव आहे.
५ जुलै २००९ रोजी विले पार्ले येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संजय लोंढे यांचे माहितीपूर्ण भाषण झाले. सोबत उपयुक्त अशा स्लाईड्स दाखविल्यामुळे व विषय विशेषत: ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असल्याने भाषण खूपच उद्बोधक झाले.
प्रथम त्यानी गुढगेदुखीसंबंधी (Osteoarthritis) माहिती दिली. हा आवाक्यात आणता येण्यासारखा विकार असून योग्य इलाज, औषधोपचार व आवश्यक तेथे शस्रक्रिया करून या आजाराच्या त्रासापासून बर्याच प्रमाणात सुटका होते. गुढगेदुखीचे प्रमाण वाढत असले तरी त्याच्यावरील उपाययोजनांमध्येही क्रांतिकारक बदल झाले आहेत व गुढगेदुखीचा आजार खूपच आटोक्यात आला आहे व बर्याच प्रमाणात तो सुसह्य झाला आहे. गुढग्याच्या आतील रचना व त्यात होणार्या बदलांमुळे उद्भवणारी गुढगेदुखी याची त्यानी सविस्तर माहिती दिली.
वयोमान किंवा इतर कारणांनी येणारी स्थूलता व स्नायूंचा कमकुवतपणा यामुळे हा आजार उद्भवतो. या बाबतीत ढोबळमानाने तीन प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. (१) सर्वसाधरण सोपे उपाय: वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे व फिजीयोथेरापी ज्यामध्ये गुढग्याच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. (२) सांध्याला बळकटी आणणारी औषधे घेतल्यास हा त्रास बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. गुढग्यामध्ये इंजेक्शन, पायाच्या हाडावर शस्त्रक्रिया करून गुढग्यावर पडणारा भार संतुलित करणे हेही उपाय फायदेशीर ठरतात. (३) दुर्बिणीद्वारे गुढग्याची तपासणी व 0rthroscopic washout - debridement हा उपाय केला जातो. परंतु हा उपाय गुढगेदुखीच्या प्राथमिक अवस्थेत उपयुक्त ठरतो. मात्र या उपायानी गुढगेदुखी आटोक्यात आली नाही व ती अधिक वेदनामय होऊ लागली तर अन्तिम उपाय म्हणून संपूर्ण सांधा बदलण्याची (Total Knee Replacement) शस्त्रक्रिया आवश्यक ठरते.मात्र ही उपाययोजना बरीच खर्चिक आहे. परंतु ती केल्यास गुढगे जवळजवळ पूर्ववत होतात व पंधरा ते वीस वर्षांपर्यंत कृत्रीम सांधा टिकू शकतो व रोगी सर्वसाधारण जीवन जगू शकतो.
नंतर डॉ. लोंढे यानी Osteoporosis या व्याधीसंबंधी माहिती दिली. या व्याधीमुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात व योग्य काळजी न घेतल्यास हाडे कमकुवत होणे व अपघातामुळे फ़्रॅक्चर होणे या समस्या उद्भवतात. ४० ते ४५ वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. योग्य काळजी घेणे, संतुलित आहार व नियमित आवश्यक व्यायाम यांद्वारे ही व्याधी आटोक्यात राहू शकते. संतु्लित आहारामध्ये रोज १००० ते १५०० mg. कॅल्शियमची आवश्यकता असते व दूध, दही, ताक, लोणी, चीज, कोबी, मासे यातून ते मिळते. त्याबरोबर प्रथिने (proteins) यांचे प्रमाणही चांगले असावे लागते. शिवाय धूम्रपान, मद्यपान या व्यसनांपासून दूर रहाणेही आवश्यक असते.
वरील उपायांव्यतिरिक्त अनेक प्रकारची औषधे, इंजेक्शन्स इ. उपायही उपलब्ध आहेत.
अनेक सभासदानी डॉक्टराना शंका विचारल्या व डॉक्टरानी त्याना समर्पक व सविस्तर उत्तरे दिली.
एका उच्च विद्याविभूषीत, अनुभवी व निष्णात सर्जनच्या भाषणाने या विषयावरच्या अनेक पैलूंचा सभासदाना परिचय झाला व उतार वयामध्ये होणार्या या व्याधीसंबंधीची भीतीही कमी झाली.
Wednesday, July 08, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
उत्तम उपक्रम आहे. समग्र माहीतीबद्दल आभार.
A camp hs been arranged to check density of bones for sr. citizen andwomen above35 years of age on sunday 11th july 09 at Tilak hosp,ram mandir road.vileparle from 9a.m.This informatin I hav collected from the notice put therin, and sent here for information
A camp hs been arranged to check density of bones for sr. citizen andwomen above35 years of age on sunday 11th july 09 at Tilak hosp,ram mandir road.vileparle from 9a.m.This informatin I hav collected from the notice put therin, and sent here for information
please read the date of medical check up as 19th july 2009 in stad of 11th
Dr. Sanjay Londhe kuthe practice karatat ani tyancha contact number dilat tar khup fayada hoil. Mazya Aaila gheun jau shaken tyanchyakade.
Thank you.
Post a Comment