नातवंडे व आजी-आजोबा यांचे एक निराळेच नाते असते. बदलत्या सामाजिक परिस्थितीत हे नाते काहीसे हरवल्यासारखे वाटते. परंतु अजूनही, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबात आजी-आजोबांचे स्थान टिकून आहे.
आपल्या नातवंडानी केवळ अभ्यासतच नाही तर इतर क्षेत्रातही चमकावे अशी आजी-आजोबांची इच्छा असते व त्यादॄष्टीने ते प्रयत्नही करतात।
छोट्या नातवंडांच्या अंगातील गुणांचा सभासदाना परिचय व्हावा या दॄष्टीने ‘सोबती’ दरवर्षी सभासदांच्या ५ त १४ या वयोगटातील नातवंडांचे कार्यक्रम आयोजित करते। दिनांक २४ डिसेंबर रोजी असा एक कार्यक्रम साजरा झाला. त्यात अकरा नातवंडानी भाग घेतला. कार्यक्रमात श्लोक, कविता, गाणी, विनोद, नृत्य, तबला वादन, नाट्यछटा अशी विविधता होती. मुलांचा धीटपणा, वेषभूषा आणि उचित हावभाव पाहून सर्वानाच खूप कॊतुक वाटले. त्यांचे कॊतुक करून भेटवस्तू व खाऊ दिल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला।
Monday, February 02, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment