Sunday, March 28, 2010

आनंद मेळावा सहल

ही सहल होते की नाही असे वाटत होते. सुरुवातीला दोन दिवसांच्या सहलीसाठी सुचविलेल्या ठिकाणाला सभासदांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र काही सभासदानी हा अनेक वर्षांपासून चालत आलेला उपक्रम बंद करु नये असे मत
आग्रहाने प्रकट केले. नंतर अनेक सभासदानी एक दिवसाच्या सहलीसाठी उत्साह दाखविला आणि दि.२५ फ़ेब्रुवारी रोजी ३६ ज्येष्ठ नागरिक सहलीत सामील झाले. विशेष म्हणजे त्यापैकी २० महिला होत्या.

सहलीचे ठिकाण होते परमार रिसॉर्ट, वज्रेश्वरी रोड. तेथे बसने ९ वाजता पोहोचलो. लगेच सर्वजण रुचकर नाश्त्यावर तुटून पडले. नंतर काही जण फेरफटका मारायला गेले, काहीनी पर्जन्यनृत्याचा (rain dance) चा आनंद घेतला तर काहीनी पोहोण्याचा. नंतर गुजराथी पद्धतीच्या चवदार भोजनावर सर्वनी यथेच्छ ताव मारला.

थोडा वेळ विश्रांती व गप्पाटप्पा झाल्यावर सर्वजण एका मोठ्या उंबराच्या झाडाखाली जमले. मोठ्या रुंद पारावर काही खाटा व खुर्च्या टाकल्या. मग खेळ रंगले. गाणी, कविता, चुटके यानी कार्यक्रम सजला. निसर्गाच्या सान्निध्यात, थंड वाहणारा वारा यामुळे उन्हाळा जाणवला नाही. चहापान झाल्यानंतर काहीजण परत एकदा लहान मुलांच्या उत्सुकतेने बैलगाडीतून आणि उंटाच्या गाडीतून फेरफटका मारून आले.

संध्याकाळी ६.४५ वाजता बस परतीच्या प्रवासाला लागली. मग सुरु झाली अंताक्षरी. नवी जुनी हिंदी-मराठी गाणी, श्लोक, आरत्या, अभंग इ. जेव्हढ म्हणून येत होत तेव्हढ म्हणून झाल. यात वेळ इतका मजेत गेला की बस कधी विले पार्ल्याला आली ते कळलेच नाही.

असा हा सहलीचा दिवस ज्येष्ठ नागरिकांना ताजातवाना करुन गेला.

Tuesday, March 23, 2010

अमुल्य पाणी – पाणी म्हणजेच जीवन – जपून वापर करा

मानवासह जमिनीवरील सर्व सजीवांना मिळून , पृथ्वीवरील असलेल्या एकूण पाण्यापैकी , अवघे १% पाणी उपलब्ध आहे . अर्थात , योग्य पद्धतीने वापरले तर एवढेसे पाणीही आपल्याला पुरून उरेल इतके आहे .
कपडे धुणे , भांडी घासणे , स्वयंपाक करणे , पीण्याकरिता व स्वच्छतेकरिता लागणारे पाणी हीच आपली पाण्याची गरज असे आपण समजतो . ही झाली प्रत्यक्ष गरज . पण , दैनंदिन व्यवहारात लागणारी प्रत्येक गोष्ट तयार होण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागते . ही आहे अप्रत्यक्ष गरज .
ही गरज किती मोठी आहे ते पहा –
१ लिटर दूध : १००० लिटर , १ कप चहा : ३० लिटर , १ कप कॉफी : १४० लिटर ,
१ कि. ग्रॅ. तांदूळ : ३४०० लिटर , १ कि. ग्रॅ. गहू : १३०० लिटर , १ कि. ग्रॅ. मका : ९०० लिटर ,
१ सफरचंद : ७० लिटर , १ कि. ग्रॅ. चीज : ५००० लिटर , १ पावाची स्लाईस : ४० लिटर ,
१ कि. ग्रॅ. चिकन : ३९०० लिटर , १ कि. ग्रॅ. बकरीचे मांस : ४००० लिटर ,
१ कि. ग्रॅ. डुकराचे मांस : ४८०० लिटर , १ कि. ग्रॅ. मेंढीचे मांस : ६१०० लिटर ,
१ कि. ग्रॅ. गायीचे मांस : १५५०० लिटर , १ कि. ग्रॅ. कापूस : ११००० लिटर ,
१ टी. शर्ट : २७०० लिटर , १ ए-४ कागद : १० लिटर .
लक्षात ठेवा – पाणी : वस्तू आहे गरजेची ; नव्हे चैनीची !
पाणी वाचवा – अर्थातच आपली जीवनशैली तपासून आणि सुधारून !

(सौजन्य – गतिमान संतूलन >> आंदोलन शाश्‍वत विकासासाठी – साभार )

शब्दांचा खेळ

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळीपगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.पंतांना परमेश्वरच पावला!पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळेप्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले. पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले. पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या. पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

Tuesday, March 16, 2010

फक्त नेत्रसुखासाठी

फ्राय बांगडा थाळी



चिंबोरी (Crab) करी थाळी


बांगडा (Mackarel) फ्राय




प्रॉन थाळी







जंबो प्रॉन्स् व सुरमय मासे






ग्रेव्ही सह पापलेट







पापलेट करीची तयारी








सुरमय मासा










तळलेले पापलेट (Pomfret)









चिकन करी











सुरमय फ्राय












सवतळलेली कोळंबी (Prowns)













तळलेली सुरमय (King fish)














देवाजीने केली रंगांची उधळण