हिन्दू समाज हा भारताबाहेरही खूप देशांत विस्तारित आहे व त्याची सौंदर्य , कलापूर्ण आणि आर्य स्थापत्य शास्त्रावर आधारलेली देवळे तेथे दिसून येतात । पहा कांहींच्या स्थिर-प्रतिमा - -
( भाग पहिला )
वेंकटेश्वर देवालय , बर्मिंगहॅम , इंग्लंड
मॅलिबू हिन्दू देवालय – मॅलिबू , कॅलिफोर्निया , अमेरिका
शिव विष्णू देवालय – लिव्हरमोर , अमेरिका
विष्णू देवालय – अंगकॉर , कंबोडिया
प्रंबनन शिव देवालय – मध्य जावा , इंडोनेशिया
वेंकटेश्वर स्वामी देवालय – ऑरोरा , इलिनॉय , अमेरिका
स्वामीनारायण देवालय – टोरॊंटो , कॅनडा
शिव विष्णू देवालय – वॉशिंग्टन डी. सी. , अमेरिका
स्वामीनारायण देवालय – नियॅस्डेन , लंडन
मुरुगन देवालय – बाटु गुहा , पेनांग , मलेशिया
वेंकटेश्वर देवालय – ब्रिजटाउन , न्यू जर्सी , अमेरिका
मात्रुमंदिर – बाली , इंडोनेशिया
मुरुगन देवालय – सिडनी , ऑस्ट्रेलिया
Monday, February 22, 2010
भारताबाहेरील हिन्दू देवालये …2
वेंकटेश्वर स्वामी देवालय – रिव्हरडेल , अमेरिका
वेंकटेश्वर स्वामी देवालय – हेलन्सबर्ग , ऑस्ट्रेलिया
वेलमुरुगन ज्ञान मुनीश्वरार देवालय – रिव्हरवेल क्रिसेंट , सिंगापोर
मिनाक्षी देवस्थानम् – पेअरलॅंड , टेक्सास , अमेरिका
एकता मंदिर – आयर्विंग , टेक्सास , अमेरिका
वेंकटेश्वर देवालय – न्यू जर्सी , अमेरिका
लक्ष्मी देवालय – मॅसॅच्युसेट्स , अमेरिका
वेंकटेश्वर स्वामी देवालय – पिट्सबर्ग , अमेरिका
शिव विष्णू देवालय – दक्षिण फ्लॉरिडा , अमेरिका
शिव विष्णू देवालय – मेलबोर्न , ऑस्ट्रेलिया
मुरुगन देवालय – लंडन
क्वाद सिटी हिन्दू देवालय – रॉक आयलंड , अमेरिका
प्रसन्न वेंकटेश्वर स्वामी देवालय – मेंफिस्
श्रीनिवास पेरुमल देवालय – सिंगापोर

Sunday, February 21, 2010
श्री. बाळ सितूत
सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व भूतपूर्व कार्यवाह श्री. बाळ सितूत वृत्तपत्रात विविध विषयांचे पत्रलेखक म्हणून परिचित आहेत. परंतु पत्रलेखन याशिवाय त्यांची अधिक ओळख म्हणजे एक कथालेखक व मसाज व योग यावर त्यानी लिहीलेली पुस्तके.
अनेक वर्तमानपत्रातून/मासिकांतून त्यानी समाजकारण/राजकारण या विषयांवर लेखन केले आहे व अजूनही करीत आहेत. त्यांच्या या पत्रलेखनाला अनेक पुरस्कार लाभले आहेत. अशा निवडक पत्रांचा संग्रह ‘सामान्यांच्या (अ)सामान्य व्यथा’ पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे.
श्री सितूत एक चांगले कथालेखकही आहेत. अनेक मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘थॅंक यू डॉ. लाड’ आणि ‘डबल रोल’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
विविध विषयांवर लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य. सुप्रसिद्ध मसाजिस्ट श्री उदय निमकर यांच्या सहाय्याने त्यानी ‘संवाहन शास्त्र’ हे मसाज वरील पुस्तक लिहीले आहे. विशेष म्हणजे ‘कला विद्या संकुल’ या संस्थेने हे पाठ्यपुस्तक म्हणून लावले आहे.
सेवानिवृत्तिनंतर त्यानी योगासने करण्यास सुरुवात केली व त्याचा त्याना चांगला उपयोग झाला. योग विद्या निकेतन या संस्थेचा त्यानी योग शिक्षकाचा कोर्स पुरा केला. नंतर ते लोकमान्य सेवा संघ, स्वा. सावरकर केंद्र व उत्कर्ष मंडळ येथे योगासनांचे अनेक वर्षे क्लास घेत असत. एअर इंडियातातील नोकरीनिमित्त ते दुबई, मस्कत, अमेरिका येथे जात व तेथेही त्यानी योगासनाचे वर्ग घेतले आहेत. योगासनानी फायदा झाल्याचे त्याना अनेकानी सांगितले आहे. लोकाना योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यानी ‘आजार नित्याचे, उपचार योगाचे’ हे पुस्तकही लिहीले आहे.
श्री. सितूत याचे वय ८४ असून अजूनही त्यांचे लेखन कार्य चालू आहे.

(कै.) शुभा सितूत
ज्येष्ठ सभासद श्री. बाळ सितूत यांच्या दिवंगत पत्नी शुभा सितूत याही सोबतीच्या सभासद होत्या. त्या एक उत्तम शिक्षिका व कथालेखिकाही होत्या. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे कॅन्सरने दुःखद निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यानी मरणोत्तर देहदान केले होते.
पति श्री. बाळ सितूत यांच्याप्रमाणे त्यानाही लेखनाची आवड होती. त्यांच्या अनेक कथा मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. विरार येथ रहात असताना त्यानी बालवाडीही चालविली होती. त्यामुळे मुलांसाठी शिशुगीते लिहीली व ‘इंद्रधनुष्य’ या नावाचा शिशुगीत संग्रह श्री. बाळ सितूत यानी शुभाताईंच्या निधनानंतर प्रसिद्ध केला.
त्यांच्या निधनानंतर श्री. बाळ सितूत यानी त्यांच्या कथा ‘ ऋणानुबंध ’ या संग्रहात प्रसिद्ध केल्या. विशेष म्हणजे कै. शुभा याना ‘ अक्षर गौरव पुरस्कार-२००९ ’ मरणोत्तर प्रदान करून गौरविण्यात आले.
त्यांच्या स्मृतीला सोबतीतर्फे अभिवादन.

Thursday, February 18, 2010
Monday, February 15, 2010
स्टॅलॅक्टाइट्स् – स्टॅलॅग्माइट्स् च्या गुहा
Tuesday, February 09, 2010
नऊ उत्तम रेल्वे प्रवास - पहिला भाग
रेल्वेच्या प्रवासांत जाणारा वेळ हा वाया जाणारा वेळ समजला जातो . पण कांही रेल प्रवास मात्र अपवाद समजले पाहिजेत . याचे कारण त्या प्रवासांतील सोय , आराम , चैन आणि न्याहाळायला मिळणारे अलौकिक निसर्ग सौंदर्य .
[१] हिमनदी एक्सप्रेस
अतिशय संथ गतीचा ,आठ तासांत एकशे ऐंशी मैलांचा हा प्रवास . स्वीस आल्प्स मधील दोन हिम पर्वतांच्यामधे असणार्या ,सेंट मॉरित्ज़ आणि झेर्मॅट् या पर्यटण निवासांच्या मधील प्रवासांत , मनोहारी निसर्ग दृष्यांची लयलूट आहे . २९१ पूल , ९१ बोगदे , आणि ६६७० फूट उंचीवरील हा प्रवास , एखाद्या परी-राज्याची सहल घडवतो .

[२] व्हेनिस – सिंप्लॉन ओरियेंट एक्सप्रेस
लंडन – व्हेनिस – बुडापेस्ट व प्राग मार्गे होणारा हा प्रवास भुरळ पाडणारा आहे .उत्तमोत्तम सिनेमा , कादंबर्या आणि हॉलिवुडमधील प्रणयप्रसंग याच ऐषारामी प्रवासांत टिपले गेले . फ्रांस – स्वित्झर्लंड – ऑस्ट्रियाच्या ग्रामीण प्रदेशांतून होणारा हा तीन दिवसांचा प्रवास मात्र खिसे चांगलेच जड असणार्यानाच परवडतो . भव्य गतकाळाचा अनुभव देणार्या
या प्रवासाकरिता २००० युरो मोजावे लागतात .

[३] प्राइड ऑफ आफ्रिका
ज्यांना काळ्या खंडाचे (आफ्रिका ) सौंदर्य , राजेशाही थाट व भव्यता पहायची असेल अशा निसर्गप्रेमींनी हा प्रवास चुकवू नयेच . वर्षाकाठी एकदा आयोजित होणारा हा प्रवास , निर्दोष आरामात , १४ दिवसांत केप्टाऊन ते दार् ए सलाम असा आहे . मार्गक्रमणा किंबर्ली – प्रिटोरिया – कृगर नॅशनल पार्क – बाइत् ब्रिज – बुलावायो – व्हिक्टोरिया फॉल्स् – लुसाका – टांझानिया मार्गे होते . हा प्रवास अत्यंत आरामदायी आहे .

[४] युरोस्टार
लंडन – पॅरिस दरम्यानचा हा प्रवास छान आराम व अव्वल दर्जाचा , पण बराचसा पाण्याखालून होतो .अतिशय कमी वेळाचा हा प्रवास , विमान प्रवासापेक्षा , प्रवाशांना जास्त आकर्शक वाटतो .
[५] नाविन्यपूर्ण फ्लॅम रेल्वे
नॉर्वेमधील त्या आ वासायला लावणार्या फिओर्ड्स् (Fjords) आठवा .सर्वांत लांब Sogne fjord या २० कि. मि. लांब असलेल्या फिओर्ड् मधून जाणाराही एक रेल प्रवास आहे . हा ३००० फुटांवरून फ्लॅम् फिओर्ड् पर्यंत जातो . प्रवास अत्यंत लक्षवेधक व अंगावर काटा उभा करणारा आहे . प्रवास अरूंद कपारीतून व कधीच विसर न पडणार्या व डोळ्यांची पारणे फिटणारी दृष्ये पहात पहात पार पडतो .येथील निसर्ग निष्कलंक व शुद्ध (unpolluted) आहे .

Subscribe to:
Posts (Atom)