Tuesday, May 05, 2009
‘वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड’
‘वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड’
सोबतीचे एक ज्येष्ठ व व्यासंगी सभासद श्री. प्र.के.फ़डणीस यांनी आजवर रामायणावरील साहित्याचे विपुल वाचन केले आहे. विशेष म्हणजे आपण जे वाचतो त्यावर त्यांचे मननही चालू असते आणि ते मनन श्रोत्यांच्या...नुसते कानापर्यंतच नव्हे, तर मनापर्यंत जावे या हेतूने ते मधून मधून व्याख्य़ानेही देत असतात.
‘वाल्मिकी रामायणातील अरण्य़कांड’ या विषयावर, ‘सोबती’ने दिनांक २२ एप्रिल २००९ रोजी त्यांच्याच भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री. फ़डणीस यांनी भाषणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी स्थळ-काळाचे संदर्भ देवून अतिशय मुद्देसूदपणाने आपले विचार मांडले.
वनवासात असताना प्रभू रामचंद्र व सीता यांची प्रथम ‘विराध’ नावाच्या दैत्याशी गांठ पडली व तेथपासून पुढे अकरा वर्षेपर्यंत अनेक स्थळांना भेटी देत देत, ऋषीमुनींच्या भेटी घेत घेत ते ‘पंचवटी’ या ठिकाणी आले. त्या काळी ‘खर’ आणि ‘दूषण’या दैत्यांची जेथे अनिर्बंध सत्ता होती त्या पंचवटीतच राक्षसकन्या शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग घडलेला आहे.
वास्तविक प्रभू रामचन्द्रांजवळ तपःप्रभाव, शस्त्रप्रभाव असूनही त्यांनी केवळ शूर्पणखेलाच लक्ष्य बनविले खरे, परंतू त्या कॄत्यामागे केवळ तेथील प्रस्थापित राक्षसी सत्तेला आव्हान देण्य़ाचाच त्यांचा हेतू होता व तो तात्काळ सफ़लही झाला ! कारण त्याचाच परिणाम म्हणून पुढे रावणाने, ‘शूर्पणखेची मानहानी’ हा समस्त दैत्यकुळाचा अपमान समजून त्याचा बदला घेण्य़ासाठी म्हणून सीतेचे अपहरण केले..!
वास्तविक रावण हा सुद्धा थोर तपस्वी, पुण्यबल होता. पुण्याचं कवच होतं त्याच्याभोवती ! सीतेविषयी त्याच्या मनात बेलगाम वासनाविकारही नसावा असे दिसते. कारण त्याच वेळी सीतेशी असभ्य वर्तन करणॆ सहजशक्य असूनही, तसे काहींही न करता त्याने केवळ तिचे अपहरण करून तिला लंकेमध्ये नेवून ठेवले! अर्थात रामांबरोबर युद्ध करण्याची वेळ आलीच तर त्यावेळी युद्धभूमीसुद्धा आपल्या खास परिचयाची असावी, जेणॆकरून युद्ध जिंकणे सहज शक्य होईल या कूटनीतीनेच त्याने सीतेला लंकेमध्ये नेले असावे, असा एक तर्कसंगत व अभ्यासपूर्ण द्रष्टीकोन श्री. फ़डणीस यांनी मांडला व तो खरोखरच श्रोत्यांना नव्याने विचार करायला लावणारा होता.
सुमारे सव्वा तासाच्या भाषणानंतर, श्री. फ़डणीस यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
While expressing our opinion, one should not totally ignor what explantions are given in th puranas for piculiar behaviour of the personalities mentioned there. The readers of this blog and the audience of sobati are well ducated and there is no sccope for andhashraddhaa but the puranas write that ravan could not misbehave with seeta because her fidelity was so great that he would have burned himself by touching her with an evil intent.
So it is not fair to say that he did not have sin in his mind.
मला हा दृष्टिकोन पटत नाही. रावणाची एक प्रतिमा निर्माण झाल्यावर सीतेशी त्याचे प्रत्यक्ष वर्तन वेगळे दिसते ते कां याचे हे पुराणानी रचलेले उत्तर आहे. त्यापेक्षा रावणाचा हेतु वैषयिक वा वैयक्तिक नसून राजकीय होता असे मानणे हे रावणाला जास्त न्याय देणारे आहे. अनादिकाळापासून स्त्रीचे जबरदस्तीने हरण करणारा कोणीहि पुरुष तिला स्पर्ष केल्याने जळून मेलेला नाही!
Post a Comment