Thursday, April 03, 2008

’सोबती’ ची ओळख

मित्रानो, ’सोबती’ ही विलेपार्ले मुंबई येथील एक खूप जुनी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. मी तिचा एक सभासद आहे. आमचे पुष्कळसे सभासद कॉम्प्यूटर, ब्लॉग वगैरे गोष्टींशी अजून तरी अपरिचित आहेत. मात्र अनेकाना साहित्याची, काव्याची, तसेच इतर अनेक विषयांची उत्तम जाण व लेखनक्षमताही आहे. त्यांचे वतीने मी हा ब्लॉग सुरू करीत आहे. यावरील लिखाण बरेचसे इतर सभासदांचे असेल, काही थोडे माझेहि असेल. तुम्हाला आवडले तर जरूर कळवा. आमची दर सप्ताहाला सभा असते त्यावेळी मी तुमच्या प्रतिक्रिया सभेला सांगेन.

6 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

नमस्कार काका :)
"अहो मला बहिणीकडे पोचवा" या शिर्षकानी इथे आणलं मला. आणि तुमच्या या उपक्रमाबद्दल माहीती झाली.
तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मी तरी हया ब्लॉगची खुण ठेवली आहे, नियमीत वाचत जाईन. शुभेच्छा

आणि हो एक सांगायच राहिलच मीही माहेरची फडणीसच

Jaswandi said...

वाह, खुपच मस्त उपक्रम आहे...
हा ब्लॉग वाचयला खुप आवडेल...

तुमच्या ’सोबती’ आणि ह्या ब्लॉगसाठी खुप खुप शुभेच्छा!!

xetropulsar said...

काका,

नमस्कार. आपला उपक्रम स्तुत्यच आहे. श्यामलीशी सहमत. स्वत:साठी परदेशात जाऊन रहायचे आणि आई वडिलांची काळजी करायची असाच प्रकार इथे रहाणाऱ्या लोकांचा चालू असतो. पार्ल्यात तुमची जेष्ठ नागरिकांची संघटना आहे हे वाचून बरं वाटलं. तुमच्या नजरेतून तुम्ही ह्या स्थलांतराकडे, देश सोडून जाण्याकडे कसे पहाता ते जाणून घ्यायची इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिकांचे स्वत:चे असे काय प्रश्न असतात, भावनिक गरजा काय आहेत, तुमची मते (भाषेच्या भवितव्याविषयीची सुद्धा :)) सगळं सगळं जाणून घ्यायला आवडेल

आणि हो तुम्ही कॉम्पुटर, इंटरनेट ज्या सहजतेने वापरता ते पाहून आपल्याबद्दल कौतुक वाटतेय.

अमित

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स वाचून मी केलेली खटपट सार्थकी लागली असे वाटले. ’सोबती’वर असाच लोभ ठेवा. धन्यवाद!

Anonymous said...

nicely introduced

sachin patil said...

आपली ‘सोबती - एक ज्येष्ठ नागरिक संघटना’ही साईट बघितली.छान वाटले.आपला सर्वांपर्यंत विचार पोहोचविण्याचा उपक्रम खुप चांगला आहे.हत्तीची दंत कथा(वास्तव)आवडली. प्राण्यांच्या भावनाही माणसाला कळु द्यात.
आपणास काही साईट संर्दभात अडचणी असल्यास आपण त्या जरुर कळवाव्यात.
प्रा.सचिन पाटील
प्राजक्ता पाटील