मी एक सोबती . १४ वर्षे सभासद . नांव प्रभाकर भिडे . वय वर्षे ७७ . भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त . ३३ वर्ष सेवेनंतर . शिक्षण बी . ए . स्पेशल ( अर्थशास्त्र ) . ही डिग्री नाममात्र . कारण कोणत्याच विषयांत प्राविण्य नाही . पण सर्व प्रांतात लुडबूड . एक १३ वर्षाच्या मुलाप्रमाणे . केवळ कुतूहला पोटी . त्याचाच एक भाग , शब्दांच्या प्रांतातला . तो म्हणजेच = " शब्द माझे सोबती ."
ऐका तर आणि पहा , पसंतीस उतरते का !
शब्द जरी क्वचित प्रसंगी "एकाक्षरी " आढळले तरी बहुतांशी दोन किंवा अधिक अक्षरांनी बनतात . स्वर आणि व्यंजनानी युक्त .
आई हा एकच शब्द फक्त स्वरांनी ( अ -> अ: ) बनतो . तो सुरांच्या प्रांतातला म्हणजेच देवत्व पावलेला आहे . इंग्रजीत एक म्हण आहे - " Because God could not be everywhere , He created mothers ." मी एक गंमत म्हणून " अ पासून अ: " पर्यंतच्या स्वरांना सुरांचा किंवा देवांचा प्रांत समजतो . " क वर्गापासून प- वर्गातल्या म " या व्यंजनापर्यंतच्या प्रांतास " मानवांचा प्रांत " असे म्हणतो तर " य पासून ज्ञ " पर्यंतच्या मिश्र व्यंजनांच्या प्रांतास - राक्षसांचा प्रांत असे संबोधतो - या संबंधी पुढे कधीतरी बोलू .
सध्या सुरुवात म्हणून मराठी व इंग्रजी भाषेतील कांही शब्दांकडे आपण पाहणार आहोत .
" आई आणि माता "
’ पुत्राचे सहस्र अपराध - माता काय मानी तयाचा खेद ’ ही काव्यपंक्ती तिच्या क्षमाशीलतेची द्योतक - जसे असणे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे .
वास्तविक ’ माता ’ शब्दा ऐवजी ’आई ’ हा शब्द हवा होता असे मला वाटतें . कारण मुलाला चांगले घडविण्याची ताकद ज्या शब्दाने व्यक्त होते तो माता हा शब्द - अत्यंत मृदू अनुनासिक " म " व अत्यंत कठोर व्यंजन ’त’ पासून बनतो . जो आपल्या मुलाला - प्रेम आणि शिस्त - दोन्ही प्रकारे - उत्तम पुरुष बनण्यास मदत करतो . उदाहरण म्हणजे " जिजामाता ."
आपण जर पिता , बाप , बाबा , डॅडी - तात तसेच काका , आत्या , मामा , नाना , नानी वगैरे इतर नात्यासंबंधीच्या शब्दांकडे पहाल तर आपल्यालाही - मृदू व कठोर व्यंजनांनी ते का बनले आहेत ते सहज लक्षांत येईल .
आता थोडे इंग्रजी भाषेतील नातेसंबंध दाखविणार्या शब्दांकडे बघू –
Mother हे सर्व शब्दांच्या शेवटी
Father ther किंवा er आढळतो
Brother मग आणखी एक नाते जे
Sister SON या शब्दाने दाखवले
Daughter जाते . त्याला निराळे दाखवून
एवढे महत्व का दिले असावे ?
मुलगा SON म्हणून निराळे महत्व देण्याचे वास्तविक काहिही कारण नसताना पुढेही हेच चालू राहते.
अध्यक्ष , प्राध्यापक , लेखक , गायक – पुरुष . तर याच जर स्त्रिया असतील तर – पुढे आ कार लावला जातो . इंग्रजीत सुद्धा poetess असे रूप केले जाते . वास्तविक हे शब्द मूलत: व्यवसाय विषयक आहेत . ते स्त्री वा पुरुष या करिता एकच ठेवण्यास प्रत्यवाय नसावा .
आता अशाच एका शब्दाचे पाहू या .
Chairman जर स्त्री असेल तर आपण तिला chair woman म्हणत नाही . म्हणून काही त्याकरिता दोघानाही chair – person म्हणण्याचे कारण नाही . वास्तविक chairman म्हणजे अध्यक्षस्थानावर – chair वर – विराजमान झालेली माणूसरूपी व्यक्ती . ही व्यक्ती पुरुष वा स्त्री असेल तरी अधिकार व जबाबदारी सारखीच , मग chair – person म्हणण्याचा अट्टाहास कशासाठी ? नसावा . कारण या शब्दात पुन्हा पुरुष वाचक son हा शब्द आहेच . मगाशी – नाते विषयक शब्द पाहताना , मुलाला son या नांवाने दिलेले महत्व आपण पाहिलेच आहे –
इत्यलम *
’स्त्री आणि पुरुष ’ – श्रेष्ठ कोण ?
इंग्रजी या वैश्विक भाषेत त्या करिता woman आणि man हे शब्द वापरले जातात व सर्वनामानी ह्यांचा उल्लेख she आणि he असा करितात . सहजच आढळते ते हे की woman आणि she या दोन्ही स्त्रीवाचक शब्दांपेक्षा – man आणि he हे दोन्ही शब्द अक्षर संख्येत छोटे आहेत .
म्हणून वादांत न पडता ज्या व्यक्तीचे कार्य व कर्तबगारी मोठी ती व्यक्ती मोठी असे समजावे .
शब्दांचा शोध –
आम्हाला आमच्या लहानपणी भाषा हा विषय शिकविताना आमचे मास्तर ( या शब्दाविषयी पुढे कधीतरी बोलू ) सांगत , ज्ञान मिळविण्याकरिता क्रियापदाला – प्रश्न विचारत जाणे आवश्यक आहे – जसे ’ कोण , कसा , कुठे , किती , केव्हा , कधी वगैरे प्रश्नार्थवाचक सर्वनामांचा उपयोग करून .
इंग्रजीत हेच काम who , what , which , when , where वगैरे शब्दांनी साधता येते .
गमतीची गोष्ट ही की – मराठीतील प्रश्नार्थवाचक सर्वनामे ’क’ ने सुरवात करतात तर इंग्रजीतील हीच सर्वनामे w ने सुरु होतात . अपवाद केवळ how चा – पण त्यातही शेवटी w आहेच .
गमतीची दुसरी गोष्ट म्हणजे मराठीतील ही सर्वनामे ( हिन्दीत सुद्धा ) ’ क ’ म्हणजे इंग्रजीतील k या उच्चाराने सुरू होतात . तर इंग्रजीतील हेच शब्द ’ w ’ ने सुरू होतात . दोन्हीचे एकत्रीकरणाने असे म्हणता येईल की हा शोध म्हणजेच ज्ञानमार्गातील हा शब्द म्हणजे KNOW . आणखी एक विशेष म्हणजे K ने सुरवात व W ने शेवट होणारा हा एकमेव शब्द आहे .
कदाचित भारतीय माणूस असे गर्वाने म्हणेल , पहा – ज्ञानमार्गाची सुरवात आमच्याच ’ क ’ ने ( K ) होते . तेव्हा आम्हीच या मार्गात श्रेष्ठ . पण त्यावर पाश्चिमात्य असेही म्हणू शकतील की तुम्ही फक्त आरंभशूर आहात – शेवटपर्यंत आम्हीच पोचतो . आणि किंचित उपहासाने असेही म्हणतील – “ We are not worried , whether quest for knowledge starts with a K or W – we just believe in WorK – W or K .
* इत्यलम *
Sunday, January 31, 2010
Wednesday, January 27, 2010
पिती अंधारात सारे ....
(फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या चालीवर)
पिती अंधारात सारे, झाले मोकळे हो ग्लास
नाकानाकातून वाहे एक उग्र असा वास ।
बार जागे झाले सारे, बार बाला जाग्या झाल्या
सारे जमता एकत्र बाटल्याही समोर आल्या ।
एक अनोखे हे मद्य आले ग्लासा ग्लासात
दारु पिउन नवेल्या झाल्या बेवड्यांच्या जाती ।
बार मध्येच सार्यांच्या सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वी पालटे जग भकास भकास ।
जुना सकाळचा प्रकाश झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना दारुनेच अभिषेक ।
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास ॥
(सौजन्य: योगेश देव )

Thursday, January 21, 2010
पुल - साठवणीतल्या आठवणी
महाराष्ट्र सारस्वताचे आराध्य दैवत पु.ल. देशपांडे हे पूर्ण नांव न घेता पुल म्हटले की मराठी माणूस पुलकित होतो. त्यांच्या लेखणीचा संचार वाङमयाच्या प्रत्येक प्रांतात झाला. वाङमयाव्यतिरिक्त, संगीत, चित्रपट, नाटक यांतले त्यांचे योगदान अद्वितीय आहे. सोबत उत्तम अभिनय व वक्तृत्व यांचीही जोड मिळाल्याने मराठी समाज जीवनासाठी एक अमूल्य ठेवा ते ठेवून गेले. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंची गोडी पुनः पुन्हा चाखली तरी ती अवीटच असते. त्यांचे दातृत्व तर ‘ दाता भवती वानवा ’ असेच आहे.
या सार्याना उजाळा देण्यासाठी सोबतीच्या उत्साही सभासदानी ‘ पुल - एक साठवण ’ हा कार्यक्रम आयोजित केला व पुलंचे अनेक वाङमयीन पैलू सादर केले व सभाससाना काव्य, शास्त्र, विनोद यांचा आगळा आनंद दिला.
पुल एक उत्तम पेटी वादक होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांचे ध्वनिमुद्रित पेटीवादन ऐकवून कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली गेली. त्यानंतर त्यानी संगीतबद्ध केलेली अनेक ध्वनिमुद्रित चित्रपट गीतेही ऐकविण्यात आली. संगीतकार पुल ही आठवण ताजी झाली.
‘व्यक्ती आणि वल्ली’ या त्यांच्या पुस्तकातील ‘ अंतू बर्वा ’ हे शब्दचित्र सौ. रेखा चिटणीस यानी आवश्यक तेथे कोकणस्थ ब्राह्मणी ठसक्यात सादर केले.
नंतर पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. श्री. विजय पंतवैद्य, श्री. प्रभाकर देवधर, सौ. उषा देवधर, सौ. रेखा चिटणीस, सौ. ठोसर यानी हा प्रवेश उत्तम वठविला.
पुलंच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील वजन कमी करण्यासाठी अनेक रहिवाश्यानी केलेल्या डाएट संबंधीच्या भन्नाट सूचनांवर आधारित विनोदी लेख ढंगदारपणे साद्रर करण्यात आला आणि ‘बटाट्याची चाळ’ मधील त्यांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण ताजी झाली.
पुल दोन अर्थाने ‘कोट्याधीश’ होते - एक त्यानी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या सामाजिक व शैक्षणिक संस्थाना दिल्या व त्याही कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून. दुसरे म्हणजे त्यांची शाब्दिक कोट्या करण्याची अपूर्व हातोटी. श्री. विजय पंतवैद्य यानी पुलंच्या अनेक शाब्दिक कोट्या ऐकवून ‘कोट्याधीश’ पुलंची आठवण करून दिली.
पुलंचे अफाट कर्तृत्व मोजक्या वेळात उलगडून दाखविणे खरोखरच कठीण आहे. तरीही हा कार्यक्रम पुलंच्या आठवणीना उजाळा देउन गेला.

Wednesday, January 20, 2010
जगातील सर्वांत मोठे फूल
Monday, January 18, 2010
कांही महान व्यक्तींच्या पूर्वायुष्यांत ….
रेडियोवर बातम्या सांगण्याच्या जागेकरिता आलेला त्याचा अर्ज त्याच्या आवाजामुळे नाकारला गेला. त्याला असेही सांगितले गेले की त्याच्या विचित्र लांब नांवामुळे त्याला कधीच प्रसिद्धी लाभणार नाही .
तो अर्जदार होता अमिताभ बच्चन !
हा एका गरीब बापाच्या सात मुलांपैकी पाचवा मुलगा . एका लहानशा गावात वृत्तपत्रे विकून, कुटुंबाला तो थोडाफार हातभार लावी . त्याच्या शाळेतही , फार चुणचुणित असा काही तो नव्हता. धर्म आणि अग्नीबाण यांबद्दल मात्र त्याला बरेच कुतुहल होते . त्याने तयार केलेला पहिला अग्नीबाण सोडल्यानंतर लगेचच कोसळला . त्याने तयार केलेले क्षेपणास्त्र इतक्या वेळा अपयशी ठरले की तो एक उपहासाचा विषयच झाला . पण याच व्यक्तीने भारताच्या अवकाश भरारीचा मार्ग एकहाती रेखाटला .
हे आहेत आपले पूर्व राष्ट्रपती अबुल पाकिर जैनुद्दिन अब्दुल कलाम .
१९६२ मध्ये , चार संगितकारांच्या एका चमूने ’डेक्का रेकॉर्डिंग कंपनी ’ च्या अधिकार्यांसमोर , त्यांच्या ध्वनीमुद्रणाची पहिली चांचणी दिली . डेक्काच्या अधिकार्यांवर त्यांच्या संगिताची छाप पडली नाही . त्या संगीतकारांना नकार देतांना डेक्काचा एक अधिकारी म्हणाला ,”आम्हाला यांचा आवाज कांही भावला नाही. गिटार या वाद्याची आता पिछेहाट होतेय.”
हीच चौकडी कालांतराने ’ द बीटल्स ’ म्हणून प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचली .
१९४४ साली, नॉर्मन जीन बेकर या मॉडेल होण्याचे स्वप्न पाहणार्या युवतीला , एम्मेलिन स्नाइव्हली या ’ब्ल्यू बुक मॉडेलिंग एजन्सी ’ च्या डायरेक्टर , तिला नकार देतांना म्हणतात, ’तू सेक्रेटरी व्हायचे ठरवावे किंवा लग्न करून मोकळे व्हावे . तेच तुझ्या दृष्टीने योग्य होईल.’
ही युवती नंतर मेरिलिन मन्रो म्हणून प्रसिद्धीस आली.
१९६४ मध्ये , ग्रॅंड ओल्ड ऑपेराचे मॅनेजर जिमी डेन्नी यानी कंपनीत गायक म्हणून नोकरीवर असलेल्या माणसाला काढून टाकताना असाही उपदेश केला ,’मुला, तुझी कोणत्याही दृष्टीने प्रगती होताना मला दिसत नाही. तू परत ट्रक ड्रायव्हर होणेच उत्तम !’
हा गायक होता एल्व्हिस् प्रिस्ली .
एका सद्गृहस्थाने १८७६ साली दूरस्थांशी संभाषण करण्याच्या यंत्राचा शोध लावला . या शोधाला पाठबळ द्यायला तेव्हा कोणीच पुढे येईना . मात्र , प्रेसिडेंट रुदरफोर्ड हायेस् यांना प्रत्यक्षिक दखविल्यानंतर ते म्हणाले ,’हा शोध आश्चर्यकारक आहे .पण हे उपकरण आपल्याकडे असावे हे कोणाला कधी वाटेल , कोण जाणे !’
ते अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या संशोधकाशी बोलत होते.
१९४० मध्ये , आणखी एका युवा संशोधकाने ( त्याचे नांव चेस्टर कार्लसन् ) त्याची कल्पना जवळ जवळ वीस कंपन्यां पर्यंत पोहोचवली. यांत कांही अमेरिकेंतील सर्वांत मोठ्या कंपन्याही होत्या. त्या सर्वांनी त्याला परतीची वाट दाखवली.
सात वर्षांच्या प्रदीर्घ कालाच्या नकारांनंतर , त्याने न्यू यॉर्क मधील हॅलॉइड ह्या छोट्या कंपनीला आपल्या electrostatic paper-copying process या शोधाचे हक्क विकले .
हीच हॅलॉइड कंपनी पुढे झेरॉक्स कॉर्पोरेशन म्हणून प्रसिद्धीस आली .
एकूण बाविस मुलांपैकी विसावी असलेल्या मुलीला तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी डबल न्युमोनिया व स्कार्लेट फिव्हर यांनी गाठले . त्यांमुळे तिचा डावा पाय लुळा पडला. चालण्याकरिता leg brace वापरणे तिला आवश्यक झाले . वयाच्या नवव्या वर्षी, ब्रेसच्या आधाराशिवाय चालायचे तिने ठरविले . तेराव्या वर्षी तिने धावपटू होण्याचे ठरविले . पण ज्या ज्या शर्यतींत ती भाग घेई , त्या प्रत्येकीत तिला अपयश येई . पण ती अखंड प्रयत्न करीत राहिली . अखेर असा एक काळ सुरू झाला की ती प्रत्येक शर्यत जींकू लागली .
ही विल्मा रुडॉल्फ् , जिने ऑलिम्पिक शर्यतींत तीन सुवर्ण पदके मिळविली.
साधी सोप्पी प्रमेये सुद्धा सोडविता येत नाहित व गणिताकडे लक्ष नाही म्हणून एक शालेय शिक्षिका त्याचा नेहमीच उद्धार करी . ’ तू आयुष्यांत कांहिच करू शकणार नाही .’ ती त्याला म्हणे. त्याची आई मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, त्याला गणिताचे पाठ देत राहिली .
हा मुलगा म्हणजे आल्बर्ट आइनस्टाइन .
जो कधीच पराभुत झाला नाही तो जेता नव्हे . जेता तो की ज्याने कधीच माघार घेतली नाही .

Tuesday, January 12, 2010
परमात्म्याबरोबर एक मुलाखत
मी देवाची मुलाखत घेतल्याचे मला स्वप्न पडले .
“ तुला माझी मुलाखत घ्यायची आहे तर ? ” देवाने विचारले .
“ जर तुला वेळ असेल तर .” मी म्हणालो .
देवाने स्मितहास्य केले , म्हणाला “ अरे माझ्याकडे अमर्याद वेळ आहे .
…. कोणते प्रश्न विचारायचे तुझ्या मनांत आहे ? ”
“ मानवाच्या कोणत्या वागणुकीबद्दल तुला जास्त आश्चर्य वाटते ? ” मी विचारले .
देव म्हणाला, “ त्यांना बाल्यावस्थेचा लवकरच कंटाळा येतो आणि प्रौढावस्थेत जायची ते घाई करतात . नंतर परत बाल्यावस्थेत यायला आतूर होतात …..
“ पैशांच्या हव्यासापायी आपले आरोग्य ते हरवून बसतात व नंतर निरोगी होण्याच्या प्रयत्नांत जमविलेला पैसा गमावतात…..
“ भविष्याच्या चिंतेमुळे त्यांना वर्तमानाचा विसर पडतो….. तो इतका की ते धड वर्तमानांत नसतात ना भविष्यकाळांत .
“ ते असे जगणे जगतात की त्यांना मरणाचा जणू विसरच पडला आहे . पण मृत्यू असा येतो की जणू ते कधी जगलेच नाहित. ”
देवाने माझा हात हातांत घेतला आणि कांही वेळ आम्ही नि:शब्द राहिलो .
नंतर मीच विचारले ,“ जगाचा पालनकर्ता म्हणून तुझ्या प्रजेने कोणती जीवनमुल्ये अंगी बाणवावित ? ”
“ दुसर्याला , आपल्यावर प्रेम करायला कोणीही भाग पाडू शकत नाही हे त्यांनी शिकावे. स्वत:वर प्रेम करणे एव्हडेच ते करू शकतात ……
“ आपली अन्याशी तुलना करू नये हे त्यांनी शिकावे …..
“ क्षमा करण्याची संवय त्यांनी लावून घ्यावी…..
“ ज्याच्यावर ते प्रेम करतात त्यांच्या जखमा चिघळवायला कांही क्षण पुरतात पण या जखमा बुजण्याकरिता खूप वेळ सुद्धा अपुरा पडेल हे त्यांनी ध्यानांत घ्यावे …..
“ श्रीमंत माणूस तो नव्हे की ज्याच्याकडे खूप कांही आहे . श्रीमंत तोच की ज्याच्या गरजा अत्यंत कमी आहेत , हे त्यांनी शिकावे. …..
“ दुसर्यावर प्रेम करणारे लोक आहेत पण ते प्रेम कसे व्यक्त करावे हे त्यांना अजून कळलेले नाही हे त्यांनी शिकावे …..
“ दोन व्यक्तींना एकच वस्तू वेगवेगळी दिसू शकते हे त्यांनी शिकावे…..
“ केवळ एकमेकांना क्षमा करून भागत नाही . त्यांनी स्वत:लाही माफ करणे आवश्यक आहे हे त्यांनी शिकावे .”
“ मला वेळ दिल्याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे ” , मी नम्रपणे म्हणालो, ”तुझ्या प्रजेने आणखी कांही जाणावे असे तुला वाटते काय .”
देव हंसला आणि म्हणाला –
“ फक्त एव्हडेच लक्षांत ठेव की मी आहे , सदैव आहे !”

Saturday, January 09, 2010
मी माझा – कविता : चंद्रशेखर गोखले
नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा .
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळलेलं पानसुद्धा गळताना
तन्मयतेनं पाहणारा .
माझ्या हंसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका .
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा .
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळलेलं पानसुद्धा गळताना
तन्मयतेनं पाहणारा .
माझ्या हंसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका .
Monday, January 04, 2010
स्त्रिया शिकून नोकरी-व्यवसायात उतरून नेटका संसार करण्याचा प्रयत्नही
करू लागल्या. पण पुरुष संस्कृतीचा पगडा अजूनही आहे. स्त्रीला आपल्या
इच्छा आणि आवडीना नवर्याकडून कसा प्रतिसाद मिळतो त्याचे चित्रण
खालील कविता करते. थोड्याफार फरकाने अनेक घरात हे घडत असते.
सोबतीच्या कवि संमेलनातील सौ.जयश्री तांबोळी यांची स्वरचित कविता.
एक रविवार घरोघरीचा
उद्याचा रविवार मजेत घालवू, दोघानीही केला ठराव,
ती उठली उजाडताच, तो पेपर चाळीत अंथरुणात ।
तिने केली फिल्टर कॉफ़ी, त्याला गरमागरम चहा
नाश्त्याला करते उपमा, त्याला हवा मसाला डोसा ॥
तिने केली भरली वांगी, उंदियो आणायला गेला दुकानात
ती करणार मटार पुलाव, त्याला पाहिजे मसाले भात ।
टी.व्ही. वरील सिनेमा पाहू आले तिच्या मनात
पेपरात डोके घालून तो पसरला आरामात. ॥
आवरून ती बाहेर आली, केला ऑन टी.व्ही.
हातातल्या रिमोटने मॅच त्याने केली सुरु ।
दिवस दिवस मॅच पहातोस, जणू आहे क्रिकेटर
अन तू मोठी कलाकार, त्याने चिडून दिले उत्तर ॥
सुट्टीत जाउ माथेरानला, मांडला तिने प्रस्ताव
छे, तिथे फिरावे लागते चालत, नाही वाहनाला वाव,
त्यापेक्षा गोव्याला जाउ, मस्त समुद्रावरील वारा,
नको उन्हाचा ताप, तेथील फ्लॅटच आपला बरा ॥
एकाही विषयावर नाही होत एकमत,
तरी आपण एकत्र कसे, बसली ती विचार करत ।
धुसफुसत सरला दिवस, सोमवारपासून पायाला चाक,
जी. जी. एम.सी. म्हणत तिने पुसले डोळे आणि नाक ॥
(जी.जी. एम.सी.. = घरोघरी मातीच्या चुली)
-- कवयित्री: सौ. जयश्री तांबोळी

Subscribe to:
Posts (Atom)