Friday, October 30, 2009

वसईचा किल्ला ... भग्न अवशेष

पश्चिमेकडील तट, ज्या बाजूने वसई गांवाकडे जाता येते. ह्या तटाची रुंदी जवळ जवळ ३० फुट आहे. दोन रुंद दगडी भिंतींच्या मद्ध्ये दगड, माती वगैरे भरून हा तट बांधला आहे. ह्या तटाचा कांही भाग तोडून, आता किल्ल्यात जाण्याचा रस्ता तयार केला आहे.
दुरून दिसणारा एक पडका बुरूज.
आणखी एक भग्न अवशेष.
किल्ल्यांतील या मंदिराचा उपयोग हिंदू मरणोत्तर विधींकरिता करतात.
भग्नावस्थेत असलेल्या अनेक वास्तू.
पुरातत्वविभागाची हल्लीच बांधलेली वास्तू. अर्थांत, ही इमारत सुस्थितिंत असणारच !
चर्चची भग्न वास्तू. पुरातत्व विभागाकडून (A। S. I.) सद्ध्या याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.
पूर्वेकडील दरवाजा. या बाजूने दक्षिणेकडील खाडीकडे जाता येते।
पूर्वेकडील तटबंदी. याच्या दक्षिणेला वसईची खाडी आहे।
चिमाजी आप्पांचे स्मारक. चिमाजी आप्पांनी हा किल्ला पोर्च्युगिजांपासून अत्यंत अवघड अशा उत्तर बाजूने हल्ला करून जिंकून घेतला. किल्ल्याला एका बाजूने खाडी, दोन बाजूंनी बिकट दलदल व चौथ्या बाजूला वसई गांव, जेथला किल्ल्याचा तट ३० फुट रुंदीचा आहे.
किल्ल्यांतून फेरफटका मारल्यानंतर, मन विषण्ण होते. भारतांत ह्या व अशा अनेक वास्तूंची जपणूक होत नाही व प्रत्यही त्यांचा ह्रास होतो आहे.









1 comment:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

मराठ्यांना वसईचा किल्ला काबीज करण्यासाठी तीन वर्षे सक्त प्रयत्न करावे लागले. अनेक नामांकित सरदार व प्रचंड फौज जमा झाल्यावर किल्ल्याच्या तटाच्या खालपर्यंत सुरुंग पोचवण्यात यश आले तेव्हा अखेर तट फुटून किल्ला सर झाला. एका परकीय युरोपियन सत्तेला एका प्रांतातून समूळ उखडून काढण्यात मराठ्याना मिळालेले यश हे अपवादात्मकच म्हणावे लागेल.