Sunday, February 21, 2010

श्री. बाळ सितूत

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व भूतपूर्व कार्यवाह श्री. बाळ सितूत वृत्तपत्रात विविध विषयांचे पत्रलेखक म्हणून परिचित आहेत. परंतु पत्रलेखन याशिवाय त्यांची अधिक ओळख म्हणजे एक कथालेखक व मसाज व योग यावर त्यानी लिहीलेली पुस्तके.

अनेक वर्तमानपत्रातून/मासिकांतून त्यानी समाजकारण/राजकारण या विषयांवर लेखन केले आहे व अजूनही करीत आहेत. त्यांच्या या पत्रलेखनाला अनेक पुरस्कार लाभले आहेत. अशा निवडक पत्रांचा संग्रह ‘सामान्यांच्या (अ)सामान्य व्यथा’ पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे.

श्री सितूत एक चांगले कथालेखकही आहेत. अनेक मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘थॅंक यू डॉ. लाड’ आणि ‘डबल रोल’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

विविध विषयांवर लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य. सुप्रसिद्ध मसाजिस्ट श्री उदय निमकर यांच्या सहाय्याने त्यानी ‘संवाहन शास्त्र’ हे मसाज वरील पुस्तक लिहीले आहे. विशेष म्हणजे ‘कला विद्या संकुल’ या संस्थेने हे पाठ्यपुस्तक म्हणून लावले आहे.

सेवानिवृत्तिनंतर त्यानी योगासने करण्यास सुरुवात केली व त्याचा त्याना चांगला उपयोग झाला. योग विद्या निकेतन या संस्थेचा त्यानी योग शिक्षकाचा कोर्स पुरा केला. नंतर ते लोकमान्य सेवा संघ, स्वा. सावरकर केंद्र व उत्कर्ष मंडळ येथे योगासनांचे अनेक वर्षे क्लास घेत असत. एअर इंडियातातील नोकरीनिमित्त ते दुबई, मस्कत, अमेरिका येथे जात व तेथेही त्यानी योगासनाचे वर्ग घेतले आहेत. योगासनानी फायदा झाल्याचे त्याना अनेकानी सांगितले आहे. लोकाना योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यानी ‘आजार नित्याचे, उपचार योगाचे’ हे पुस्तकही लिहीले आहे.

श्री. सितूत याचे वय ८४ असून अजूनही त्यांचे लेखन कार्य चालू आहे.

No comments: