सरतेशेवटी…
जर्मन पॅस्टर मार्टिन निमोलरच्या कवितेचा स्वैर अनुवाद
जेव्हा ते कृष्णवर्णियांकरिता आले,
तेव्हा मी कांहीच बोललो नाही.
कारण मी कृष्णवर्णीय नव्हतो.
जेव्हा ते मागासवर्गियांकरिता आले,
तेव्हा मी कांहीच बोललो नाही,
कारण मी मागासवर्गीय नव्हतो.
जेव्हा ते व्यंग असलेल्यांकरिता आले,
तेव्हा मी कांहीच बोललो नाही,
कारण मला व्यंग नव्हते.
जेव्हा ते महिलांकरिता आले,
तेव्हा मी कांहीच बोललो नाही,
कारण मी स्त्री नव्हतो.
जेव्हा ते अल्पसंख्यांकांकरिता आले,
तेव्हा मी कांहीच बोललो नाही,
कारण मी अल्पसंख्यांकांपैकी नव्हतो.
आणि जेव्हा ते निर्बलांकरिता आले,
तेव्हाही मी कांहिही बोलण्याचें नाकारले,
कारण मी निर्बल नव्हतो.
आणि जेव्हा ते माझ्याचकरिता आले,
तेव्हा कोणीच कांही बोलले नाही,
कारण तेव्हा बोलण्याकरिता कोणी शिल्लकच नव्हता.
Monday, October 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment