Tuesday, February 02, 2010

व्यवसाय आणि PRACTICE

{ सोबतीचे ज्येष्ठ सभासद श्री. प्रभाकर भिडे यांची निर्मिती }
५० वर्षांपूर्वी डॉक्टर आणि वकील व्यक्तीना समाजात मान मिळत होता . सामान्य माणसांच्या नोकरी धंद्याची विचारपूस कोणी करीत नसे . पण वरील व्यवसायांतील व्यक्तींना – हल्ली प्रॅक्टीस कशी चालली आहे ? अशी चौकशी होई . असे का विचारीत ते तेव्हा मला कळत नव्हते . पण शब्दांच्या शोधांत त्याचा उलगडा झाला .
PRACTICE = ACT + PRICE = ACT and PRICE
फी घेतल्यावरच कार्य पार पाडणारा .
परंतु या दोन्ही व्यवसायांत माणुसकीने वागणार्‍याही कांही व्यक्ती असतातच . त्यांचाही शाब्दिक शोध घ्यावयास हवा . हे दोन्ही व्यवसाय करणार्‍या व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करीत . त्यामुळे त्यांच्या व्यवसायांना समाजात मान होता . तो का हे आपण शब्दातूनच पाहू .
व्यवसाय = वसा + व्यय
म्हणजे आपल्या ज्ञानाचा व्यय समाजाच्या भल्याकरिता करण्याचा वसा ज्यांनी घेतला आहे ते - तेव्हा मान मिळणे साहजिकच .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक म्हण
इंग्रजीत एक म्हण आहे , “ Well begun is half done .” हिन्दीमध्ये सुद्धा “ कल का काम आज कर और आज का अब “
असे सांगितले जाते . चांगल्या कार्याला उशीर लावू नये या अर्थी संस्कृतमध्ये “ शुभस्य शिघ्रम्‍ “ असे म्हटले जाते . त्याच प्रमाणे असेही म्हणता येईल की ( NOW शब्द उलटा करून ) “ If you begin NOW , you have WON half the battle .

No comments: