आमचे एक सभासद श्री. शंकरराव लिमये यांच्या पत्नी श्रीमती लिमये यांचे एक अबोल समाजकार्य गेली अनेक वर्षे चालू आहे. मुलामुलींसाठी वा इतरांसाठी कपडे शिवून झाल्यावर काही तुकडे उरतातच. त्यातून दुपटी, गोधड्या शिवण्याचे कार्य़ जगभरच्या महिला करतात व उत्कृष्ठ कलाकृतिही त्यातून निर्माण होत असतात. श्रीमती लिमये अश तुकड्यातून, स्वत:च्या व इतरांकडच्याहि, लहान मुलामुलींसाठी कपडे, गोधड्या शिवून त्या गरीब वा अनाथ मुलांना वाटतात. श्री. लिमये वेळोवेळी उरलेल्या तुकड्यांची मागणी सोबती सभासदांकडे करतात व या व इतरहि मार्गानी श्रीमती लिमयांच्या कार्याला हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी असे कपडे वरोरा येथील डॉ. विकास आमटे यांच्या महारोगी सेवा समितीकडे पाठवले. त्यांचेकडून श्रीमती लिमये यांना आलेले आभारप्रदर्शक पत्र आज छापले आहे. हौसेतून व कलोपासनेतूनहि समाजसेवा साधता येते याचे हे उदाहरण इतरांस प्रेरणा देऊ शकेल.
(पत्र वाचण्यासाठी त्यावर क्लिक करा.)
2 comments:
श्री. शंकरराव लिमये यांच्या पत्नी श्रीमती लिमये आपल्या सोबतीतील हे एक सभासद जोडपे कुणासाठी तरी काहीतरी फ़ुलन फ़ुलाची पाकळी देत आहेत आणि त्याची पावती ही आनंदवनातुने आलेली पाहिली .आजच्या जगात फ़ारच थोडी माणसं आहेत की ती केवळ दुस-यांसाठी जगतात ,झटतात...!
ही पण त्यातली आहे...!
हो आजोबा...आपण सोबतीतल्या सर्व सभासदांची ओळ्ख एकदा सर्वांचे एकत्रित फ़ोटोतुन नावानिशी आपल्याच सोबतीच्या बाँगवर करुन द्यावी ...असे वाटते...एकुण सोबती खरच सर्वांचाच “सोबती ” आहे असे वाटते...
सोबतीचे ४४० सभासद आहेत. ज्याचे लिखाण वा ज्याच्याबद्दल लिखाण असेल त्याचा/तिचा फोटो माझ्या कॉंप्यूटर्वर असला तर मी छापतोच आहे. मी सोबतीमध्ये आवाहनही केले आहे की मजकूर द्याल तेव्हा माझ्याकडे आलात तर मी लगेच तुमचा डिजिटल फोटो काढून घेईन व वापरीन! सोबतीच्या सहलीचा स्लाइड शोहि आहेच. तुम्हाला ’सोबती’बद्दल आपुलकी वाटते आहे याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद
Post a Comment