Saturday, May 08, 2010

हुशार सुंदरलाल

एकदा सुंदरलाल डायनासोरचा सिनेमा पहायला गेला . सिनेमात , डायनासोर जसजसा चाल करून येतो , सुंदरलाल घाबरून खुर्चीला गच्च धरून खुर्चीवर बसतो. शेजारचा प्रेक्षक विचारतो , “ काय प्रकार आहे ? कसली भिती वाटतेय ? सिनेमा तर आहे .” सुंदरलाल म्हणतो, “ मी माणूस आहे आणि मला अक्कल आहे . हा सिनेमा आहे याची जाणीव आहे . पण ते जनावर आहे . त्याला काय हे माहित ?”
----------
सुंदरलालचा रेल्वेच्या रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे . तो फ्राय चिकन व वाइनची बॉटल घेउन , रुळावर बसला आहे . जाणारा विचारतो , काय हो , हे सर्व घेऊन , असे का बसलायत ? सुंदरलाल म्हणतो , साल्या ह्या ट्रेन्स हल्ली फार उशिराने येतात .त्यामुळे माझा भुकबळी न गेला म्हणजे मिळ्वली .
----------
एकदा लांब दाढी असलेले सुंदरलाल रेल्वेने आपल्या गांवाला निघाले . त्यांना झोप येवू लागली म्हणून शेजा-याला वीस रुपये देऊन बदली गांव आले की उठव म्हणून सांगितले . शेजारी होता न्हावी . त्याने विचार केला की वीस रुपयांच्या बदल्यात आपण त्याला अधिक सेवा देऊ लागतो . त्याने झोपेतच त्याची दाढी करून टाकली . स्टेशन आल्यावर सुंदरलाल उतरला . घरी पोहोचल्यावर तोंड धुवून आरशासमोर उभा राहिला आणि किंचाळलाच . बायकोने विचारले , काय झाले . सुंदरलाल रागानेच म्हणाला , त्या बदमाशाने माझे वीस रुपये घेतले आणि उठवले भलत्यालाच .
----------
मुंदरलाल व सुंदरलाल मुंबईला पोहोचले आणि एका डबल डेकर बसमध्ये कसेबसे शिरले . मुंदरलालला खालच्या डेकवर जागा मिळाली तर सुंदरलालला वरच्या डेकवर . कांही वेळाने गर्दी कमी झाल्यावर मुंदरलाल सुंदरलालच्या शेजारी बसण्याकरिता वरच्या डेकवर गेला . पहातो तर काय , सुंदरलाल जिवाच्या आकांताने दोनही हाताने सीटला गच्च पकडून बसला होता . अरे सुंदरलाल , काय चाललय काय ? कसली एव्हडी भिती वाटतेय तुला ? मी खाली मजेत होतो .
हो , पण तिथे ड्रायव्हर आहे , सुंदरलाल म्हणाला .

1 comment: