Thursday, April 29, 2010

आय़् ए एस् च्या परिक्षेत विचारलेल्या कांही प्रश्नांची उत्तरें

[ मूळ इंग्रजीत झालेल्या या परिक्षेत कांही वाक्ये, हेतू साधण्यासाठी भाषांतरीत केलेली नाहीत .]
प्रश्न : सिमेंटच्या फरशीवर न फोडता कच्चे अंडे कसे टाकाल ?
उत्तर : सिमेंटच्या फरशा फार कठीण असतात .

प्रश्न : जर आठ माणसांना एक भिंत बांधायला दहा तास लागले तर ती भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल ?
उत्तर : कांहीच वेळ लागणार नाही . ती आधीच बांधून झाली आहे .

प्रश्न : जर तुमच्या एका हातात तीन सफरचंदे व चार संत्री असतील आणि दुसर्‍या हातात चार सफरचंदे व तीन संत्री असतील तर तुमच्याकडे काय असेल ?
उत्तर : फार मोठे हात .

प्रश्न : How can you lift an elephant with one arm ?
उत्तर : प्रश्नच कुठे येतो ! एक हात असलेला हत्ती सापडणारच नाही .

प्रश्न : कोणीही आठ दिवस झोपेशिवाय कसा राहू शकेल ?
उत्तर : यांत काय अवघड ? तो रात्री झोपतो .

प्रश्न : जर तुम्ही लाल रंगाचा दगड निळ्या समुद्रांत फेकला तर काय होईल ?
उत्तर : अगदी सोप्पं आहे . तो भिजेल आणि बुडून समुद्राच्या तळाला जाईल .

प्रश्न : अर्ध्या सफरचंदासारखे दुसरे काय दिसते ?
उत्तर : त्याचा दुसरा अर्धा भाग .

प्रश्न : तुम्ही breakfast ला काय कधीच खाऊ शकणार नाही ?
उत्तर : Dinner [रात्रीचे जेवण] .

प्रश्न : चाकाचा शोध लागला तेव्हा काय झाले ?
उत्तर : It caused a revolution .

प्रश्न : Bay of Bengal is in which state ?
उत्तर : Liquid [द्रव स्थितीत ] .

आता थोडेसे मौखिक चांचणी बद्दल –interview .

प्रश्न : मी जर तुमच्या बहिणीबरोबर पळून गेलो तर तुम्ही काय कराल ?
उत्तर : माझ्या बहिणीकरिता तुमच्यापेक्षा सरस जोडीदार मिळवणे मला शक्यच होणार नाही , सर .

उमेदवाराकरिता परीक्षकाने कॉफी मागवली . कॉफी आली .
प्रश्न : व्हॉट इज बिफोर यू ?
उत्तर : टी .
[ इंग्रजी मुळाक्षरांत U च्या अगोदर T येतो ]

वरील उत्तरे देणार्‍या सर्वांची IAS , IFS वा IPS करिता निवड झाली होती .

3 comments:

विजयसिंह होलम said...

खूपच छान ब्लॉग आहे हा. यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. या वयात आपण सर्वजण जगाच्या नव्या साधनाचा वापर करून आम्हा तरुणांना लाजविणारे काम करीत आहात. आपल्या कामास आणि दिर्घयुशास शुभेछा. माझाही एक ब्लॉग आहे. (http://policenama.blogspot.com) आवडला तर पहा. प्रबोधनाचे काम करीत आहे.

Narendra prabhu said...

खुप छान प्रश्नोत्तरं आहेत, धन्यवाद.

VishWaaS- KoYoTe said...

Sir, IAS sathi prepare karane majhe swapna aahe.. ase prashna kharach vicharale jaatat ka?