Thursday, March 11, 2010

वसंतऋतूची चाहूल

मी सध्या अमेरिकेत सान फ्रान्सिस्को जवळ आहे. येथे थंडी असली तरी बर्फ पडत नाही. उलट हा हिंवाळी पावसाचा प्रदेश आहे, त्यामुळे थंडीच्या तीन-चार महिन्यांत वरचेवर पाऊस पडतो. क्वचित गाराहि पडतात.
आता हिंवाळा संपत आला आहे व वसंताची चाहूल जाणवते आहे. दोन महिन्यांपूर्वी येथे आलो तेव्हां बहुतेक सर्व झाडांची पाने पूर्णपणे गळून नुसते काठ्यांचे सांगाडे दिसत होते. लोकांनी स्वत:च्या गुलाब व इतर फुलझाडांची छाटणीहि केलेली होती. गेल्या २-३ आठवड्यांपासून उन असेल तेव्हा पायी फिरायला गेले असतां सर्वत्र बदल जाणवू लागला आहे. झोपीं गेलेली झाडे थंडीची दुलई दूर सारून वसंताचे स्वागत करताहेत. छाटलेल्या गुलाबांना नवीन पालवी, कोठेकोठे कळेहि फुटले आहेत. नवीन कोवळी पालवी सर्वत्र दिसते. फुलें घरोघरीं डोकावताहेत. हे बदलणारे निसर्गसौंदर्य भुलवणारे आहे. काल फिरायला गेलो असतां जवळ कॅमेरा होता. भराभर फोटो काढले ते तुम्हाला पहायला ठेवतो आहे.























5 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

वसंत ऋतुचा बहर पहायला फडणीसांच्या घरावरून चक्कर मारल्यासारखे वाटले.फोटो व त्यावरील शेरे छानच आहेत-कृष्णकुमार

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद

सुरेश पेठे said...

हा लेख विशेषत: नयन रम्य फोटॊ आविष्काराने भावला.

लेखाच्या लेखकाचे (मूळ )नाव स्वतंत्र पणे हवे

मी सध्या मुंबईत आहे पण लवकरच पुण्यास जात आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचाही असा एखादा ब्लॉग करावा अशी स्फूर्ती आपणाकडून घेऊन जात आहे.

त्यासाठी आपल्या सोबतीला मनापासून धन्यवाद !

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

श्री. पेठे यांस धन्यवाद. लेखाखाली माझे नाव आहेच. आपण आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा ब्लॉग सुरु करत आहात हे वाचून फारच आनंद झाला. आम्हाला कळवा.
प्र. के. फडणीस

मी said...

वसंतापेक्षा वसंतचाहूलच आन्ंददायी अस्ते हे आयोवातल्या थंडीत शिकलो .. आपण टाकलेले स्नॅप छान आहेत