[१] हिमनदी एक्सप्रेस
अतिशय संथ गतीचा ,आठ तासांत एकशे ऐंशी मैलांचा हा प्रवास . स्वीस आल्प्स मधील दोन हिम पर्वतांच्यामधे असणार्या ,सेंट मॉरित्ज़ आणि झेर्मॅट् या पर्यटण निवासांच्या मधील प्रवासांत , मनोहारी निसर्ग दृष्यांची लयलूट आहे . २९१ पूल , ९१ बोगदे , आणि ६६७० फूट उंचीवरील हा प्रवास , एखाद्या परी-राज्याची सहल घडवतो .
[२] व्हेनिस – सिंप्लॉन ओरियेंट एक्सप्रेस
लंडन – व्हेनिस – बुडापेस्ट व प्राग मार्गे होणारा हा प्रवास भुरळ पाडणारा आहे .उत्तमोत्तम सिनेमा , कादंबर्या आणि हॉलिवुडमधील प्रणयप्रसंग याच ऐषारामी प्रवासांत टिपले गेले . फ्रांस – स्वित्झर्लंड – ऑस्ट्रियाच्या ग्रामीण प्रदेशांतून होणारा हा तीन दिवसांचा प्रवास मात्र खिसे चांगलेच जड असणार्यानाच परवडतो . भव्य गतकाळाचा अनुभव देणार्या
या प्रवासाकरिता २००० युरो मोजावे लागतात .

[३] प्राइड ऑफ आफ्रिका
ज्यांना काळ्या खंडाचे (आफ्रिका ) सौंदर्य , राजेशाही थाट व भव्यता पहायची असेल अशा निसर्गप्रेमींनी हा प्रवास चुकवू नयेच . वर्षाकाठी एकदा आयोजित होणारा हा प्रवास , निर्दोष आरामात , १४ दिवसांत केप्टाऊन ते दार् ए सलाम असा आहे . मार्गक्रमणा किंबर्ली – प्रिटोरिया – कृगर नॅशनल पार्क – बाइत् ब्रिज – बुलावायो – व्हिक्टोरिया फॉल्स् – लुसाका – टांझानिया मार्गे होते . हा प्रवास अत्यंत आरामदायी आहे .

[४] युरोस्टार
लंडन – पॅरिस दरम्यानचा हा प्रवास छान आराम व अव्वल दर्जाचा , पण बराचसा पाण्याखालून होतो .अतिशय कमी वेळाचा हा प्रवास , विमान प्रवासापेक्षा , प्रवाशांना जास्त आकर्शक वाटतो .
[५] नाविन्यपूर्ण फ्लॅम रेल्वे
नॉर्वेमधील त्या आ वासायला लावणार्या फिओर्ड्स् (Fjords) आठवा .सर्वांत लांब Sogne fjord या २० कि. मि. लांब असलेल्या फिओर्ड् मधून जाणाराही एक रेल प्रवास आहे . हा ३००० फुटांवरून फ्लॅम् फिओर्ड् पर्यंत जातो . प्रवास अत्यंत लक्षवेधक व अंगावर काटा उभा करणारा आहे . प्रवास अरूंद कपारीतून व कधीच विसर न पडणार्या व डोळ्यांची पारणे फिटणारी दृष्ये पहात पहात पार पडतो .येथील निसर्ग निष्कलंक व शुद्ध (unpolluted) आहे .

1 comment:
veryyyyyyyyyyyyyyyy excellent photographsssssssssssss
Post a Comment