मरणोत्तर अवयव दानामुळे हे शक्य होणार आहे …
हेन्री मोलेसन याला लहानपणापासुनच फिट्स् येत असत. २८ वर्षाचा होइतो, याचा त्याला इतका त्रास होऊ लागला की त्यापासून सुटका मिळण्यासाठी, मेंदूची एक प्रायोगिक शस्त्रक्रिया करण्यास, त्याने अनुमती दिली. त्या शस्त्रक्रियेने, फिट्स्ची तिव्रता कमी झाली पण नवीन आठवणी जतन करण्याची क्रिया बंद झाली. त्याला गप्पा मारण्याची खूप आवड, पण १५ मिनिटांत तो त्याच त्याच गोष्टी परत परत सांगू लागला. आपण हे सांगितले आहे याचीच त्याला आठवण राहीना. पण यामुळेच ज्याच्यावर खूपच अभ्यास केला गेला असा तो रुग्ण ठरला. सुयोग व कमनशीब यांच्या संयोगामुळे, शास्त्रीय संशोधनातला मौल्यवान, उपयुक्त व उत्तम सहयोग देणारा असा तो दुवा ठरला.
कित्येक वर्षांपूर्वी, त्याने मरणोत्तर आपला मेंदू, संशोधनाकरिता दान करण्याचे ठरविले. गेल्या वर्षीं, सान् दियेगो येथील शल्यज्ञ प्राध्यापक जॅकोपो अनेस, मोलेसनचा मेंदू काढून सान् दियेगोला विमानाने परतले. मोलेसन, ८२ व्या वर्षी फुफ्फुसाच्या विकाराने मरण पावले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, अनेस व त्यांचे सहकारी यांनी मोलेसनच्या मेंदूचे काळजीपूर्वक विश्लेशण सुरू केले. मेंदूच्या २५०० भागांचे विश्लेशण होणार होते. कॉंप्युटरच्या सहाय्याने या प्रत्येक भागाचा होणारा अजस्र नकाशा हा Google च्या पृथ्वीच्या नकाशा सारखा असेल. यामुळे शास्त्रज्ञांना, आठवणीं कशा व कुठे तयार/जतन होतात व लागेल तेव्हा त्या कशा ’बाहेर’ काढल्या जातात याचें रहस्य उमजायला मदत होईल असा विश्वास आहे.
Wednesday, December 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment