Tuesday, March 23, 2010

शब्दांचा खेळ

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळीपगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.पंतांना परमेश्वरच पावला!पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळेप्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले. पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले. पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या. पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

3 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

patke pa pawalaa

शंतनु said...

हे लिखाण मुळचे माझे आहे. "प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास" ह्या पुस्तकापासून प्रेरित होऊन डिसेंबर १९९७ मधे तयार करण्यात आले. त्यानंतर ते मार्च १९९८ च्या "Young Expressions" ह्या चौमासिकात छापून आणण्यात आले. जुलै १३, २००८ रोजी ब्लॉगवर प्रकाशित केले. पण ब्लॉगवरचे वाङ्मय-चौर्य लक्षात आल्यावर तो ब्लॉग फक्त निमंत्रितांसाठीच उघडा ठेवण्यात आला आहे. आता पर्यंत कितीतरी ठिकाणी हे मला चोरलेले आढळले. तरी माझी आपणास आणि इतर वाचकांस विनंती आहे की केवळ हाच लेख नव्हे तर इतर कुणाचाही कोणताही साहित्य-प्रकार पूर्व-परवानगीशिवाय नक्कल-चिकट करू नका.

रोहित दिलीप होळकर said...

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज..." he mulat Shantanu Bhat yanchya blog varun ghetale ahe. Mul lekhakacha ullekh karane ni tyala shrey dene garajeche ahe!

http://shantanubhat.blogspot.com.au/2008/07/blog-post.html