Sunday, March 14, 2010

पोस्टाच्या पेट्या

अमेरिकेत तुमचीं पत्रे टाकण्यासाठी पेट्या लावून ठेवावयाच्या असतात. स्वतंत्र घर असेल तर रस्त्याच्या कडेला तुमची पेटी हवी. या पेट्या ठराविक आकाराच्या असतात. मात्र घरमालक स्वत:च्या हौसेने सजावट करुं शकतो. आमच्या घराच्या आजूबाजूला सर्व स्वतंत्र घरे आहेत. अनेक प्रकारच्या पोस्टाच्या पेट्या पहावयाला मिळतात. फिरायला गेलो असताना सहज म्हणून मी निरनिराळ्या डिझाईनच्या पेट्यांचे फोटो घेतले. त्यांत एक फोटो एका चर्चच्या पेटीचाहि आहे. सहज ओळखेल. काही पेट्या अगदीं साध्या तर काही सुरेख बांधून काढलेल्या. पेटीच्या खांबावर बहुधा घर नंबर पण लिहलेला असतो. दोन शेजारी मिळून एका खांबावर दोन पेट्या गुण्यागोविंदाने नांदताहेत असाही एक प्रकार दिसेल.










आणि या बंदिस्त.




4 comments:

सुरेश पेठे said...

हा चित्रमय लेख मला आवडला.अश्या गोष्टीं मुळे तेथील संस्कृती पण कळते व नकळत तुलना ही होते.

धोंडोपंत said...

नमस्कार प्रभाकरपंत,

’सोबती’ च्या सर्व पदाधिकार्‍यांना आणि सभासदांना आमच्यातर्फे नवसंवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

mannab said...

There is one unique feature of these boxes which you didn't mention here. These letter boxes are not locked like the boxes here in India. They are open so that postman or postwoman can drop your letters, magazines etc. And no one touches them in your absence even.
Mangesh Nabar

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

पेट्याना कुलपे नसतात हे बरोबर आहे. आपल्याला आलेली पत्रे पोस्टमन पेटीत टाकतो. आपल्याला पाठवायची पत्रे पेटीत ठेवून दिली तर तीं तो घेऊन जातो. पोस्ट खात्याच्या वेगळ्या आपल्यासारख्या पेट्या नसतात!