’सोबती’ ही विले-पार्ले, मुंबई येथील ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे. बहुतेक सभासदांचा संगणक, ब्लॉग वगैरे गोष्टींशी फारसा परिचय नाही. त्यांचे वतीने श्री. प्र. के. फडणीस यांनी हा ब्लॉग सुरू केला.’सोबती’ने हा ब्लॉग चालवण्याचे काम दि.०१/०१/२००९ पासून स्वत: स्वीकारले आहे. कार्यकारी मंडळाचे वतीने श्री. विश्वास डोंगरे हे काम पाहत आहेत. त्याना आवश्यक ती मदत श्री. फडणीस करतात. श्री. चंद्रकांत पतके यांचाही आता ब्लॉगलेखकांत समावेश झाला आहे. सोबती सभासदांचे लेख, कविता येथे वाचावयास मिळतील. सोबतीच्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती वेळोवेळीं दिली जाईल. आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर नोंदवा. त्या ’सोबती’ सभासदांना वेळोवेळी कळवल्या जातील
सोबतीचे पदाधिकारी
अध्य्क्ष : श्री. मुकुंद पेठे
उपाध्यक्ष : श्री. सुरेश निमकर
कार्य़ाध्य्क्ष : श्री. विश्वास डोंगरे कोषाध्यक्ष : श्रीमती वैजयंती साठे
कार्यवाह : श्री. विजय पंतवैद्य कार्यवाह : श्रीमती शीला निमकर
सोबतीचें समाजकार्य व निधि
’सोबती’ प्रत्यक्ष समाजकार्य करत नाही. मात्र सोबतीने सभासदांकडून व इतरांकडून देणग्या मिळवून खालील निधि सुरू केले. वेळोवेळी संस्थेच्या वार्षिक उत्पन्नातून त्यांत भरहि घातली. निधींच्या गुंतवणुकींवर मिळणार्या व्याजाचा उपयोग निधींच्या उद्दिष्टांप्रमाणे समाजकार्यासाठी केला जातो.
२.समाजकल्याण व विकास निधि : समाजकार्य करणार्या लहानमोठ्या संस्थाना आर्थिक सहाय्य.
३. ज्येष्ठ नागरिक सेवा-सुविधा निधि : गरजू ज्येष्ठ नागरिकांस वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत.
’सोबती’च्या वार्षिक अहवालांमध्ये याबद्दल विस्तृत माहिती दिली जाते.
वाचकांस या उपक्रमांना आर्थिक सहाय्य करावयाचे असल्यास pkphadnis@yahoo.com वर संपर्क साधावा. देणग्यांवर प्राप्तिकर सवलत मिळते.
वाचणारांचे स्वागत
किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. खाली जगाच्या नकाशात वाचणारांचे स्थानहि पहावयास मिळेल. सोबती जगभर वाचला जातो आहे आणि त्यांत अनेक तरुण पण असतात याचा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना आनंद आहे. आपल्या प्रतिक्रियाही देण्यास विसरू नका.
1 comment:
A very nicely designed Blog
What is basic Web site
Post a Comment