’सोबती’चे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. र. पां. कणेकर. यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. वयपरत्वे आता त्यांची सोबती कार्यक्रमाना उपस्थिति नियमित नसते. ’सोबती’चा ब्लॉग सुरू केल्याचे त्यांच्याशी बोललो व कविता मागितली. त्यानी तत्परतेने पाठवून दिलेली कविता वाचकांसमोर ठेवत आहे.
त्यांचा जयजयकार
(समूहगान)
जखडुन होतो तेव्हां लढले
भारतभूचे वीर
दास्यशृंखला तोडायाला
नाही झालि कसूर ॥ करूया त्यांचा जयजयकार ॥१॥
स्वातंत्र्यास्तव लढा पेटला
अर्पण केले प्राण
त्या वीरांच्या बलिदानाने
स्वातंत्र्याची जाण ॥ करूया ..... ॥२॥
शत्रूचे कधि आले घाले
लढले प्राणपणाने
शौर्याला कधि नव्हती सीमा
गाजे जय-हिंदने ॥ करूया ..... ॥३॥
भारतभूच्या शूर जवाना
आम्हाला अभिमान
आहुति सर्वस्वाची करुनी
राष्ट्रासाठी प्राण ॥ करूया ..... ॥४॥
मित्रत्वाचा आव आणुनी
अतिरेकी घुसवले
उत्तर देणे विश्वासघाता
संगिनिने साधले ॥ करूया ..... ॥५॥
गनिमी कावा रचिला रिपुने
व्यापियला भूभाग
मुक्त कराया अपुली सीमा
लढले हिन्द जवान ॥ करूया ..... ॥६॥
Sunday, April 20, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
राष्ट्रप्रेम जागृत करणारी कविता.
मुक्त कराया अपुली सीमा
लढले हिन्द जवान ॥ करूया ..... ॥६॥
व्वा काय अओळी आहे...सुदंर ...हं
राष्ट्र्प्रेम याला म्हणाव....!
कवितेत जोश आहे...!
सिमेवरच्या भारतीय जवांनांना आपला सँल्यूट...
oo=
Post a Comment