Sunday, February 21, 2010

(कै.) शुभा सितूत

ज्येष्ठ सभासद श्री. बाळ सितूत यांच्या दिवंगत पत्नी शुभा सितूत याही सोबतीच्या सभासद होत्या. त्या एक उत्तम शिक्षिका व कथालेखिकाही होत्या. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे कॅन्सरने दुःखद निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यानी मरणोत्तर देहदान केले होते.

पति श्री. बाळ सितूत यांच्याप्रमाणे त्यानाही लेखनाची आवड होती. त्यांच्या अनेक कथा मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. विरार येथ रहात असताना त्यानी बालवाडीही चालविली होती. त्यामुळे मुलांसाठी शिशुगीते लिहीली व ‘इंद्रधनुष्य’ या नावाचा शिशुगीत संग्रह श्री. बाळ सितूत यानी शुभाताईंच्या निधनानंतर प्रसिद्ध केला.

त्यांच्या निधनानंतर श्री. बाळ सितूत यानी त्यांच्या कथा ‘ ऋणानुबंध ’ या संग्रहात प्रसिद्ध केल्या. विशेष म्हणजे कै. शुभा याना ‘ अक्षर गौरव पुरस्कार-२००९ ’ मरणोत्तर प्रदान करून गौरविण्यात आले.

त्यांच्या स्मृतीला सोबतीतर्फे अभिवादन.

No comments: