Friday, May 28, 2010

अफलातून फोटोग्राफी









रॉबर्ट बेल्टेमन नावाच्या २५ वर्षे फोटोग्राफीमध्ये नाव कमावलेल्या माणसाने तेचतेच करत राहाण्याचा कंटाळा आल्यामुळे चालता व्यवसाय बंद केला. मग किर्लियन फोटोग्राफी नावाच्या एका जुन्याच फोटोपद्धतीमध्ये प्रयोग सुरू केले. या पद्धतीत कॅमेरा, लेन्स, कॉम्प्यूटर यातले काहीच वापरत नाहीत. ज्या वस्तूचा फोटो काढावयाचा ती फोटोग्राफिक प्लेटवर ठेवून तिच्यातून विद्युतप्रवाह सोडावयाचा व तिच्यातून बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गाचे फोटो प्लेटवर उमटवायचे असा हा वेगळा प्रकार असतो. या माणसाने हे काम खूप मोठ्या प्लेटवर करून पाहिले. हे काम फार वेळखाऊ असते. एक वर्षात त्याचे फक्त दोन फोटो तयार झाले. पत्नीने त्याला वेड्यातच काढले. पण त्याच्या फोटोतले अफलातून रंग प्रेक्षकाना भावले. अतिशय उच्च विद्द्युतदाब वापरून हे काम करावे लागते त्यामुळे ते धोकेबाजहि आहे. एका छोट्याशा, केसाएवढ्या काडीने हे चित्र बनवले जाते मात्र मिळणारे रंग वेगळेच असतात.
पस्तीस देशांमध्ये या माणसाचीं चित्रे प्रदर्शित झाली आहेत. या चित्रांतील अनोखे रंग आपणाला आवडतील.
नॅशनल जिओग्राफिक वरून

2 comments:

Vinod said...

Fantastic photos! I am, senoir citizen, staying away in Rasayani, near Panvel, but i would like to join and post some photos shot by me Can i do that? Vinod Sahasrabuddhe

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नमस्कार.
हा ’सोबती’ या संस्थेचा ब्लॉग आहे व यावर सोबतीचे उपक्रम व कार्यक्रम आणि सोबती सभासदांचे लेखन याला प्रसिद्धि देण्यात येते. यावर तुमचे फोटो वा लेखन प्रसिद्ध करणे उचित होणार नाही हे तुम्हालाहि मान्य होईल. तुम्ही स्वत:चा ब्लॉग सुरू करा ना! मदत लागली तर pkphadnis@yahoo.com येथे संपर्क करा.