Monday, February 08, 2010

सोबती - ज्येष्ठ नागरिक संघटना


सोबतीचा ब्लॉग आतापर्यंत जगातल्या अनेक देशांतील जवळ जवळ हजार लोकानी वाचला आहे आणि अधिकाधिक लोक वाचत आहेत. ‘सोबती‘ विले पार्ले, मुंबई येथे गेली तीस वर्षे कार्यरत असलेली ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे व संस्था धर्मादाय आयुक्त व सहकार आयुक्त यांच्या कार्यालयांकडे रजिस्टर्ड आहे.

सोबतीचे कार्य व उपक्रम यांचे थोडक्यात वर्णन सोबतीच्या एक ज्येष्ठ सभासद श्रीमती विद्या पेठे यानी त्यांच्या खालील कवितेत केले आहे.

आम्ही सोबती, स्वप्न आमुचे आनंदे जगण्याचे

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते आचरण्याचे
आम्ही सोबती स्वप्न आमुचे आनंदे जगण्याचे,
हो, हो आनंदे जगण्याचे ॥


दर बुधवारी नेम आमुचा सोबती सारे जमतो.
कधी भाषण तर कधी संभाषण, नाट्य, गायनी रमतो
आनंदाला निमित्त पुरते, वर्षा सहलीचे ॥

कोजागरी अन होळी रंगता, वार्धक्या विसरतो
खेळामध्ये रमून जाता बाल्यहि अनुभवतो
वर्धापनदिनी लाभे जनांना भाग्यहि सत्काराचे ॥

समाज ऋणही मान्य आम्हाला, हात पुढे मदतीचा
इथे न थांबे प्रवास अमुचा, मार्ग दिसे प्रगतीचा
संघटीत होऊन मिरवितो निशाण मानवतेचे ॥

मैत्र जिवांचे सदैव राहो हीच सदिच्छा मनी
हात हाती घेउन करुया, वाटचाल जीवनी,
निरामय जीवन लाभो हेच मागणे अमुचे ॥

आम्ही सोबती, स्वप्न आमुचे आनंदे जगण्याचे ॥ ॥

No comments: