उत्तर गोलार्ध परत एकदा सुर्याच्या दिशेकडे झेपावतोय , फ़ुलांना जाग येते आहे , नव्या आयुष्याची पहाट उगवतेय . घराबाहेर पडून हिंडण्याकरिता माणसे परत प्रवृत्त होताहेत . नव्या ऋतूची – वसंताची चाहूल बागा , शेतं , झू , सण – सर्वत्र दिसून येतेय . शिशिराचे शेवटचे अवशेष नवऋतूच्या आगमनाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ।
२७ मार्च २०१० – सोफी ऑल्सन् ट्युलिपच्या बागेतून मार्ग काढतेय . येथे २५ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान , ट्युलिप फेस्टिवल असते ।

१ एप्रिल २०१० – अलास्का युनिव्हर्सिटित फेअरबॅंक्स् येथे जन्माला आलेला , या ऋतुतील हा पहिला नर रेनडिअर बच्चा . जनतेने सुचविलेल्या नांवांतुन एक नांव याला देण्यांत येईल ।

२ एप्रिल २०१० – उत्तर आयर्लंड मधील एका फार्महाउस मध्ये एका कोकराला निवारा मिळालाय . कमालीच्या थंड हवामानामुळे , या वर्षी कित्येक नवजात पाडसं दगावली . हज्जारो घरांत विजेचा पुरवठा खंडित झाला होता .

५ एप्रील २०१० – चीनमधील हेफेइ प्रांतात , एक मधुमक्षिका पालक , मधमाशांच्या पोळ्यासह . या पालकांचे गट दक्षिण चीन पासून उत्तर चीन पर्यंत तेथील फुले फुलण्याच्या कालक्रमानुसार , मधाची पोळी घेऊन प्रवास करतात .

२२ मार्च २०१० - केवळ कांही आठवड्यापूर्वीच जन्मलेले हे चिंचिला जातीचे सशाचे पिल्लू गवत कुरतडतेय , म्युनिक येथील सशांच्या फार्म मध्ये . स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता , येथे सशांची निपज करतात .

२९ मार्च २०१० – कार्ल्सबाद , कॅलिफोर्निया येथील रॅंचमधील फुले . जवळ जवळ ५० एकर जागेत , जायंट टेकोलोट रॅनुनक्युलस जातीची फुलं प्रत्येक वर्षी मार्च ते मे च्या दरम्यान पूर्ण जोमात फुललेली असतात .

४ एप्रिल २०१० – हंसांचा समूह त्यांच्या शीतकालिन निवास स्थानाकडून , एव्हन नदीतून , स्ट्रॅटफोर्ड ( ओंटारिओ ) कडे सरकतोय . साथीला बॅगपाइपर्स .

२१ मार्च २०१० – व्हाइट रिव्हर जंक्शन येथील तेवीस वर्षांची मिस् स्मिथ बर्फाच्छादित तळ्यात , २०१० च्या शिशिराच्या अखेरीस असणार्या वार्षीक सोहोळ्यात भाग घेण्याकरिता , पोहोण्याचा सराव करतेय .

४ एप्रिल २०१० – ३ वर्षाची एलिना ड्युश , इस्टर एग्ज शोधण्याकरिता

२ एप्रिल २०१० – एक कश्मिरी महिला , काकपोरा खेड्यात राइची भाजी घेऊन चाललीय .
No comments:
Post a Comment