Friday, May 09, 2008

विडंबन गीत


’सोबती’मध्ये कवि-कवयित्री खूप. मी कविता करणारा नाही. तरीहि एक विडंबन गीत येथे टाकण्याचा मोह आवरत नाही. क्षमस्व.

माझे जेवण गाणे .........गाणे.

व्यथा असो आनंद असूं दे
उपास किंवा उत्सव असुदे
भूक असो अथवा न असूंदे
खात पुढे मज जाणे ....... माझे ...

कधी जेवतो हॉटेलातुन
कधि ऑफिसच्या कॅंटीनातुन
कधि ’खोक्या’तुन, कधि ढाब्यातुन
पोट भरुन मज घेणे ........ माझे ....

या मित्रानो माझ्या मागे
चवीपरीने खाऊ संगे
तुमच्यापरि माझ्याहि खिशातुन
खुळखुळते हे ’नाणे’ ......... नाणे ..... माझे जेवण गाणे .... गाणे.

4 comments:

sachin patil said...

’सोबती’मधील विडंबन गीत
माझे जेवण गाणे .........गाणे.

वाचुन मजा वाटली .
मी एक तरुण युवक आहे तेव्हा आपल्या
सोबतीतल्या \o-o\ (चष्म्या लावलेल्या )ज्येष्ठ नागरिकांचा ऊत्साह पाहुन आनंदही वाटला.

एका आजोबांच्या ओळी आवडल्यात...
कधी जेवतो हॉटेलातुन
कधि ऑफिसच्या कॅंटीनातुन
कधि ’खोक्या’तुन, कधि ढाब्यातुन
पोट भरुन मज घेणे ........ माझे ....

हो ! खाण्याचा आस्वाद घेण्यापुर्वी मला ही असे वाटते हे सार करतांना एक चुर्ण ही का सोबत नसाव??...हा एक अजीर्ण करणारा महत्वाच प्रश्न पुढे शिल्लक आहेच.
विबंडन काव्य माणसाला हसवते..शेवटी हेच हसते हसते कट जाये रस्ते ......!!!

Asha Joglekar said...

मस्त आहे जेवण गाणे।

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्या कॉमेंट्स वाचून आनंद झाला. सोबतीला वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर इतरही काही प्रयोग करून पाहण्याची उमेद बाळगून आहे.

कृष्यणकुमार प्रधान said...

vara jeva pimpaltoon sanayi fuke lagala,dhagacha dhole dhamadhama vajayala lagala,vijecha tasha jeva kadakadayala lagala,pwus foolancha varshava karu lagala.,sobaticha arshikotsava suru jahala, talyanchya gajarachi tyala satha have dyayaala.
krishnakumarpradhan@gmail.com