मागे आपण रंगीत हिमनग पाहिलेत. आज जे फोटो आपल्याला दिसताहेत ते आकाशांतील रंग आहेत. यांना ऑरोरा बॉरिआलिस असें म्हणतात. आकाशाच्या उत्तरध्रुवाजवळच्या भागांत कित्येक दिवसांची दीर्घ रात्र चालू असताना सूर्य क्षितिजाच्या खालीं असताना हे दिसतात. अजब आहे ना निसर्गाचे रंगकाम?
Northern Lights हे नाव बरोबर आहे. मी दिलेले नाव बर्याच पूर्वीपासून माझ्या वाचनात होते. ते बहुतेक लॅटिन असावे. दक्षिण ध्रुवाजवळ असे काही उजेड व रंग दिसतात काय हे माहीत नाही. हे फोटो national geographic मधून घेतलेले आहेत.
’सोबती’ ही विले-पार्ले, मुंबई येथील ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे. बहुतेक सभासदांचा संगणक, ब्लॉग वगैरे गोष्टींशी फारसा परिचय नाही. त्यांचे वतीने श्री. प्र. के. फडणीस यांनी हा ब्लॉग सुरू केला.’सोबती’ने हा ब्लॉग चालवण्याचे काम दि.०१/०१/२००९ पासून स्वत: स्वीकारले आहे. कार्यकारी मंडळाचे वतीने श्री. विश्वास डोंगरे हे काम पाहत आहेत. त्याना आवश्यक ती मदत श्री. फडणीस करतात. श्री. चंद्रकांत पतके यांचाही आता ब्लॉगलेखकांत समावेश झाला आहे. सोबती सभासदांचे लेख, कविता येथे वाचावयास मिळतील. सोबतीच्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती वेळोवेळीं दिली जाईल. आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर नोंदवा. त्या ’सोबती’ सभासदांना वेळोवेळी कळवल्या जातील
सोबतीचे पदाधिकारी
अध्य्क्ष : श्री. मुकुंद पेठे
उपाध्यक्ष : श्री. सुरेश निमकर
कार्य़ाध्य्क्ष : श्री. विश्वास डोंगरे कोषाध्यक्ष : श्रीमती वैजयंती साठे
कार्यवाह : श्री. विजय पंतवैद्य कार्यवाह : श्रीमती शीला निमकर
सोबतीचें समाजकार्य व निधि
’सोबती’ प्रत्यक्ष समाजकार्य करत नाही. मात्र सोबतीने सभासदांकडून व इतरांकडून देणग्या मिळवून खालील निधि सुरू केले. वेळोवेळी संस्थेच्या वार्षिक उत्पन्नातून त्यांत भरहि घातली. निधींच्या गुंतवणुकींवर मिळणार्या व्याजाचा उपयोग निधींच्या उद्दिष्टांप्रमाणे समाजकार्यासाठी केला जातो.
२.समाजकल्याण व विकास निधि : समाजकार्य करणार्या लहानमोठ्या संस्थाना आर्थिक सहाय्य.
३. ज्येष्ठ नागरिक सेवा-सुविधा निधि : गरजू ज्येष्ठ नागरिकांस वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत.
’सोबती’च्या वार्षिक अहवालांमध्ये याबद्दल विस्तृत माहिती दिली जाते.
वाचकांस या उपक्रमांना आर्थिक सहाय्य करावयाचे असल्यास pkphadnis@yahoo.com वर संपर्क साधावा. देणग्यांवर प्राप्तिकर सवलत मिळते.
वाचणारांचे स्वागत
किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. खाली जगाच्या नकाशात वाचणारांचे स्थानहि पहावयास मिळेल. सोबती जगभर वाचला जातो आहे आणि त्यांत अनेक तरुण पण असतात याचा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना आनंद आहे. आपल्या प्रतिक्रियाही देण्यास विसरू नका.
3 comments:
yala 'northern lights' asahi mhantat na i guess? meena prabhunchya pustakat ullekh hota.. north la ekdam asa dista na?
बरोबर नॉर्दन लाईट्स पण म्हणतात. ध्रुवीया भागांमध्ये रात्रीच्या वेळेस, बहुदा ऑक्टोबर मध्ये जास्तीत जास्त वेळा हे दिसुन येतात.
Northern Lights हे नाव बरोबर आहे. मी दिलेले नाव बर्याच पूर्वीपासून माझ्या वाचनात होते. ते बहुतेक लॅटिन असावे.
दक्षिण ध्रुवाजवळ असे काही उजेड व रंग दिसतात काय हे माहीत नाही.
हे फोटो national geographic मधून घेतलेले आहेत.
Post a Comment